This Site Content Administered by
रस्ते आणि महामार्ग वाहतूक

इलेक्ट्रॉनिक टोलवसुलीसाठी फास्ट टॅग सुलभ उपलब्ध व्हावेत, यासाठी एनएचएआयने उचलली पावले
 

येत्या 1 सप्टेंबरपासून सर्व टोल प्लाझांवर फास्ट टॅग वाहनांसाठी विशेष मार्गिका


नवी दिल्ली, 17-8-2017

इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीसाठी फास्ट टॅग सुलभ उपलब्ध व्हावेत, यासाठी एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिझर्व्ह बँक आणि एनपीसीआय यांच्याशी चर्चा करुन दोन क्रांतीकारी पावले उचलली आहेत. यात फास्ट टॅगच्या ऑनलाईन विक्रीसह सर्व टोल प्लाझांजवळ सामायिक सेवा केंद्राच्या माध्यमातून ऑफलाइन विक्री करण्यात येईल.

फास्टटॅग जारी करणाऱ्या बँका, एनएचएआय, आयएचएमसीएल यांच्या संकेतस्थळांवरुन फास्टटॅगची ऑनलाईन खरेदी करता येईल आणि कुरिअरने ते ग्राहकांच्या घरी पोहोचवले जाईल. यामुळे फास्टटॅग अधिक सुलभपणे उपलब्ध होऊन विक्रीत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

ऑनलाईन खरेदीविक्री उद्या 18 ऑगस्टपासून टोल प्लाझांच्या जवळ उभारल्या जाणाऱ्या सामायिक सेवा केंद्राच्या विक्री केंद्रांवरही फास्टटॅगची खरेदी करता येईल.

फास्टटॅग वाहनांसाठी येत्या 1 सप्टेंबरपासून एक विशेष मार्गिकाही सुरु केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोखरहित अर्थव्यवस्था मोहिमेला अनुसरुन एनएचएआय आपल्या अधिकारक्षेत्राखालील सर्व टोल प्लाझांवर ईटीसी आधारभूत ढाच्याची उभारणी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी काम करत आहे. एनएचएआय उचलत असलेल्या पावलांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुगम आणि सुरक्षित होईल.

 
PIB Release/DL/1329
बीजी -सो.कु. -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau