This Site Content Administered by
-

जागतिक मूत्रपिंड दिवस-2014
"आपल्या मूत्रपिंडांचा विचार करा"

नवी दिल्ली, 13-3-2014

-मजीद मुश्ताक पंडित *

 

आपल्या देशात दर दहा व्यक्तींमधल्या एक व्यक्तीला मूत्रपिंडांशी संबंधित आजार असतो असे असूनही अर्ध्याहून अधिक व्यक्तींना  60 टक्क्यांहून अधिक निकामी होईपर्यंत आपल्या आजाराचा पत्ता लागत नाही. एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अभ्यासानुसार दरवर्षी सुमारे 1 लाख 50 हजार व्यक्तींना मूत्रपिंडाचे आजार होतात आणि यापैकी खूपच थोडया जणांना काही प्रमाणात उपचार मिळतात.

गंभीर बाब अशी की मूत्रपिंडांच्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लक्षावधी रुग्णांना उपचारच मिळत नाहीत किंवा प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंड मिळत नाही. व्याधीचे लवकर निदान न होणे, प्रत्यारोपणासाठी पैशांचा अभाव किंवा मूत्रपिंड देणाऱ्याचे मूत्रपिंड रुग्णाला न जुळणे ही त्यामागची कारणे आहेत. देशात प्रत्यारोपणासाठी दरवर्षी 5 लाख मूत्रपिंडांची गरज भासते मात्र काही हजार रुग्णांनाच अत्यंत  महागडी प्रक्रिया पार पडल्यावर मूत्रपिंड  उपलब्ध होऊ शकते.

13 मार्च हा दिवस जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून साजरा केला जातो. मूत्रपिंडांचे महत्त्व, संबंधित समस्या, मूत्रपिंडांच्या  व्याधींच्या परिणामांचा धोका याबाबत जनजागृती करण्यासाठी सन 2006 पासून हा दिवस जागतिक मूत्रपिंड दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची या दिनाची संकल्‍पना "मूत्रपिंडाचा दुर्धर आजार आणि वाढते वय" अशी आहे.

उच्‍च रक्‍तदाब आणि मधुमेहानंतर मूत्रिपिंडाचा आजार हा तिस-या क्रमांकाचा आजार आहे. उच्‍च रक्‍तदाब आणि मधुमेह यांचाही मूत्रपिंडांवर परिणाम होतो आणि ब-याचदा त्‍याचे परिवर्तन मूत्रपिंडांच्‍या दुर्धर व्‍याधीमध्‍ये होते. आकडेवारीनुसार मूत्रपिंडांचा दुर्धर आजार असलेल्‍या 60 टक्‍के रुग्‍णांना आधीपासून उच्‍च रक्‍तदाब किंवा मधुमेह किंवा या दोन्‍हीचा आधीपासून त्रास असल्‍याचे आढळून आले आहे. मूत्रपिंडाच्‍या  आजाराचे निदान लवकरच झाले तर वेळेवर उपचार होऊन गुंतागुंतीच्‍या अनारोग्‍य समस्‍यांचा धोका कमी करता येतो.

सुरुवातीच्‍या काळात ही व्‍याधी लक्षात न आल्‍याने त्‍यावर उपचार केले जात नाहीत. या व्‍याधीवरील उपचारांचा खर्च हे मोठे आव्‍हान आहे. त्‍यामुळे या महत्‍त्‍वाच्‍या अवयवाच्‍या आरोग्‍यावर देखरेख ठेवणे आणि या समस्‍येवर उपाययोजना करण्‍यासाठी कृती करणे, याचे स्‍मरण करुन देण्‍यासाठी जागतिक मूत्रपिंड दिवस साजरा केला जातो. या अवयवाबद्दल जाणून घेण्‍यासाठी आणि त्‍याचे आरोग्‍य राखण्‍यासाठी काय करावे, याबाबत  जाणून घेण्‍याची संधी म्‍हणजे हा दिवस आहे.

उच्‍च रक्‍तदाब  आणि मधुमेह असलेल्‍यांमध्‍ये मूत्रपिंडाची व्‍याधी जडण्‍याचा धोका अधिक असतो. त्‍यामुळे सर्व उच्‍च रक्‍तदाब आणि मधुमेहाच्‍या रुग्‍णांनी आपल्‍या शास्‍त्रशुध्‍द चाचण्‍या करुन घेणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात वैदयक जगतालाही सक्रिय करण्‍यावर भर दिला जात आहे.

मूत्रपिंडाच्‍या दुर्धर आजारांना रोखण्‍यासाठी स्‍थानिक स्‍तरापासून राष्‍ट्रीय स्‍तरावरच्या आरोग्‍य प्राधिका-यांना महत्‍त्‍वाची भूमिका बजावावी लागेल. यासंदर्भात कृती करण्‍यासाठी जगभरातल्‍या सर्व सरकारांना प्रोत्‍साहन देणे  आणि मूत्रपिंडाशी संबंधित चाचण्‍यांवर अधिक गुंतवणूक करण्‍याचा संदेश या दिवसाच्‍या माध्‍यमातून दिला जात आहे.

मूत्रपिंड निकामी झाल्‍यास प्रत्‍यारोपण हाच सर्वोत्‍तम पर्याय असून त्‍याला चालना दिली पाहिजे. जीवन वाचविण्‍यासाठी अवयव दानाची मोहिम अधिक सक्रिय झाली पाहिजे.

भारत सरकारने मानवी अवयवांचे प्रत्‍यारोपण (सुधारणा) कायदा, 2011 केला असून त्‍यांअतर्गत मानवी अवयव दानासाठी प्रोत्‍साहन देणा-या  अनेक तरतुदी आहेत. यात मूत्रपिंड दानाचाही समावेश आहे. मूत्रपिंडाचे दुर्धर आजार रोखण्‍यासाठी तसेच त्‍यावर उपाययोजना म्‍हणून सरकारने अनेक पावले उचलली आहेत. महत्‍त्‍वाच्‍या सरकारी रुग्‍णालयांमध्‍ये डायलिसिसची सुविधा उपलब्‍ध आहे.

कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि स्‍ट्रोक याला प्रतिबंध घालण्‍यासाठी भारत सरकारने राष्‍ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. यामुळे मूत्रपिंडाचे दुर्धर आजार कमी करण्‍यातही साहाय्य होईल.

जनतेमध्‍ये आरोग्‍यविषयक जागरुकता निर्माण  करण्‍यासाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन विशेष कार्यक्रम भारत सरकारने सुरु केला आहे. यात मूत्रपिंडाशी संबंधित विविध समस्‍यांचाही समावेश आहे.

मूत्रपिंडाच्‍या आजाराशी झुंजणाऱ्या  रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे  त्यांना त्यांच्या कुटुबियांनाही अतोनात संकटाला सामोरे जावे लागते.

आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे, नियमित देखरेख आणि चाचण्या ही आजच्या काळाची गरज आहे. जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमित्ताने मूत्रपिंडासंदर्भात अधिक जाणून घेणे आणि त्याबाबतची माहिती अधिकाधिक जणांना देणे, अशी प्रतिज्ञा आपण सर्व आजच्या दिवशी घेऊ या.

-         - - - - - - - -

* सूचना सहाय्यक, पत्र सूचना कार्यालय, जम्मू

 
PIB Feature/DL/12
बीजी -.. -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau