This Site Content Administered by
पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

महाराष्ट्र सरकारचा पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन यांचे संयुक्तपणे स्वच्छथॉन 1.0- स्वच्छ भारत हॅकेथॉनचे आयोजन

 


मुंबई, 10-8-2017

केंद्र सरकारचे पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, महाराष्ट्र सरकारचे पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, जल आणि स्वच्छता सहाय्य संघटना, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग यांनी ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने शुक्रवार 11 ऑगस्ट 2017 रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात स्वच्छथॉन 1.0- स्वच्छ भारत हॅकेथॉन साठी राष्ट्रव्यापी चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. कृषी आणि पणन मंत्री सदाभाऊ खोत, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव शाम लाल गोयल, राज्याच्या स्वच्छता विभागाचे प्रमुख रुचेश जैवंशी, युनिसेफच्या क्षेत्र कार्यालयाच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी आणि पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या सहसचिव व्ही.राधा चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी असतील.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीणला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वच्छथॉन 1.0 चे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीत येणाऱ्या समस्यांवर अभिनव तोडगा काढणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

ओआरएफ मुंबई त्यांच्या महात्मा गांधी स्वच्छता आणि सामुदायिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून स्वच्छथॉनचा अधिकृत ज्ञान भागीदार आणि अंशत: प्रायोजक आहे. मुंबईत होणाऱ्या या चर्चासत्राला युनिसेफ आणि टाटा ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे.

ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन यशस्वी होण्यासाठी पुढील मुद्यांवर देशभरातून सूचना मागवणे हा या स्वच्छथॉन 1.0 चा उद्देश आहे.

1)     शौचालयांच्या वापरावर देखरेख

2)    वर्तणुकीतील बदलावर भर

3)    दुर्गम भागातील शौचालय तंत्रज्ञान

4)    शाळांमधील शौचालयांच्या देखभालीसाठी उपाययोजना

5)    सॅनिटरी नॅपकिन्सच्या सुरक्षित व्हिलेवाटीसाठी तंत्रज्ञानात्मक उपाय

शुक्रवारी होणाऱ्या या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ञ आणि केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी अभिनव कल्पनांबाबत विचारमंथन करतील.

स्वच्छथॉन 1.0 तीन टप्प्यात होणार आहे. पहिली फेरी 25 ऑगस्टपर्यंत खुली असेल, ज्यात ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल. दुसऱ्या फेरीत निवडक 60 सहभागी त्यांच्या संकल्पनांचे प्रत्यक्ष सादरीकरण करतील. 8 आणि 9 सप्टेंबर रोजी अंतिम फेरी होईल.

स्वच्छथॉन 1.0 संबंधी अधिक माहितीसाठी http://innovate.mygov.in/ वर लॉग ऑन करा. अधिक माहितीसाठी द्विप रच्छ यांच्याशी संपर्क साधावा. dwip.rachchh@orfonline.org/+912261313828

 
PIB Release/MH/152
बीजी -काणे -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau