This Site Content Administered by
-

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे नि:पक्षपाती निवडणुकांना प्रोत्साहन

मुंबई, 23-3-2017

निवडणुकांच्या वेळेस विजय प्राप्त करु न शकलेल्या उमेदवारांकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली जाते. उमेदवारांच्या अपयशाची कारणं शोधली तर, नक्कीच एका निर्जीव वस्तूकडे बोट दाखवण्याची शक्यता जास्त असते, कारण ती वस्तू स्वत: काही बोलू शकत नाही.

खरंतर मनुष्य स्वभावात असलेल्या पक्षपात या यंत्रामध्ये नाही. उलट अविरतपणे सकाळ ते संध्याकाळ, दिवसरात्र, तसेच वर्षभरात कुठल्याही दिवशी अतिशय सक्षमपणे आपले कार्य करत असते.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे सुद्धा इतर यंत्रांप्रमाणेच एक यंत्र आहे, जे आपले कार्य करत असते.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम टेंपरींग अर्थात फेरफार करण्यापासून सुरक्षित आहेत का? 1989 मध्ये निवडणुकांमधे ही यंत्रे वापरण्यास मंजूरी मिळाली. आतापर्यंत ईव्हीएम द्वारे शंभरहून अधिक निवडणूका पार पडल्या आहेत. आधीच्या निवडणुकांमध्ये काही जिंकलेल्या उमेदवारांना नंतर हारही पत्करावी लागली आहे, तर काही हरलेले उमेदवार नंतर जिंकलेही आहेत. आता याच लोकांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली आहे. लोकांकडून अक्षरश: काल्पनिक शंका उपस्थित केल्या जात आहे. कित्येक लोकांनी तर ईव्हीएमविषयी न जाणताच दूरचित्रवाहिन्यांवर या यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचे व्हिडिओ दाखवले आहेत. काहींनी तर ईव्हीएम मधील टेंपरींगचा आपला मुद्दा पटवून देण्यासाठी, अशी बनावट यंत्रही स्वत: तयार केली. टेंपरिंग यंत्र बनवता येणं शक्य आहे किंवा नाही हा प्रश्न नाही, तर निवडणुकांमध्ये वापरली गेलेली यंत्र टेंपर होती किंवा नव्हती हा खरा प्रश्न आहे. विश्वासार्हतेचा दावा करायचा असेल, तर याच लोकांनी काल्पनिक ऐवजी खरी पद्धत दाखवायला हवी होती.

चला तर मग बघूया की भारतीय ईव्हीएम विश्वासार्ह का आहेत. सर्वात प्रथम म्हणजे हे ईव्हीएम इंटरनेट अथवा मोबाईल किंवा इतर कुठल्याही वायरलेस कम्युनिकेशन उपकरणाशी जोडलेले नसते. त्यामुळे कुठलेही कम्युनिकेशन उपकरण याला जोडले जाऊ शकत नाही. वायरलेस कम्युनिकेशनसाठी ऐंटिनाची जोडणी आवश्यक असते, एवढं साध गणित विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांला शिकवले जाते. निवडणूक कालावधीत या ईव्हीएममध्ये ऐंटिनाही नसतो, त्यामुळे ईव्हीएममध्ये कुणीही ढवळाढवळ करु शकत नाही.

संगणकाप्रमाणेच ईव्हीएममध्ये सुद्धा मालवेअर (सॉफ्टवेअर प्रोग्राम) बसवला असल्याचा आरोप काही लोक करतात. पण हा आरोप बिनबुडाचा आहे. कारण संगणकाप्रमाणे ईव्हीएम इंटरनेट किंवा वायरलेस यंत्रणा अशा कुठल्याही नेटवर्कशी जोडलेले नसते. तसेच ईव्हीएममध्ये कुठलीही ऑपरेटिंग सिस्टिम नाही. ते एक स्वतंत्र यंत्र आहे. जर संगणकामध्ये मालवेअर प्रोग्राम बसवला जाऊ शकतो, तर आपल्याला असंही म्हणता येईल की टीव्ही, एसी रिमोट कंट्रोल किंवा डिजिटल घड्याळांमध्येही इंटरनेटद्वारे मालवेअर बसवता येईल. पण आपण ज्याप्रमाणे या गोष्टीवर विश्वास ठेऊ शकत नाही, कारण ही स्वतंत्र उपकरणे आहेत, त्याचप्रमाणे ईव्हीएमवर सुद्धा शंका घेणे उचित नाही.

ईव्हीएममध्ये ढवळाढवळ केली जाऊ शकते, अशी शंका उपस्थित होत असेल, तर गेली 20 वर्ष 100 निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही यंत्र वापरली जात असताना ही बाब लपून कशी राहू शकते? आणि जी व्यक्ती ईव्हीएममध्ये असे फेरफार करण्यात माहिर आहे अशा व्यक्तीला हरण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवाराकडून खूप मागणी असली पाहिजे. अशा प्रकारच्या शंका उपस्थित करणे अत्यंत चुकीचे आहे. मात्र शंकांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगाने मॉक पॉल्स, मशील सील बंद करणे, विविध राजकीय ऐजंटकडून तपासलेली यंत्रच निवडणुकांमधे वापरली गेली असल्याची खातरजमा करणे यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जर यंत्रामध्ये फेरफार झालाय असं म्हणतात तर मग यंत्राची तपासणी करताना हे राजकीय एजंट काय करत होते? आणि एखाद्या यंत्रामध्ये असे फेरफार होत असतील, तर कित्येक मतदान केंद्रात असलेल्या यंत्रामध्ये ते व्हायला पाहिजेत. यंत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ढवळाढवळ करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कमीत कमी दहा लाख प्रशिक्षित स्वयंसेवकांची गरज पडू शकेल.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बनवताना, त्यांचे वेळोवेळी मूल्यमापन करताना तसेच निवडणुकांदरम्यान अशा विविध पातळ्यांवर या यंत्राची चाचणी केली जाते. ह्या चाचण्या एका सक्षम आणि अधिकृत स्वतंत्र संस्थेकडून करुन घेतल्या जातात.

कोणत्या उमेदवारसाठी कोणते बटण आहे हे त्या यंत्राला माहीत नसते. मतदानादरम्यान मतदान केंद्राध्यक्षाकडून हे यंत्र सुरु केले जाते आणि मतदाराकडून एकच बटण दाबले जाऊ शकते. त्यामुळे मतदाराकडून कुठलाही गैरप्रकार होण्याची शक्यता नसते.

ईव्हीएममध्ये एकदा बसवलेल्या प्रोग्राममध्ये बदल करता येत नाही, तसेच यंत्र बनवण्याच्या वेळेत आणि निवडणुकांदरम्यानही पक्ष आणि उमेदवार यांच्यासाठी कुठले बटण आहे हे माहित नसल्यामुळे प्रोग्राममधील एखादे बटण पक्षपात करत असल्याची शंकाही गैर आहे.

अनेक वाद-प्रतिवाद ऐकल्यानंतर विविध न्यायालयांनी यासंदर्भातील कित्येक याचिका निकालात काढल्या आहेत.

जरी मतदारांनी ईव्हीएमवर विश्वास दाखवला असला तरी निवडणूक आयोगाने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. निवडणूक आयोगाकडून ईव्हीएममध्ये वोटर व्हेरीफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) बसवण्यात येत आहे. हे एक सील बंद प्रिंटर असून, मतदाराला मतदान केल्यानंतर एक छापील पावती बघता येईल आणि नंतर ही पावती यंत्राला जोडलेल्या सीलबंद डब्यात जमा होईल. मतदाराला ही पावती हाताळता येणार नाही. त्यामुळे यंत्रावर नोंद झालेले मत आणि छापील पावती याआधारे निकालांची पडताळणी केली जाऊ शकेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अशीच अनेक VVPAT यंत्र बसवण्यात आली होती. ही पुरेशी विश्वासार्हता नाही का?

*********

डॉ. रजत मूना, संचालक, आयआयटी, भिलई, माजी महासंचालक, सीडॅक, पुणे आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या ईव्हीएमसंबंधित टेक्निकल तंज्ञ गटाचे सदस्य.

 

N. Sapre /S. Tupe/D. Rane

 
PIB Feature/MH/5
सप्रे -सो.तु. -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau