This Site Content Administered by
माहिती तंत्रज्ञान दळणवळण

2.5 लक्ष ग्रामपंचायतींना डिसेंबर 2018 पर्यंत ब्रॉडबँड सेवा पुरविण्याचे बीएसएनलचे लक्ष्य
330 कोटी लागत मूल्याची ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क तंत्रज्ञान योजनेचा शुभारंभ

 


मुंबई, 14-7-2017

केंद्रीय संदेशवहन राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते  नॅशनल सुपर एक्स्प्रेस इन्फोर्मेशन हायवे- नेक्स्ट जनरेशन ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क टेक्नॉलॉजी या योजनेचा लोकार्पण कार्यक्रम आज मुंबई येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमात बोलताना सिन्हा म्हणाले की, डिसेंबर 2018 पर्यंत सरकारने 2 लाख ग्रामपंचायतींमध्ये  100 एमबीपीएस ब्राडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यापैकी आतापर्यंत जवळपास एक लाख ग्रामपंचायतींना 500 च्या वर नेट टू नेट कनेक्टिव्हिटी पोहोचली आहे.

एनजीओटीएन ही 330 कोटी रुपये लागत मूल्याची परियोजना 100 शहरांमध्ये लागू करण्याचे सरकारने ठरवले असून या प्रकल्पाद्वारे 99.99 टक्के कृती क्षमता केंद्र 24X7 तत्वावर बंगलोर येथे चालू करण्यात येणार आहे. 10 जी पासून 100 जी  ऑप्टिकल फायबरची क्षमता वाढवणे असे बीएसएनएलच्या या  प्रकल्पाचे उद्दिष्ट असून बीएसएनएलच्या किरकोळ ग्राहकांना लँडलाईन, एफटीटीएच आणि मोबाईल सेवांच्या क्षमतेत वाढ करुन मिळेल. या सोयींचा उपयोग व्यापारी उपक्रमांना लीज लाईनमध्ये  अल्ट्रा हाय कॅपॅसिटी  वाढविण्यासाठी मदत होईल.

आत्तापर्यंत 100 शहरांपैकी 45 शहरांमध्ये एनजीओटीएन सेवा आजपासून सुरु झाली असून उर्वरित 55 शहरांमध्ये मार्च 2018 पासून ही सेवा उपलब्ध होईल.

मनोज सिन्हा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधुनिक डिजिटल भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने भारताची सुपर हायवेकडे वाटचाल चालू असून उपरोक्त 330 कोटी लागत मूल्यांच्या योजनेच्या तीन टप्प्यांपैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यांनी यावेळी बीएसएनएलने ग्राहकाभिमुख  नॅशनल सुपर एक्स्प्रेस इन्फोर्मेशन हायवे- नेक्स्ट जनरेशन ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क टेक्नॉलॉजी या योजनेच्या पूर्णतेसाठी घेत असलेल्या परिश्रमांचे कौतुक केले.

 
PIB Release/MH/137
बीजी -- -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau