This Site Content Administered by
केंद्रीय मंत्रिमंडळ

‘इंडियन कम्युनिटी वेलफेअर फंड’ मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली, 19-7-2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ‘इंडियन कम्युनिटी वेलफेअर फंड’ अर्थात भारतीय समुदाय कल्याण निधीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. ‘आय सी डब्ल्यू एफ’ ची 2009 मध्ये स्थापना करण्यात आली आहे. आपद्प्रसंगी परदेशस्थ भारतीय नागरिकांना मदत करण्याची गरज निर्माण होते. बिकटप्रसंगी या निधीचा विनियोग केला जातो. या कल्याण निधीच्या वापरासंबंधी जी मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत, त्याचा विस्तार करून अधिक कल्याणकारी विनियोग करण्याच्या उद्देशाने या निधीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता तीन महत्वपूर्ण क्षेत्रात मदतीसाठी ‘आयसीडब्ल्यूएफ’चा विनियोग करण्यात येणार आहे. यामध्ये संकटकाळी भारतीयांना सोडवण्यासाठी, परदेशात भारतीय समुदायाच्या कल्याणार्थ उपक्रम राबवण्यासाठी आणि परराष्ट्रामध्ये दुतावासातील सेवा सुधारण्यासाठी या निधीचा विनियोग करण्यात येणार आहे.

परदेशस्थ भारतीयांना संकटप्रसंगी तातडीने मदत पोहोचवता यावी, यासाठी अतिजलद सेवा निर्माण करण्याला आता प्राधान्य देण्यात येणार आहे.  

लिबिया, इराक, येमेन, दक्षिण सुदान आणि अशा अनेक देशांत संघर्षमय परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तिथे वास्तव्य करणाऱ्‍या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याचे कार्य भारत सरकारने तातडीने केले. अशा बिकट प्रसंगात भारतीय समुदाय कल्याण निधीच्या माध्यमातून चांगला पाठिंबा वेळोवेळी देण्यात आला आहे.  अशा संघर्षमय काळात ज्या भारतीयांकडे त्या देशात रहिवासासंबंधी  कोणतीच कागदपत्रे नसतात, त्यांचे अतिशय हाल होतात. हे लक्षात घेवून आता या कल्याण निधीचा वापर अशा श्रमिकांसाठी करणे शक्य होणार आहे. यामुळे परदेशातील कामगारांचे मनोबल वाढण्यास मदत होणार असून परदेशांतही आपली काळजी घेणारे कोणी आहे, ही भावना निर्माण होऊ शकणार आहे. यासाठी आता ‘इंडियन कम्युनिटी वेलफेअर फंड’ चा वापर परदेशातील ‘इंडियन मिशन आणि पोस्ट’ यासारखा मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे.

 
PIB Release/DL/1146
सप्रे -सुवर्णा -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau