This Site Content Administered by
गृह

आपद्काळात शांघाय सहकार्य संघटनेने सदस्य देशांना मदत द्यावी- राजनाथ सिंह

नवी दिल्ली, 24-8-2017

भारत हा वेगाने प्रगती करणारा देश असून आपत्तीच्या काळात होणारी जीवित आणि वित्तीय हानी कमीत कमी व्हावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सक्षम आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज शांघाय सहकार्य संघटनेच्या नवव्या बैठकीत केले. या परिषदेमध्ये राजनाथ सिंग भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

भारतावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केला जात आहे. भूकंप, भूस्खलन, अतिवृष्टीमुळे महापूर, चक्रीवादळे, साथीचे आजार यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे देशात 1996 ते 2015 या काळात तीन लाख जणांचे बळी गेले. 1990 मध्ये ओडिशामध्ये आलेल्या चक्रीवादळात जवळपास दहा हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र यानंतर हवामानाचा, चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा अचूक अंदाज वर्तवण्याची सुविधा देशात निर्माण झाल्यामुळे नुकसानीचे प्रमाण एक टक्क्यांवर आले आहे. अति उष्णतेची लाट आल्यानंतर उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूंमध्येही आता कमालीची घट आली आहे. कारण हवामानशास्त्र विभागाकडून पुरेशी पूर्वसूचना मिळत असल्याने सावधानतेचे उपाय योजणे शक्य होते, असेही राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले.

सन 2016 मध्ये आम्ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना तयार केली आहे, या योजनेची अंमलबजावणी आमच्या देशातल्या 90 टक्के जिल्ह्यांमध्ये केली जाते. जीवितहानी कमी करण्यासाठी मदत होत आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांना भूकंपामुळे होणारी हानी हा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. गेल्या 20 वर्षात या देशांमध्ये दोन लाख लोकांचा मृत्यू भूकंपामुळे झाला. हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व देशांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. भूकंपामुळे होणारी हानी टाळण्यासाठी संयुक्त प्रयत्नांचा भाग म्हणून मदत पथकांची नियुक्ती करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.

आपल्याकडे पायाभूत सुविधांचा विकास करताना भूकंपासारख्या आपदेला तोंड देणाऱ्या आपत्तीमध्ये टिकून राहणाऱ्या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांचा शाश्वत विकास होऊ शकणार आहे. तसेच आपण सर्व देशांनी धोक्याची सूचना देणारी यंत्रणा अधिक सक्षम, अत्याधुनिक साधनांनी युक्त करण्याची गरज आहे. हवामानशास्त्र विभागाकडून अधिक अचूक अंदाज व्यक्त कसे होतील, धोक्याचा इशारा दिला गेला तर संबंधित क्षेत्रामध्ये सावधानतेचे उपाय केले जातात का, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे राजनाथ सिंह यांनी या बैठकीत सांगितले.

 
PIB Release/DL/1372
बीजी -सुवर्णा -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau