This Site Content Administered by
पंतप्रधान

राष्ट्रपती भवनात "प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी-अ स्टेट्समन" या चित्रमय पुस्तकाच्या  प्रकाशन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 2-7-2017

१८७५ पासून राजकारणातला एक निकोप प्रवास सुरु झाला. अनेक प्रकारचे टप्पे आले, अनेकजण भेटले, अनेक संकटे आली, मात्र राजनीतिज्ञांनी आपली जवाबदारी पूर्ण करण्याचे भरपूर प्रयत्न केले. काल मला खूप वेळ आर एन आर यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. एकदा इराणी यांच्या बरोबरही  खूप विस्तृतपणे चर्चा करण्याची संधी मिळाली होती. ते माझे खूप प्रखर टीकाकार होते मात्र त्यांच्याशी गप्पा मारण्यात खूप मजा यायची. व्यंगात्मक विनोद करणे त्यांचा नैसर्गिक स्वभाव होता, तर ती ही  एक संधी मला कधीकधी मिळायची.

आपल्या देशात बहुधा एक उणीव राहिली आहे, त्याचे कारण काय असेल आणि काय असू शकेल , कदाचित माझ्या मताशी सगळे सहमत नसाल. आपला समाज इतिहासाप्रती कधी जागरूक नव्हता आणि म्हणूनच... इंग्रजांकडे बघा, ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचे जतन करतात. नुकताच मी पोर्तुगालला जाऊन आलो. तर गोवा आणि पोर्तुगालची जेव्हा तिथे राजवट होती, तेव्हा जो पत्रव्यवहार व्हायचा, अनेक वर्ष प्रयत्न सुरु होते कि त्यापैकी काहींच्या छायांकित प्रति आपल्याला मिळाव्यात. एव्हढा प्रदीर्घ इतिहास, पत्रांच्या माध्यमातून समजतो आणि या वेळी जेव्हा मी गेलो, तेव्हा सरकारने ते मान्य केले आणि सगळ्या पत्रांची एकेक प्रत गोवा सरकारकडे सुपूर्द केली. संपूर्ण विकास प्रवासाचा घटनाक्रमाचा पुरावा मिळाला आहे. आपल्याकडे कोणीही ते जतन केले नाही. आजही आपण पाहिले तर भारताच्या अनेक गोष्टींचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्या विद्वानांना ब्रिटनला जाऊन तिथल्या ग्रंथालयांमध्ये शोधावे लागते, काढावे लागते, कारण मुळातच आपला तो स्वभाव नाही. माझ्या मते हा कुण्या व्यक्तिभक्तीचा विषय नाही, देशाच्या जीवनात अशा व्यवस्थांचे मोठे महत्व असते आणि त्याकडे ऐतिहासिक घटना म्हणून आपण पाहिले तर भावी पिढी साठी ती खूप मोठी सेवा ठरेल.

हा तर एक चित्रमय प्रवास आहे, आपल्यासारख्या सामान्य माणसांना राष्ट्रपती म्हणजे आजूबाजूला लोकांचा मोठा ताफा आहे, राजशिष्टाचार आहे, राष्ट्रगीत सुरु आहे, विशिष्ट स्थितीत उभे आहेत, हेच दिसते, मात्र त्या पदावरील व्यक्तीच्या अंतर्मनात एक उत्साही माणूस असतो हे तेव्हा समजते  जेव्हा एखाद्या छायापत्रकाराच्या कॅमेऱ्यात क्लिक होते आणि जेव्हा आपण ते  पुस्तकाच्या रूपात पाहतो तेव्हा समजते कि आपले राष्ट्रपती लहान मुलाप्रमाणे हसतात. हे आपल्या मनाला भावते. परदेशातून कितीही मोठे पाहुणे येऊ दे, ते कितीही उंच का असेना, त्या छायाचित्रावरून समजते कि माझ्या देशाच्या राष्ट्रपतींचा आत्मविश्वास किती जबरदस्त आहे, खूप अभिमान वाटतो. या सर्व गोष्टी या पुस्तकात समाविष्ट आहेत. म्हणजेच पद व्यवस्थेच्या पलीकडेही माझे राष्ट्रपती आहेत, त्यांच्या अंतर्मनातही मानवी आयुष्याचा प्रवास असतो, त्याकडे जेव्हा कॅमेऱ्याच्या स्वरूपात पाहतो, छायाचित्रांच्या रूपात ते प्रकट होते.

जेव्हा महात्मा गांधी होते, त्या वेळी तेव्हा इतके कॅमेरेही नव्हते, व्यवस्थाही नव्हती, मात्र गांधीजींची दोन छायाचित्रे पाहिली, एकात झाडू घेऊन साफसफाई करत आहेत आणि दुसऱ्या छायाचित्रात सूक्ष्मदर्शक घेऊन बारीक डोळ्यांनी पाहत आहेत, तेव्हा समजते कि माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विस्तार कुठवर होईल? दोन छायाचित्रे, गांधीजींना दोन वेगवेगळ्या रूपात दाखवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. म्हणजेच जो छायाचित्रकार असतो, तो जेव्हा छायाचित्र काढतो, तो जेव्हा तो क्षण टिपतो, तो क्षण इतिहासाला अमरत्व बहाल करण्याचे सामर्थ्य बाळगतो.

इतिहासाला अमरत्व देण्याचे कारण अशा दस्तावेजांमध्ये असते आणि या गोष्टी त्यात आणण्याचा प्रयत्न वरुण जोशी यांनी केला आहे. राजनीतिज्ञांच्या टीमने त्याचे सुंदर सादरीकरण केले आहे. ज्यावेळी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एसएमएस प्रणाली सुरू झाली, तेव्हा तुम्ही पाहिले असेल खूप मोठ्या प्रमाणात लेख छापून यायचे कि या एसएमएसमुळे पत्रलेखनाचे महत्व संपुष्टात येईल. पत्रलेखन हा मानवी संस्कृतीचा महत्वपूर्ण ठेवा आहे. जर तो संपला तर भावी पिढीच्या हाती काही लागणार नाही. ज्यांना माहित आहे 25 वर्षांपूर्वी हे सगळे लेख छापून यायचे, तेव्हा त्यांनाही माहित नव्हते कि तंत्रज्ञान एवढे बदलेल, प्रत्येकजण इतका सर्जनशील बनेल, स्वतः लेखक बनेल आणि नवनवीन तंत्रज्ञान आपल्या अंतरंगातील सर्जनशीलतेला जन्म देईल आणि कदाचित ते सुरक्षितही असेल.

एक काळ होता जेव्हा स्वाक्षरीचे महत्व असायचे. हळूहळू छायाचित्रांचे महत्व वाढले, आणि आता स्वाक्षरी आणि छायाचित्र या दोन्हीचे मिश्रण असलेले सेल्फीचे युग आले. बघा, बदल कसा होत आहे. सेल्फी स्वाक्षरी आणि छायाचित्र या दोन्हीचे मिश्रण आहे. म्हणजेच मूळ विचारापासून बदल होत होत कुठवर पोहचतात याची प्रचिती येते. हे संपूर्ण पुस्तक पाहिलंत, ज्यात मला वाटते कि वृत्तपत्रांच्या माध्यमातून जगाने राजकीय नेत्यांची जी ओळख निर्माण केली  आहे, क्षमा करा मला, इथे अनेक वृत्तपत्रवाले आहेत, या वृत्तपत्रांच्या कक्षेबाहेरदेखील राजकीय आयुष्य जगणारा एखादा माणूस असू शकतो. रोजच्या धावपळीच्या युगात वृत्तपत्रे ते टिपून घेऊ शकत नाहीत, मात्र काही काळानंतर संशोधन केल्यावर ज्या गोष्टी समोर येतात, तेव्हा वाटते कि दैनंदिन आयुष्यात पाहिलेल्या माणसाच्या पलिकडेही आणखी एक माणूस असतो आणि म्हणूनच त्याच्या अंतरंगातील सत्य जाणून घेण्यासाठी, मला वाटते हे पुस्तक आदरणीय प्रणवदा यांना समजून घेण्याची, त्यांच्या जवळ जाण्याची आणि कधी कधी तर वाटते कि त्यांच्या अंतरंगात डोकावण्याची संधी देत आहे. आणि या महत्वपूर्ण कामासाठी मी गुप्ताजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि खासकरून वरुण जोशी यांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो.

आदरणीय राष्ट्रपतीजींबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे सौभाग्य आहे. मी माझ्या आयुष्याकडे पाहतो, कि मला आणीबाणीच्या काळात एक संधी मिळाली होती, मी राजकारणात नव्हतो, सामाजिक जीवनात व्यस्त होतो, मात्र आणीबाणीच्या काळात वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अतिशय टोकाच्या, एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या विचारप्रवाहांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी खूप लहान होतो, मात्र त्यावेळी खूप काही शिकायला, जाणून घ्यायला मिळाले, लोकांना भेटायला मिळाले. आमच्याकडे गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू होते धीरूभाई देसाई, त्यांच्या घरी येणे-जाणे, आणीबाणी होती, प्रखर गांधीवादी होते रवींद्र वर्मा, समाजवादी विचारसरणी आणि काँग्रेसमध्ये जीवन अशा लोकांमध्ये खूप जवळून जगण्याची मला संधी मिळाली. जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर अतिशय जवळून काम करण्याची संधी मिळाली. माझ्या जडणघडणीत ती खूप मोठी संधी होती. मुख्यमंत्री झालो, मी आज अभिमानाने आठवण काढतो काँग्रेसचे दिग्गज नेते नवल किशोर शर्मा यांच्या बरोबर काम करण्याचे सौभाग्य मला लाभले. खूप काही शिकायला मिळाले आणि मला वाटते कि माझ्या आयुष्यात खूप मोठे भाग्य मला लाभले ते म्हणजे प्रणबदां यांचे बोट पकडून दिल्लीतील वातावरणात स्वतःला स्थिरस्थावर करण्यात खूप मोठी मदत झाली. मला खूप मोठा आधार होता.

मी असा माणूस आहे ज्याला कायम चिंता वाटत राहते कि काम लवकर पूर्ण होऊ नये. जर लवकर आटोपले तर संध्याकाळी काय करू? एकदा कोणत्यातरी वृत्तपत्रात, आमच्याकडून आतल्या बातम्या काढून घेण्यात  तुम्ही पटाईत आहातच. मी एकदा अधिकाऱ्यांची बैठक घेत होतो, साधारण 8-9 वाजले असतील, तर बैठक सुमारे ९ वाजता संपली. तेव्हा माझ्या तोंडून निघाले कि अरे, एवढ्या लवकर संपली. तर रात्री 9 वाजता देखील ते म्हणाले चला, ठीक आहे, बघू कसा वेळ काढायचा ते. विचार करू. गेल्या तीन वर्षात राष्ट्रपतींबरोबर माझी एकही अशी भेट झाली नसेल, ज्यात त्यांनी पित्याप्रमाणे आणि मी अतिशय मनापासून सांगतो आहे, एखादा पिता आपल्या मुलाची ज्याप्रकारे देखभाल करेल त्याप्रमाणे मला सांगायचे, हे बघा मोदीजी, अर्धा दिवस तरी आराम करावाच लागेल. मला प्रणबदां म्हणायचे कि एवढी धावपळ का करता, काही कार्यक्रम कमी करा, स्वतःची तब्येत सांभाळा. निवडणुकीचे दिवस होते, उत्तर प्रदेशातल्या, मला म्हणायचे हार-जीत चालायचीच. मात्र शरीराकडे लक्ष द्याल कि नाही? हा राष्ट्रपतींच्या कर्तव्याचा भाग नव्हता, मात्र त्यांच्या आतला माणूस आपल्या एका सहकाऱ्याची चिंता करत होता आणि मला वाटते कि हे व्यक्तिमत्व, हा सन्मान, हे रूप राष्ट्र जीवनासाठी आपल्यासारख्या लोकांना प्रेरणा देणारे असते आणि ते काम प्रणबदांनी केले आहे. आदरणीय राष्ट्रपतीजींनी केले आहे, मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि आज वरुण जोशी यांना शुभेच्छा देतो, हा अमूल्य ठेवा येणाऱ्या पिढ्यांसाठी तयार केल्याबद्दल अभिनंदन करतो. राजनीतीज्ञ समूहाचे अभिनंदन करतो.

खूप-खूप धन्यवाद.

 
PIB Release/DL/1037
बीजी -काणे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau