This Site Content Administered by
माहिती तंत्रज्ञान दळणवळण

अखिल भारतीय पत्रलेखन मोहीम “ ढाई आखर”

 


मुंबई, 13-7-2017

प्रिय बापू (महात्मा गांधी) तुम्ही मला प्रेरित करता...... या संकल्पनेवर आधारीत ढाई आखर या अखिल भारतीय पत्रलेखन मोहीमेला माननीय केंद्रीय संचार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनोज सिन्हा यांच्या हस्ते 24 जून 2017 रोजी सुरुवात झाली. ही मोहिम 15 ऑगस्ट 2017 पर्यंत सुरु राहणार आहे. पत्रलेखनाची सवय पुनरुज्जीवित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

या पत्रलेखन मोहिमे अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना उद्देशून पत्र लिहिता येईल. टपाल विभागाने प्रसिद्ध केलेले अधिकृत पाकिट वापरून A4 आकाराच्या कागदावर 1000 शब्द मर्यादेपर्यंत पत्र लिहिता येईल, तसेच 500 शब्द मर्यादेपर्यंत पत्र लिहिण्यासाठी आंतरदेशीय पत्राचा सुद्धा वापर करता येईल. सदर पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल (फिलाटेली), महाराष्ट्र सर्कल,मुंबई 400001 या पत्त्यावर ढाई आखर असे ठळकपणे लिहून पाठवावे. हे पत्र, पत्रपेटीत किंवा ग्रामीण भागातील शाखा टपाल कार्यालयांमध्ये देता येईल तसेच प्रधान टपाल कार्यालय, उप टपाल कार्यालय किंवा मुख्य टपाल कार्यालय येथील विशेष पत्रपेटीत टाकता येईल.

ही स्पर्धा सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी खुली आहे. 18 वर्षाखालील व 18 वर्षावरील असे दोन वयोगट आहेत. स्पर्धकाने 500/1000 शब्द मर्यादेत पाठवलेल्या आंतरदेशीय पत्र / पाकिटानुसार सर्व प्रवेशिकांची विभागणी करण्यात येईल. स्पर्धकाने पत्रावर स्वत: आपल्या वयाचे  घोषणापत्र देणे आवश्यक आहे.

वर नमूद केलेल्या 4 गटांमधून सर्वोत्तम 3 पत्रे महाराष्ट्र सर्कल स्तरावर निवडली जातील व त्यांना अनुक्रमे रु.25000/-, रु.10000/- व रु.5000/- ची बक्षिसे दिली जातील. सर्कल स्तरावर निवडली गेलेली पत्रे अखिल भारतीय स्तरासाठी टपाल संचालनालय, नवी दिल्ली येथे पाठवली जातील. संपूर्ण भारतातून मिळालेल्या पत्रांमधून प्रत्येक गटातील 3 सर्वोत्तम पत्रे निवडली जातील. विजेत्यांचा साबरमती आश्रम येथे 02-10-2017 रोजी सत्कार करण्यात येईल तसेच त्यांची पत्रे प्रदर्शनात मांडली जातील. या गटांसाठी मिळणारी बक्षिसांची रक्कम रु.50000/-,रु.25000/-, रु.10000/- अशी आहे.

विजेत्यांची पत्रे महत्वाच्या वर्तमानपत्रात प्रकाशित केली जातील, असे टपाल कार्यालयाने कळवले आहे.

 
PIB Release/MH/136
बीजी -माधुरी -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau