This Site Content Administered by
रस्ते आणि महामार्ग वाहतूक

परिवहन क्षेत्रासाठी वस्तू आणि सेवा कर कायद्याचे फायदे

नवी दिल्ली, 26-7-2017

आंतरराज्य चेक पोस्टवर होणाऱ्या विक्री कर संग्रहण आणि तपासणीमुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन प्रदूषणात वाढ व्हायची. अमेरिकेत एक ट्रक वर्षाला 3 लाख किलोमीटरचा प्रवास करतो. परंतु भारतात मात्र एक ट्रक वर्षाला 50,000 ते 60,000 किलोमीटर एवढाच प्रवास करतो.

आंतरराज्य चेक पोस्टसाठी एकीकृत कर संरचनेची आवश्यकता आहे. यामुळे लांब पल्ल्याचे ट्रक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रवास कालावधी बऱ्यापैकी कमी होईल. यालाच सहाय्यक म्हणून ई-वे विधेयकाचा देखील प्रस्ताव आहे. यामध्ये 50,000 रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या माल वाहतुकीसाठी ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता असेल यामुळे मालवाहतूक सुलभ होऊन संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल.

एका जीएसटीचा अर्थ म्हणजे सुधारित गोदाम संरचना. याआधी विविध कर आकारणीमुळे कंपन्यांना प्रत्येक राज्यात गोदामांची व्यवस्था करायला लागायची.

पूर्वी जीएसटी कालावधीमध्ये अधिकांश मालासाठी वैधानिक कर अंदाजे 26.5 टक्के होता. जीएसटी लागू झाल्यानंतर बहुतांश मालावर 18 टक्के कर आकारला जाईल असा अंदाज आहे. भारतामध्ये सध्या मालवाहतुकीचा खर्च खूप जास्त आहे. इतर देशांमध्ये हा खर्च 6 ते 8 टक्के आहे तर भारतात मात्र हा खर्च अंदाजे 14 टक्के आहे. जीएसटीमुळे हा खर्च 10 ते 12 टक्क्यांवर येईल.

रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मते जीएसटीमुळे खर्च 20 टक्क्यांनी कमी होणार असल्याने भारतातील लॉजिस्टीक क्षेत्राला याचा सर्वाधिक लाभ होणार आहे.

 
PIB Release/DL/1190
बीजी -म्हात्रे -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau