This Site Content Administered by
पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

उघड्यावर शौचाला जाण्याची लोकांची मानसिकता बदलणे सोपे नाही- बबनराव लोणीकर

 

महाराष्ट्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियानाची यशस्वी अंमलबजावणी  


मुंबई, 11-8-2017

महाराष्ट्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. आतापर्यंत, 11 जिल्हे, 156 तालुके आणि 18 हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्याचे महाराष्ट्राचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

मुंबईत आज स्वच्छथॉन 1.0 कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी फार पूर्वी स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन दिले. महात्मा गांधी यांनीही स्वच्छतेवर भर दिला आणि आता पंतप्रधान मोदी हे अभियान पुढे नेत आहेत.

उघड्यावर शौचाल जाण्याची लोकांची मानसिकता बदलणे सोपे नाही. दंडाची तरतूद करण्यात आल्यावर यात बदल होत आहे, असे ते म्हणाले. स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यात आकाशवाणीवरच्या बातमीपत्रांनी संपूर्ण महाराष्ट्रात महत्वाची भूमिका पार पाडली असे त्यांनी नमूद केले.

यावेळी स्वच्छ भारत अभियानाच्या (ग्रामीण) सहसचिव व्ही. राधा यांनी शौचालयाचे तंत्रज्ञान यासह अनेक मुद्दे मांडले.

स्वच्छथॉन 1.0 म्हणजे काय?

स्वच्छथॉन 1.0- स्वच्छता हॅकेथॉन ही स्पर्धा म्हणजे स्वच्छतेच्या क्षेत्रात सुरु असलेले विविध प्रयोग एका व्यासपीठावर यावेत आणि एकमेकांना समजावेत यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या स्पर्धेद्वारे केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने या स्पर्धेमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, व्यावसायिक संस्था, स्टार्टअप्स आणि संबंधितांना नव्या, अनोख्या, अंमलबजावणीयोग्य कल्पना सुचविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या कल्पना पुढील विषयावर विभागांमधील असाव्यात.

1)     शौचालयांचा जास्तीत जास्त वापर

2)    मानसिकतेमधील बदल

3)    दुर्गम भागासाठी शौचालयांची तंत्रे

4)    शालेय शौचालयांचा वापर आणि त्यांची देखभाल

5)    मासिक पाळीदरम्यानचे आरोग्य व्यवस्थापन

6)    मलमूत्राचे कमीत कमी वेळात विघटन

 
PIB Release/MH/154
सप्रे -काणे -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau