This Site Content Administered by
अर्थ

आर्थिक सर्वेक्षण 2016-17 खंड- 2 मधील सुधारणांची ठळक वैशिष्ट्ये

नवी दिल्ली, 11-8-2017

कृषी आणि अन्न व्यवस्थापन

सुधारणा :  कृषी क्षेत्रातील विविध प्रकारच्या जोखीम कमी केल्यास नफा वाढेल आणि शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळेल. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी पुढील सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.

·         कृषी आणि संलग्न क्षेत्रातील किंमतींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विपणनसंबंधी पायाभूत सुविधा आणि संपूर्ण मूल्य साखळीची मजबूत बांधणी आवश्यक आहे.

·         उत्पादन जोखीमेसंदर्भात, सूक्ष्म सिंचन प्रणालीसारख्या पाण्याची बचत करणाऱ्या सिंचन व्यवस्थांची व्याप्ती वाढवून सिंचन क्षेत्राचा विस्तार करणे.

·         पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी मानके निश्चित करणे.

·         व्यापार आणि देशांतर्गत धोरणातील बदल पेरणी करण्यापूर्वी जाहीर करावेत आणि खरेदी पूर्ण होईपर्यंत कायम रहावेत.

·         दुग्ध उत्पादन प्रकल्पांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी योग्य यंत्रणेच्या माध्यमातून निधीची तरतूद करावी.

·         छोट्या शेतकऱ्यांना वेळेवर आणि किफायतशीर दरात कर्ज पुरवणे सर्वसमावेशक विकासासाठी आवश्यक.

·         वेळेवर हस्तक्षेप करण्याची पद्धती अवलंबण्याची गरज

उद्योग आणि पायाभूत सुविधा

·         रेल्वे स्थानकांचा विकास, स्थानकातील रिक्त इमारतींचा व्यावसायिक वापर, रेल्वेमार्गालगतची जमीन फुलझाडे लावण्यासाठी भाडेतत्वावर देणे, जाहिराती आणि मालवाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेने महसूल वाढवावा.

·         गेल्या काही वर्षात, प्रमुख बंदरांच्या तुलनेत अन्य बंदरांमधून माल वाहतूक होत आहे. त्यामुळे अन्य बंदरांचा विकास करुन त्यांची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे.

·         आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारतीय विमान कंपन्यांचा हिस्सा वाढवण्यासाठी एअर इंडियाचे खासगीकरण/निर्गुंतवणुकीकरण, हवाई उड्डाण केंद्राची निर्मिती आणि 0/20 नियमाबाबत पुनर्विचार आवश्यक आहे.

सामाजिक पायाभूत विकास, रोजगार आणि मानव विकास

·         भारत ज्ञान आधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत आहे, तसेच दोन अंकी विकासदर गाठवण्याच्या तयारीत आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करुन सामाजिक पायाभूत विकास अधिक मजबूत करणे आवश्यक आहे.

·         शैक्षणिक धोरणांची आखणी करताना कौशल्य प्रशिक्षणावर भर देणे गरजेचे आहे.

·         कामगार प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकारने ई-बिझ पोर्टलसारख्या अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

·         सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात यावा.

·         आरोग्य क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी, सरकारने समाजातील गरीब घटकांना आरोग्याचे लाभ पोहोचवायला हवेत. सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण तयार केले असून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या माध्यमातून उत्तम आरोग्य राखणे हा त्याचा उद्देश आहे.

 
PIB Release/DL/1289
सप्रे -काणे -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau