This Site Content Administered by
परराष्‍ट्र व्‍यवहार

विदेश मंत्रालय आता लोकाभिमुख – स्वराज

 

नवीन तंत्रज्ञानयुक्त ‘ई-सनद’ स्वराज यांच्या हस्ते उद्‌घाटित


मुंबई, 27-8-2017

केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयाच्या प्रदेश में विदेश या उपक्रमांतर्गत, लोकांना नागरी विदेशी सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विदेश भवन या नावाने आज एकात्मिक सार्वजनिक कार्यालय परिसराचे उद्‌घाटन केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झाले.

विभागीय पारपत्र कार्यालय, विदेशी नागरीक संरक्षण कार्यालय, शाखा सचिवालय आणि भारतीय सांस्कृतिक सहसंबंध परिषद (आयसीसीआर), मुंबई ही चार कार्यालये बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स या परिसरांतर्गत आणण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन करतांना केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, विदेशी सहसंबंध सर्व पातळ्यांवर प्रस्थापित करण्यासाठी आमच्या सरकारने प्रत्येक राज्यात विदेश भवन स्थापन करण्याचे ठरविले असून, मुंबई विदेश भवन हे पहिले कार्यालय आहे. वर्ष 2014 पासून प्रभावशील आणि संवेदनशील सरकार या माध्यमातून प्रक्रियेला गती, कार्यपद्धती आणि विदेशी मंत्रालयाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम केले आहे, असेही त्या म्हणाल्या.

पारपत्र सेवा केंद्रांच्या संदर्भात बोलतांना स्वराज म्हणाल्या की, वर्ष 2014 मध्ये 77 केंद्रे होती, गेल्या सहा महिन्यात 235 नवीन केंद्रे स्थापन होऊन, गेल्या तीन वर्षात आता 251 केंद्रे आहेत. तसेच विदेशी भारतीय नागरीकांना अनेक गहन समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु ‘त्वरीत प्रवासी विदेशी सेवा’ केंद्रांच्या उपलब्धतेमुळे आता जागतिक पातळीवरील भारतीय विदेशी नागरीकांनी समस्यांचे निराकरण होईल, असा विश्वास ठेवायला हरकत नाही. आतापर्यंत 80 हजाराहून जास्त समस्यांग्रस्त भारतीय विदेशी नागरीकांना मदत देण्यात आली असल्याचे स्वराज यांनी सांगितले.

पारपत्र कार्यालयाची, पारपत्र क्लिष्ट अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी अनेक कायदे सोपे करण्यात आल्याने अभिकर्त्यांद्वारे बेकायदेशीर मागणीला आळा बसून, पुढील काही वर्षात पारपत्रधारकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या की, अवास्तव विदेशी नियम आणि कायद्यांचे परिक्षण करण्यात येऊन, प्रक्रियांना प्रवाहात आणण्यात येईल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचे स्वागत करतांना सांगितले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, अनेक विदेशी कार्यालये, जवळपास शंभरहून अधिक वेगवेगळ्या राष्ट्रांचे परराष्ट्र संबंधी विषयक अधिकारी इथे कार्यरत आहेत.

राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करण्यास बांधिल असून, सर्व पोलीस कार्यालये डिजिटल झाली असून, इंटरकनेक्टेड असल्याने पोलीस पडताळणी सोपी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय विदेश राज्यमंत्री डॉ.विजय कुमार सिंह यांनी सांगितले की, प्रदेश में विदेश या संकल्पनेची अंमलबजावणी ‘कमाल प्रशासन किमान सरकार’ या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. यामुळे उपरोक्त चारही कार्यालये एका छत्री खाली कार्यरत होऊन वेळेचा आणि आर्थिक अपव्यय टाळण्यास मदत होईल.

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते नवीन तंत्रज्ञान युक्त ई-सनदचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी दमण आणि दिव या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये, मुंबईचे महापौर विजय महाडेश्वर आणि राज्य तसेच केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पार्श्वभूमी :

विदेश मंत्रालयाशी संबंधित विभागीय पारपत्र कार्यालय, मुंबई हे 1954 पासून कार्यरत असून, 12 जिल्ह्यांमध्ये पारपत्र कार्यालये कार्यरत आहेत. मुंबईमध्ये 5 पासपोर्ट सेवा केंद्रे अर्ज स्वीकारण्याचे आणि पारपत्र सेवा देण्याचे काम करतात. आतापर्यंत 8 लाख पारपत्रधारक आहेत.

विदेशी नागरीक संरक्षण कार्यायल, मुंबई (पीओई)ची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली. ज्याद्वारे भारतीय नागरीकांना 18 ईसीआर देशांमध्ये काम करण्यासाठी इमिग्रेशन क्लियर्न्स देण्यात येतो. ई मायग्रेटच्या ईफ गव्हर्नर्सच्या माध्यमातून विदेशी भारतीय नागरीकांना ऑनलाईन मंजूरी देण्यात येते आणि त्यांच्या तक्रारींवर सल्लेही देण्यात येतात.

भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाने 29 जून 2016 रोजी मुंबई येथे शाखा सचिवालय सुरु केले, जे देशातील कोलकाता, हैदराबाद, चेन्नई आणि गुवाहाटी या चार कार्यालयानंतर पाचवे कार्यालय राहील. ई-सनद या माध्यमातून व्यक्तीगत, शैक्षणिक आणि व्यवसायिक कागदपत्रांची पडताळणी सुविधा प्रदान केली जाते.

आयसीसीआर, मुंबई 1954 मध्ये स्थापन करण्यात येऊन, या द्वारे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि विदेशी प्रतिनिधी मंडळाच्या सांस्कृतिक देवाण-घेवाणीसाठी हे कार्यालय प्रदर्शन, परिषद, उत्सवांचे आयोजन करत असते.

 
PIB Release/MH/168
बीजी --दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau