This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

एफटीआईआई आणि फिल्म्स डिव्हीजन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल सिनेमॅटोग्राफी, अॅक्टिंग आणि पटकथा लेखन पाठ्यक्रम अशा तीन लघुक्रम अभ्यासक्रमांना ऑगस्टमध्या पर्यंत सुरवात

 


मुंबई, 24-7-2017

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत,भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे  अर्थात एफटीआयआय आणि  चित्रपट विभाग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने  (एफडी)  मुबंईत , डिजिटल सिनेमॅटोग्राफी, अॅक्टिंग आणि पटकथा लेखन पाठ्यक्रम   असे तीन  लघु चित्रपट संबंधी अभ्यासक्रम जाहीर केले आहेत. हे अभ्यासक्रम ऑगस्टच्या मध्यापर्यंत कार्यान्वित होतील.

तीन आठवडे चालणारा  हा अभ्यासक्रम ऑगस्ट १७,२०१७ पासून फिल्म्स डिव्हिजन कॉम्प्लेक्स, साऊथ मुंबई येथे चालू होणार असून, प्रथम नाव नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्राथमिकता देण्यात येईल. विविध चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. तसेच  हा अभ्यासक्रम पूर्णवेळ असून अरहीवाशी सुद्धा या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ऑगस्ट ७, २०१७ आहे. अधिक माहिती साठी www.ftiindia.com आणि www.filmsdivision.org.   या संकेत स्थळांना आपण भेट देऊ शकता.

हा अभ्यासक्रम  एफटीआईआई चा,"चित्रपट आणि दूरदर्शनद्वारे कौशल्याधारित भारत"  या संकल्पनेचा एक भाग असून, याद्वारे  चित्रपट लघुअभ्यासक्रम  देशभरात पोहचविणे हे उद्दिष्ट आहे.

या पूर्वी  फिल्म अँप्रेसिएशन, चित्रपट संहिता लिखाण , अभिनय, मुलांसाठी  पायभूत अभिनय कार्यशाळा आणि डिजिटल सिनेमोटोग्राफी असे अभ्यासक्रम दिल्ली, पोर्ट ब्लेअर, आणि  मुंबई येथे   राबविले असून श्रीनगर , जयपूर, हरिद्वार, आणि गौहाटी येथे  या पुढे राबविण्याचा विचार असल्याचे एफटीआईआई चे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी म्हटले आहे.  

  एसकेआईएफटीची "ग्लोबल डिजिटल इमॅजिनग  जायन्ट कॅनॉन ही  तांत्रिक भागीदार असून मुंबई तांत्रीक पाठिंब्यासाठी 'यासुका' आणि  'स्टुडिओ असिस्ट' या संस्था  इतर भागीदार म्हणून काम बघतील.

चित्रपट विभागाचे महासंचालक श्री मनीष देसाई म्हणाले की, "चित्रपट आणि दूरदर्शन अभ्यासक्रमात एफटीआईआई ही अग्रणी संस्था असून देशातील लघुचित्रपटांना प्रोत्साहन आणि चित्रपट चळवळ उभारण्याच्या कामाचा अभूतपूर्व अनुभव  फिल्म्स डिव्हिजनला आहे. जर एफटीआईआई आणि फिल्म्स डिव्हिजन या  दोन  संस्थांनी एकत्र काम केल्यास लोकांना दर्जात्मक आणि परवडणारे लघु चित्रपट संबंधित अभ्यासक्रम देता येतील."

 राष्ट्रीय कौशल्य   विकास परिषद (एनएसडीसी ), कौशल्य विकास आणि उपक्रम मंत्रालयातर्फे, एफटीआयआय,पुण्याला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या (पीएमकेव्हीवाय) विशेष प्रकल्प वर्गवारीअंतर्गत, कौशल्याभिमुख  लघु चित्रपट अभ्यासक्रम राबविण्याला शुक्रवारी  मंजुरी मिळाली.  

माध्यम आणि करमणूक क्षेत्रात प्रशिक्षण संस्था म्हणून एफटीआयआयला अनुदान मंजूर झाले असून  चित्रपट आणि दूरदर्शन संबंधित कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम भारतभर राबवायला मंजुरी मिळाली आहे.

 
PIB Release/MH/144
बीजी --

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau