This Site Content Administered by
-

सुगम्‍य भारत मोहीम

नवी दिल्ली, 25-3-2017

संजय कुमार*

 

सुगम्य भारत मोहिम ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाची देशव्यापी पथदर्शी मोहिम आहे. देशभरातील दिव्यांगांसाठी मुक्त आणि हितावह वातावरण निर्माण करणे, हे या मोहिमेचे ध्येय आहे. 3 डिसेंबर 2015 रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला.

एखाद्या व्यक्तीची विकलांगता ही कोणत्याही मर्यादा किंवा अक्षमतेतून आलेली नाही तर ती सामाजिक व्यवस्थेच्या रचनेतून आलेली विकलांगता आहे. शारीरिक, सामाजिक, संरचनात्‍मक आणि व्‍यवहाराशी संबंधित अडचणी, दिव्यांगांना, सामाजिक, सांस्‍कृतआणिर्थिक कामकाजात सहभागी होण्यापासून रोखतात. बाधामुक्त वातावरणात दिव्यांगांना सर्व प्रकारच्या कामकाजात समप्रमाणात सहभागी होण्याची सुविधा प्राप्त होईल आणि त्यामुळे त्यांना स्वतंत्र तसेच सन्मानीत आयुष्य जगायला प्रोत्साहन मिळेल. दिव्यांग व्यक्तींनाही उत्पादक, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण जीवन जगता यावे यासाठी प्रगती आणि विकासाच्या समान संधी उपलब्ध असतील, असा समावेशक समाज घडविण्याचा दृष्टीकोन या मोहिमेत आहे.

दिव्यांग व्यक्तींपर्यंत व्यापक स्वरूपात सुविधा पोहोचविण्यासाठी या मोहिमेचे त्रिभाजन करण्यात आले आहे. वातावरण निर्मिती, परिवहन आणि माहिती-तंत्रज्ञान पर्यावरणाचे तंत्र.

सुगम्य भारत अभियानांतर्गत सुगम्य वातावरण निर्मितीसाठी पुढील लक्ष्ये निर्धारित आहेत.

1. 50 शहरांमध्ये किमान 25 ते 30 सर्वात महत्वपूर्ण सरकारी इमारतींचे सुगम्यता लेखा परिक्षण पूर्ण करणे आणि या वर्षअखेरपर्यंत त्यांना पूर्णपणे सुगम्य बनविणे

2. राष्ट्रीय राजधानी परिसर आणि सर्व राज्यांच्या राजधान्यांमधील सर्व सरकारी इमारतींपैकी किमान 50 टक्के इमारती डिसेंबर 2018 पर्यंत पूर्णपणे सुगम्य करणे

3. 1 आणि 2 मध्ये समाविष्ट नसलेल्या राज्यांमधील महत्वाच्या दहा शहरांमधील/नगरांतील सरकारी इमारतींचे सुगम्यता लेखा परिक्षण पूर्ण करणे आणि त्यांना सुगम्य बनविणे

विभागाने सूचिबद्ध लेखापरिक्षकांद्वारे राज्य सरकारांनी निश्चित केलेल्या 1653 इमारतींचे सुगम्यता लेखा परिक्षण पूर्ण केले आहे.

इमारतींच्या पुनर्बांधणीसाठीचे वित्तीय प्रस्ताव सादर करता यावेत, यासाठी 1469 इमारतींचा सुगम्यता लेखा परिक्षण अहवाल राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. या योजनेंतर्गत 575 इमारतींसाठीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. 242 इमारतींसाठी राज्यांना 45.42 कोटी रूपये इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सुगम्यता लेखा परिक्षणासाठी लेखा परिक्षकांना 148 लाख रूपये इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ तातडीने आणि देशांतर्गत विमानतळ मार्च 2018 पर्यंत पूर्णपणे सुगम्य करणे हा सुगम्य भारत अभियानाचा उद्देश आहे. 32 आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी 25 विमानतळांवर रँम्प, सुगम्य शौचालये, ब्रेल लिपीसह उद्वाहक आणि श्रवण संकेतासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

आपल्या देशात रेल्वे हे वाहतुकीचे सर्वात जास्त लोकप्रिय साधन आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक असणाऱ्या भारतीय रेल्वेला सुगम्य करण्यासाठी ए-1 आणि बी श्रेणीतील रेल्वे स्थानके पूर्णत: सुगम्य केली जातील.

सुगम्य भारत अभियानांतर्गत मार्च 2018 पर्यंत सरकारी मालकीच्या 10 टक्के सार्वजनिक परिवहन वाहकांना पूर्णपणे सुगम्य करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रस्ते परिवहन आणि कार्यकारी संचालकांना मार्च 2018 पर्यंत आणि सरकारी मालकीच्या 10 टक्के सार्वजनिक परिवहन वाहकांना पूर्णपणे सुगम्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

माहिती आणि प्रसारण यंत्रणेची सुगम्यता हा सुगम्य भारत अभियानाचा आणखी एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारची किमान 50 टक्के संकेतस्थळे मार्च 2017 पर्यंत सुगम्य करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

राज्य सरकारची 917 संकेतस्थळे सुगम्य करण्याचे आदेश पूर्वीच देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे 56 मंत्रालये/ विभागांची 100 सरकारी संकेतस्थळे सुगम्य करण्याचे काम सुरू आहे.

विभागाने व्यापक सुगम्यतेचे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतुने दिव्यांगांसाठी एका ऑनलाईन सुगम्य ग्रंथालयाचा शुभारंभ केला आहे. तसेच सुगम्य भारत अभियानाच्या विविध दृष्टीकोनांबाबत माहिती देण्यासाठी मुंबई, अहमदाबाद, जयपुर, रायपुर, भुवनेश्‍वर, चेन्‍नई आणि रांची येथे जागरूकता कार्यशाळांचेही आयोजन केले आहे. 

सुगम्यतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी 24 जुलै 2016 रोजी इंडिया गेट, लोधी गार्डन, वसंत कुंज आणि साऊथ एक्सटेंशन येथे राइड 4 ॲक्‍ससेसिबिलिटी या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.त्यात 600 पेक्षा जास्त मोटार सायकल स्वार आणि युवक/विद्यार्थी सहभागी झाले.

डिजीटल विश्वात स्थान निर्माण करण्यासाठी ब्लॉग्ज, अहवाल, थेट प्रसारण तसेच चित्रांच्या माध्यमातून विभाग समाजमाध्यमांवर सुगम्य भारत आभियानाबाबत नवनवीन माहिती उपलब्ध करून देत आहे.

      सुगम्यतेशी संबंधित कार्यक्रम आणि नविन माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने www.accessibleindia.gov.in हे संकेतस्थळ आणि एक मोबाइल ॲप्‍लीकेशन सुरू केले आहे.

- - - - - - - - - - -

*लेखक पत्र सूचना कार्यालय, नवी दिल्‍ली येथे कार्यरत आहेत. हा लेख सामाजिक न्‍याय आणि अधिकार मंत्रालयाच्या दिव्‍यांग सबलीकरण विभागाकडून प्राप्त माहितीवर आधारित आहे.

 

 
PIB Feature/DL/6
बीजी -माधुरी -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau