This Site Content Administered by
पंतप्रधान

पंतप्रधानांचे स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण 2017- ठळक वैशिष्ट्ये

नवी दिल्ली, 15-8-2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 71 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांच्या भाषणाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-

1.      स्वातंत्र्यदिनानिमित्त माझ्या भारतीय देशबांधवांना शुभेच्छा.  

2.     देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि गौरवासाठी ज्यांनी योगदान दिले, ज्यांनी यातना भोगल्या आणि प्राणांचे बलिदान दिले, त्या सर्व वीरांना,माता आणि भगिनींना देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या वतीने लाल किल्याच्या तटावरून मी वंदन करतो.  

3.     भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महिला आणि पुरुषांनी कठोर परिश्रम घेतले त्यांचे आपण स्मरण करतो.

4.     देशातील काही भागात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांच्या आणि रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भारतीय जनतेने खंबीरपणे उभे राहायला हवे.

5.     हे विशेष वर्ष आहे-भारत छोडो आंदोलनाला 75 वर्षे पूर्ण, चंपारण्य सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष, गणेश उत्सवाची 125 वर्षे

6.     ती "भारत छोडो" चळवळ होती, मात्र आजचा नारा आहे "भारत जोडो"

7.     'नवीन भारत' निर्माण करण्याच्या निर्धारासह आपण देशाला पुढे न्यायचे आहे

8.     1942 ते 1947  या काळात देशाने सामूहिक सामर्थ्याचे दर्शन घडवले, पुढील पाच वर्षात, त्याच सामूहिक सामर्थ्य, कटिबद्धता आणि कठोर परिश्रमाने आपल्याला देशाला पुढे न्यायचे आहे. 

9.     आपल्या देशात, कुणीही मोठा नाही किंवा कुणीही लहान नाही, प्रत्येकजण समान आहे. एकत्रितपणे आपण देशात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

10.  लहान-मोठा भेदभाव न करता 125 कोटी लोकांच्या सामूहिक सामर्थ्यानिशी नवीन भारत बनवण्यासाठी आपल्याला पुढे जावे लागेल.

11.  1 जानेवारी 2018 हा साधारण दिवस असणार नाही- या शतकात जन्मलेले वयाची 18 वर्षे पूर्ण करतील. ते आपल्या देशाचे भाग्य विधाते आहेत.

12.  आपल्याला ही 'चलता है' ची वृत्ती सोडावी लागेल. 'बदलू शकते' याबद्दल आपण विचार करायला हवा- एक राष्ट्र म्हणून ही वृत्ती उपयोगी पडेल.

13.  देश बदलला आहे, बदलतो आहे आणि बदलू शकतो. या विश्वासासह आणि कटिबध्दतेसह आपल्याला पुढे जायचे आहे.

14. देशाच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. अंतर्गत सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. महासागर असो किंवा सीमा, सायबर जगत असो किंवा अंतराळ, सर्व प्रकारच्या सुरक्षेसाठी भारत सक्षम आहे.

15.  नक्षलवाद, दहशतवाद, घुसखोरी, शांतता भंग करणाऱ्या बाह्य शक्ती असोत, आपल्या जवानांनी बलिदानाची पराकाष्ठा केली आहे. जगाला भारताचे सामर्थ्य आणि लक्ष्यभेदी हल्ल्यातील ताकद मान्य करावेच लागले. 

16.  एक पद, एक निवृत्तीवेतन धोरणामुळे आपल्या सुरक्षा दलांचे मनोधैर्य वाढले.

17.  ज्यांनी आपला देश लुटला, गरीबांना लुटले, ते आज शांतपणे झोपू शकत नाहीत.

18.  बेनामी संपत्ती असलेल्यांसाठी अनेक वर्षे कुठलाही कायदा पारित करण्यात आला नव्हता. अलिकडेच, बेनामी संपत्ती कायदा पारित झाल्यानंतर, सरकारने 8०० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली. जेव्हा अशा गोष्टी घडत असतात, तेव्हा सामान्य माणसाला वाटते कि हा देश प्रामाणिक लोकांसाठी आहे.

19.  आज, आपण "प्रामाणिकपणाचा उत्सव" साजरा करत आहोत.

20. जीएसटीने सहकारी संघवादाच्या  भावनेचे दर्शन घडवले. जीएसटीचे समर्थन करण्यासाठी देश एकत्र आला आणि तंत्रज्ञानाची भूमिका सहाय्यभूत ठरली.

21.  आज आपल्या देशातील गरीब मुख्य प्रवाहात सहभागी होत आहे आणि देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.

22. सुशासन प्रक्रियेचा वेग आणि सुलभीकरण देते.

23. भारताची मान जगात उंचावत आहे. दहशतवादाविरुध्दच्या लढाईत  जग आपल्याबरोबर आहे. या मदतीसाठी मी सर्व देशांचे आभार मानतो.

24. जम्मू-काश्मिरच्या  प्रगतीसाठी आपल्याला काम केले पाहिजे.

25. दहशतवाद  किंवा दहशतवादांविरुध्द  नरमाईचा प्रश्नच उद्‌भवत नाही.

26. गोळीने किंवा हेटाळणीने नव्हे तर प्रेमानेच आपण काश्मीरची समस्या सोडवू शकतो.

27. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुध्दची आमची लढाई सुरुच राहील. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

28. दहशतवाद किंवा दहशतवाद्यांविरुध्द नरमाईचा  प्रश्नच उद्‌भवत नाही.

29. व्यवस्थेप्रमाणे जनता नाही तर जनतेप्रमाणेच व्यवस्था चालली पिाहजे.

30. नवीन भारत लोकशाहीची सर्वात मोठी ताकद असेल.

31.  मागणी आणि तंत्रज्ञानाच्या बदलानुसार रोजगाराचे स्वरुप बदलत आहे.

32. आम्ही आमच्या युवकांना रोजगार मिळवणारा बनवण्यापेक्षा रोजगार देणारा बनवत आहोत.

33. तीन-तलाकमुळे त्रास सहन करावा लागलेल्या महिलांच्या धैर्याचा  मी आदर करतो.  आम्ही सर्वजण त्यांच्या  या आंदोलनात त्यांच्या सोबत आहोत.

34. भारत हा शांती, एकता आणि सद्‌भावना यांचे प्रतिक आहे. जातीयवादाला येथे थारा नाही.

35. आस्थेच्या नावाखाली हिंसाचाराला भारतात  स्वीकारले जाणार नाही.

36. देश शांतता, सद्‌भावना आणि एकतेने वाटचाल करतो. सर्वाना बरोबर घेऊन जायचे हा  या देशाच्या संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे.

37. आपण देशाला विकासाच्या नव्या मार्गावर पूर्ण गतीने घेऊन चाललो आहोत.

38. आम्ही पूर्व भारताकडे (बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, ओदिशा, ईशान्य भारत) प्रामुख्याने लक्ष  देत आहोत. या भागांचा आणखी विकास व्हायला हवा.

39. अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करण्यासाठी आमचे शेतकरी अधिक मेहनत घेत आहे.

40. प्रधानमंत्री कृषी विमा योजनेंतर्गंत सुमारे 5.75 कोटी अधिक शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

41. देश शांतता, एकता आणि सद्‌भावनेने पुढे वाटचाल करत आहे.

42. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत, 30 प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर 50 प्रकल्पावर काम सुरु आहे.  

43. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत,शेतकऱ्याला बियाणे खरेदीपासून ते उत्पादन बाजारात जाईपर्यंत आम्ही  आधार पुरवत आहोत.

44.जिथे अद्याप वीज पोहोचली नव्हती अशा, 14000 पेक्षा जास्त खेड्यात वीज पोहोचवण्यात आली.

45. 29 कोटी जन धन खाती उघडण्यात आली.  

46. कोणत्याही तारणाशिवाय 8 कोटीपेक्षा जास्त युवकांना कर्ज पुरवण्यात आले.

47. भारताच्या उज्वल भविष्यासाठी आणि आपल्या जनतेच्या कल्याणासाठी आम्ही, भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहोत.

48. काळा पैसा आणि  भ्रष्टाचाराविरोधातला आमचा लढा जारी राहील, देशाची लूट होऊ दिली जाणार नाही.

49. भ्रष्टाचारमुक्त  भारतासाठीच्या आमच्या प्रयत्नांना फळे येत आहेत.  

50. 1.25 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा उघड.

51.  1.75 लाखाहुन अधिक बनावट कंपन्या बंद करण्यात आल्या.

52. वस्तू आणि सेवा कर लागू केल्यानंतर वाहतूक क्षेत्रात क्षमता वृद्धी,कार्यक्षमतेत 30 टक्क्यापर्यंत वाढ

53. विमुद्रीकरणामुळे, बँकात अधिक पैसा आल्याने त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना येईल.

54. जगातील सर्वाधिक  युवा वर्ग आपल्या देशात  आहे.सध्या माहिती तंत्रज्ञानाचा दबदबा असून डिजिटल व्यवहारांच्या दिशेने वाटचाल करूया.

55. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करूया, भीम अँपचा वापर करूया.

56. सहकार्यात्मक संघीयवादाकडून आपण स्पर्धात्मक संघवादाकडे वळलो आहोत. 

57. आपल्या पुराणशास्त्रात म्हटले आहे,की योग्य वेळी एखादे काम पूर्ण केले नाही तर त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही.

58. टीम इंडियाने, नव भारत बनवण्याचा  संकल्प करण्याची हीच  योग्य वेळ.

59. आपण सर्व मिळून असा भारत घडवू, जिथे गरिबाकडे पक्के घर असेल, त्यात वीज असेल, पाणी असेल.

60. आपण सर्व मिळून असा भारत घडवू, जिथे,शेतकऱ्याला विवंचना नसतील,  तो सुखाची झोप घेऊ शकेलत्याचे उत्पन्न आजच्यापेक्षा दुप्पट होईल.

61.  असा भारत घडवण्याचा निर्धार करू, जिथे युवकांना, महिलांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध असेल.

62. असा भारत घडवण्याचा निर्धार आहे, जिथे,दहशतवाद,जातीयवादाला थारा नसेल

63. आपण सर्व मिळून असा भारत घडवुया, जिथे भ्रष्टाचाराला, वशिलेबाजीला  थारा नसेल

64. आपण सर्व मिळून असा भारत घडवुया, जो स्वच्छ,  तंदुरुस्त असेल आणि स्वराजाचे स्वप्न पूर्ण करेल. 

65. दिव्य आणि भव्य भारत घडवण्याची आकांक्षा धरूया.

 

 
PIB Release/DL/1313
ए.एस -शै.पा. -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau