This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेत फिल्म्स डिवीजनचाही सहभाग

 


मुंबई, 5-7-2017

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या ‘फिल्म्स डिवीजन’ने ही राज्य सरकारच्या ‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेत सहभाग नोंदवत, मुंबईतल्या पेडर रोड इथल्या कार्यालय परिसरात आज वृक्षारोपण केले.

यावेळी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी, यांच्यासह फिल्म्स डिविजनचे महासंचालक मनीष देसाई, संचालक स्वाती पांडे, दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक सुदर्शन पनतोडे, केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे कार्यकारी अधिकारी अनुराग श्रीवास्तव, बाल चित्रपट संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्रवण कुमार या सर्व मान्यवरांनी 40 रोपटी लावून, वनमहोत्सवात सहभाग नोंदवला. भारतीय चित्रपटांविषयीचे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय लवकरच या परिसरात उभे राहणार असून, हा परिसर अधिकाधिक हिरवागार करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘हरित महाराष्ट्र’ अभियानाअंतर्गत या महिन्यात राज्यात साडे पाच कोटी वृक्षलागवड करण्याची, राज्य सरकारची योजना आहे. यापैकी 4 हजार पेक्षा जास्त रोपटी एकट्या मुंबई शहरात लावली जाणार आहेत. ‘वृक्ष लागवड’ एक जनचळवळ बनवण्यासाठी सरकार प्रसार माध्यमांच्या मदतीने या मोहिमेचा व्यापक प्रसार-प्रचार करत आहे.

फिल्म्स डिविजननेही या मोहिमेविषयी दीड मिनिटांची छोटी चित्रफित बनवली आहे. यात राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि या अभियानाचे सदिच्छादूत अमिताभ बच्चन यांचे संदेश आहेत. ही चित्रफित सध्या राज्यभरातल्या चित्रपटगृहांत दाखवली जाते आहे. या अभियानाविषयी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला, राज्यात सध्या केवळ 20 टक्के वनक्षेत्र असून, ते 33 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची गरज आहे. वनमहोत्सवात लावलेल्या प्रत्येक रोपट्यामुळे हे वनक्षेत्र वाढण्यास मदत होणार असून, त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल, असे त्यांनी पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. त्यांनी फिल्म डिविजनच्या उपक्रमाचे कौतूक केले.

 
PIB Release/MH/132
बीजी -राधिका -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau