This Site Content Administered by
पंतप्रधान

मन की बात-2017 हे निर्धाराचे वर्ष व्हावे- पंतप्रधानांचे आवाहन

 


मुंबई, 30-7-2017

2017 हे वर्ष निर्धार वर्ष करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या ऑगस्ट महिन्यात, अस्वच्छता,  दारिद्र्य, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद देशातून हद्दपार करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आकाशवाणीवरुन प्रसारीत झालेल्या मन की बात कार्यक्रमात बोलताना करो या मरो ही आजची गरज नसून, नवा भारत घडवण्यासाठी एकत्र येऊन अथक प्रयत्न आणि परिश्रम करण्याचा निर्धार करणे महत्त्वाचे आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

येत्या 9 ऑगस्टला संकल्प से सिध्दी या महामोहिमेचा प्रारंभ करणार असण्याची घोषणाही
त्यांनी केली. आगामी 5 वर्षात हा निर्धार पूर्ण होईल असे त्यांनी स्पष्ट केले. युवा आणि विद्यार्थी संघटना, स्वयंसेवी संस्थांनी नव्या कल्पना मांडण्यासाठी गटवार चर्चा आयोजित करावी, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली. 1942 ते 1947 ही पाच वर्ष जशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी निर्णायक होती, तशीच 2017 ते 2022 या वर्षांची भारताच्या भविष्यासाठी निर्णायक भूमिका असलीच पाहिजे असे ते म्हणाले. आणखी पाच वर्षांनी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करेल. ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे, असे सांगून, 1 ऑगस्ट 1920 ला असहकार आंदोलन सुरु झाले, 9 ऑगस्ट 1942 ला भारत-छोडो आंदोलन सुरु झाले आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला असे पंतप्रधान म्हणाले.

या वर्षी देश,  छोडो भारत आंदोलनाचा 75 वर्धापन दिन साजरा करत आहे आणि  9 ऑगस्ट 1942 ला काय घडले हे नवीन पिढीला माहिती असलेच पाहिजे असे पंतप्रधानांनी सांगितले. यावर्षी 15 ऑगस्ट हा दिवस संकल्प-पर्व म्हणून साजरा व्हायला हवा आणि 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतांना देशाचे परिवर्तन सिध्दीत झाले असेल, असे ते म्हणाले. देशाच्या अनेक भागात विशेषत: आसाम, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम बंगाल मध्ये आलेल्या पूराबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, आपत्तीग्रस्त लोकांच्या मदतीसाठी केंद्र सरकार, सशस्त्र दल, राष्ट्रीय आपत्तीनिवारण पथके तसंच अर्ध सैनिक दले शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पीक विमा योजना अधिक परिणामकारक होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारने विमा कंपन्यांसाठी एक योजना आखली आहे, असे त्यांनी सांगितले. पूर परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी 1078 हा सहाय्यता क्रमांक तसेच 24 तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आल्याचे ते म्हणाले. देशवासियांनी हवामान अंदाजानुसार कामाची आखणी करावी ज्यामुळे ते नुकसानापासून वाचू शकतील, असे आवाहन त्यांनी केले. सध्या हवामान अंदाज उपलब्ध असून तंत्रज्ञान एवढे विकसीत झाले आहे की, कि अनेकदा हे  अंदाज अचूक ठरतात, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी बद्दल बोलताना पंतप्रधानांनी या कराचे फायदे गरीबांपर्यंत पोहचत असल्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले.  सुरुवातीला गरीब व्यक्ती जीएसटी बाबत आपल्याला साशंक वाटत असल्याचे लिहीत असल्या तरी आता पूर्वीपेक्षा गोष्टी सुलभ झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. उद्योग सुलभता अधिक सोपी झाली असून, ग्राहकांचा व्यापाऱ्यांप्रती असणारा विश्वास वाढीला लागला आहे, असे त्यांनी सांगितले. जीएसटीचा वाहतूक क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे, यावर आपण लक्ष ठेवून असून ट्रकस्च्या वाहतूकीतील अडथळे कमी झाल्यामुळे प्रदुषणाची पातळी कमी झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थतज्ञ, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान तज्ञ भारताच्या जीएसटी प्रयोगाबद्दल नक्कीच संशोधन हाती घेतील आणि जगासाठी एक आदर्श म्हणून याबाबत लिहीतील असेही पंतप्रधान म्हणाले.

भारतीय सण आणि उत्सव हे केवळ आनंदाचे प्रसंग नसून ते स्वत:तच सामाजिक सुधारणांची एक मोहिम आहेत. प्रत्येक सण हा गरीबातल्या गरीबाच्या आर्थिक स्थितीशी निगडीत असल्याचे त्यांनी सांगितले. रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेशोत्सव, चौथ चंद्र, दुर्गापूजा, दिवाळी आदी उत्सवादरम्यान गरीबांना उत्पन्न मिळण्याची संधी मिळते आणि यामुळे सणांच्या उस्फूर्त आनंदात भरचं पडते असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. गरीबांना लाभ व्हावा म्हणून लोकांनी विजेच्या दिव्यांऐवजी पणत्यांचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरण स्नेही गणेशमूर्ती असल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. सण आणि उत्सवांना गरीबांच्या आर्थिक कल्याणाशी जोडण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले. समाजात जागरुकता निर्माण व्हावी तसेच एकत्र येण्याची संस्कृती वृध्दिंगत व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. लोकमान्य टिळकांच्या योगदानाचे स्मरण व्हावे यासाठी निबंध स्पर्धा घ्याव्यात तसेच, खुली चर्चा व्हावी असे आवाहनही त्यांनी केले.

भारताच्या लेकी सर्व क्षेत्रांमध्ये देशासाठी गौरवशाली कामगिरी करत असून भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकत्याच झालेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गौरवास्पद कामगिरी केली आहे.  असे ते म्हणाले. भारतीय महिला विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरल्या नाहीत तेव्हा प्रथमच देशातल्या 125 दशलक्ष जनतेने हा पराभव आपल्या खांद्यावर घेतला आणि भारताच्या लेकींवर पराभवाचे ओझे टाकले नाही, असेही मोदी यांनी नमूद केले.

यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन भाषणासाठी लोकांनी आपल्या संकल्पना मायओव्ही किंवा नरेंद्र मोदी ॲपवर पाठवाव्या असे पंतप्रधानांनी सांगितले. लाल किल्ल्याच्या प्रागंणातून जेव्हा आपण देशाला संबोधित करतो तेव्हा आपण 1 अब्ज 25 कोटी देशवासियांचा एकत्रित आवाज असतो, असेही पंतप्रधान म्हणाले. यावर्षी आपण आपले भाषण मर्यादित ठेवणार असून ते 40 ते 50 मिनटांपेक्षा जास्त नसेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

 

 
PIB Release/MH/148
दे -जयश्री -वैभवी

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau