This Site Content Administered by
आरोग्‍य व कुटुंब

राष्ट्रीय आरोग्य अभियान

नवी दिल्ली, 21-2-2017

*व्ही. श्रीनिवास

 

राज्य सरकारांना अर्थसहाय्य पुरवून ग्रामीण आणि शहरी आरोग्य क्षेत्रांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी  राष्ट्रीय आरोग्य अभियान हा भारताचा आरोग्य क्षेत्रातील महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, विशेष सेवा कार्यक्रम आणि आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणासाठी मनुष्यबळ या ४ घटकांचा समावेश आहे. 

जिल्हा आणि उप-जिल्हा स्तरावर पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तसेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांच्या दुहेरी समस्येवर तोडगा काढण्यासाठी  प्रजनन आणि बाल आरोग्याच्या पलिकडे आरोग्य सेवा विस्तारण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान हा भारताचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या उत्तम अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील निष्कर्षांचा समन्वय साधला आहे. २०१७-१८ वर्षासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी २६,६९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि ही भारत सरकारच्या सर्वात मोठ्या केंद्रीय पुरस्कृत योजनांपैकी एक आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाने (एनएचएम ) आरोग्य आणि कुटुंब कल्याणाच्या दोन विभागांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र आणले आहे. या एकत्रीकरणामुळे कार्यक्रम अंमलबजावणीत लक्षणीय प्रयत्न झाले आणि भारताच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील तरतुदींमध्ये वाढ झाली. अशाच प्रकारचे एकात्मीकरण राज्य स्तरांवर देखील पाहायला मिळाले. तसेच, राज्य वित्त विभागांच्या अखत्यारीबाहेर राज्य आरोग्य संस्थांकडे  केंद्रीय अर्थसहाय्य वळवण्यात एनएचएमने क्रांतिकारी बदल घडवून आणले. दुसरा महत्वपूर्ण बदल म्हणजे रोग नियंत्रण कार्यक्रमांचे एनएचएम आराखड्यात एकात्मीकरण हा आहे.

भारतात आरोग्य क्षेत्रातील कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये एनएचएमने लक्षणीय नावीन्यता आणली. यात लवचिक अर्थसहाय्य, सार्वजनिक आरोग्य दर्जाविरोधात संस्थांवर देखरेख, कार्यक्रम व्यवस्थापनात व्यवस्थापन तज्ज्ञ नेमून राज्य, जिल्हा आणि पंचायत समिती स्तरावर क्षमता निर्मिती आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य संस्थांमार्फत वेळेवर भर्ती करण्यासाठी सुलभ मनुष्यबळ व्यवस्थापन पद्धतींचा समावेश आहे. विविध उपक्रमांची रचना करण्यात मदत करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्राची स्थापना ही दुसरी लक्षणीय नाविन्यता आहे. काही राज्यांमध्ये राज्य आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्रे देखील स्थापन करण्यात आली आहेत.

 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्य आरोग्य संस्थांच्या कार्यक्रम अंमलबजावणी योजनांना आरसीएच फ्लेक्सि पूल, एनआरएचएम फ्लेक्सि पूल, संसर्गजन्य आजारांसाठी फ्लेक्सि पूल आणि असंसर्गजन्य आजारांसाठी फ्लेक्सि पूल  आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी फ्लेक्सि पूल या प्रमुख शीर्षकांतर्गत विशिष्ट संसाधन तरतुदींसह वार्षिक तत्वावर मंजुरी देते, प्रशिक्षण कार्यक्रम आणि क्षमता निर्मितीसाठी लक्षणीय संसाधन तरतूद आहे. राज्य आरोग्य संस्थांना प्रमुख शीर्षकांतर्गत संसाधनांचे पुनर्योग्यीकरण करण्याची आणि जिल्हा रुग्णालये, समाज आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे निधी वळवण्याची स्वायत्तता आहे.  

एनएचएमचा प्रजोत्पादन आणि बाल आरोग्य सेवांवर प्रामुख्याने भर आहे. जननी सुरक्षा योजना (जेएसवाय) आणि मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता (आशा) कार्यक्रमांच्या  यशस्वी अंमलबजावणीचा सवयी बदलण्यावर लक्षणीय प्रभाव पडला आणि गरोदर महिला मोठ्या संख्येने सार्वजनिक आरोग्य केंद्रात येऊ लागल्या. प्रसूती केसेसची वाढती संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एनआरएचएम फ्लेक्सि पूल संसाधनांचा वापर करण्यात आला. गरोदर स्त्रियांना प्रसूतीसाठी सार्वजनिक आरोग्य केंद्रात आणण्यासाठी आणि तात्काळ सेवेसाठी रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आल्या. १०८ रुग्णवाहिका सेवांची यशोगाथा अनेक राज्यांमध्ये माहिती स्वरूपात सांगितली जात आहे. 

एनएचएमच्या विशेष प्राधान्य राज्यांमधील संस्थात्मक सेवांमधील वाढीचा माता मृत्यू प्रमाण आणि पाच वर्षाखालील मुलांचा मृत्यू दर यावर लक्षणीय प्रभाव पडला. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ४ आणि ५ बाबतीत देशाने लक्षणीय प्रगती केली आहे. एमडीजी ६ प्रकरणी, उद्दिष्ट साध्य करण्यात आणि क्षयरोग, मलेरिया आणि एचआयव्हीचा प्रादुर्भाव कमी करण्यात देशाला यश आले आहे. प्रमुख आरोग्य निर्देशांकातील सुधारणांचे दर्शन घडवून जीवनचक्र दृष्टिकोन स्वीकारत एनएचएमने चांगली कामगिरी केली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने दोन नवीन कार्यक्रम हाती घेतले आहेत. पहिला आहे मिशन इंद्रधनुष, या कार्यक्रमाने केवळ एका वर्षात लसीकरणाची व्याप्ती ५ टक्क्यांहून अधिक वाढवून चांगली प्रगती केली आहे. दुसरा कायाकल्प कार्यक्रम २०१६ मध्ये एनएचएम अंतर्गत सुरु करण्यात आला, यात सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्वच्छता, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रण आदी सवयी अंगी बाणवण्यात येत आहेत. कायाकल्प अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या पुरस्कार स्पर्धेला सर्व राज्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि स्वच्छतेच्या दर्जात लक्षणीय सुधारणा पाहायला मिळत आहे.

एनएचएमने आरोग्य सेवेसाठी लोकचळवळ निर्माण केली आहे.भारताने परिवर्तनीय बदलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  सुमारे १० लाख मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य सेवा कार्यकर्त्या (आशा) तैनात केल्या आहेत. आशा कार्यकर्त्या संस्थात्मक सेवांसाठी आयोजन, अर्भके आणि बालकांच्या आजाराबाबत एकात्मिक व्यवस्थापनावर भर आणि अर्भकांची घरगुती काळजी घेण्याबाबत सल्ला देण्याचे काम करतात. एनएचएमने ग्रामीण आरोग्य आणि स्वच्छता समितीच्या माध्यमातून आरोग्य योजना आखण्यासाठी आणि आशा कार्यकर्त्यांवर देखरेख ठेवण्यासाठी  लोकांना सक्षम केले आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि समाज आरोग्य केंद्र स्तरावर रुग्ण-स्नेही संस्था निर्माण करण्यासाठी रोगी कल्याण समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागांबरोबरच शहरातील झोपडपट्ट्यांकडे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाद्वारे लक्ष पुरवण्यात येत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भारताच्या महत्वपूर्ण आरोग्य क्षेत्र कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व करून सर्वांना आरोग्य हे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. त्याच्या नैसर्गिक यशात निरोगी भारताचे भविष्य आहे.

****

*लेखक १९८९ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या ते नवी दिल्ली येथील एम्स येथे उप प्रशासकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

 
PIB Feature/DL/3
सप्रे -काणे -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau