This Site Content Administered by
अर्थ

वित्त मंत्रालय: भारतीय अर्थव्यवस्था आणि जनतेसाठी विमुद्रिकरण अतिशय लाभकारी

नवी दिल्ली, 30-8-2017

500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 ला घेतला.काळा पैसा नष्ट करणे, बनावट चलनाला आळा घालणे,दहशतवादाला मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाच्या मुळा वर घाव घालणे,कर विषयक पायाचा विस्तार आणि डिजिटलायझेशनला  चालना देणे हा यामागचा उद्देश होता.

30 .6.2017 पर्यंत 15.28 लाख कोटी रुपये मूल्याच्या विनिर्दिष्टीत नोटा बँकेत पुन्हा जमा झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.8 नोव्हेंबर 2016 रोजी सर्व मूल्याचे 17.77 लाख कोटी रुपयाचे चलन व्यवहारात होते.तर 4 ऑगस्ट 2017 रोजी 14.75 लाख कोटी मूल्याचे चलन व्यवहारात आहे.

बँकेत जमा झालेल्या या विशिष्ट नोटा काळा पैसा असण्याची शक्यता लक्षात घेऊन ऑपरेशन क्लीन मनी, 31 जानेवारी 2017 ला हाती घेण्यात आले. 18 लाख खाती, छाननी अंती त्यांच्या करविषयक माहितीशी मिळती जुळती नसल्याचे आढळून आले.त्यांच्याशी एसएमएस आणि ई मेल द्वारे संपर्क साधण्यात आला. नोव्हेंबर 2016 ते मे 2017 पर्यंत 17526 कोटी अघोषित उत्पन्न सापडले तर 1003 कोटी रुपये जप्त करण्यात आले. यासंदर्भात छाननी चालू आहे.

विमुद्रिकरणाचा परिणाम म्हणून प्राप्तिकर विवरण पत्रे भरण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.या आधीच्या  वर्षाच्या 9.9 % तुलनेत,5.8.2017 पर्यँत विवरणपत्र भरणाऱ्याच्या संख्येत,  24.7% वाढ झाली.

विमुद्रिकरणामुळे दहशतवाद आणि नक्षलवाद याना मिळणारे आर्थिक पाठबळ जवळ जवळ संपूर्णतः थांबले आहे.

विमुद्रिकरणामुळे बचतीच्या सवयीत बदल घडला असून संघटित वित्तीय बाजारात तुलनेत अधिक निधी येऊ लागला आहे.

वस्तू आणि सेवा करा अंतर्गत जमा झालेल्या महसूलाचे काही अंशी श्रेय विमुद्रीकरणाला जाते.

52.4 कोटी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्यात आले. 35 कोटी लाभार्थींच्या खात्यात वार्षिक 74000 कोटी रुपयाची रक्कम थेट जमा केली जाते.भीम अँप आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस द्वारे सुरक्षित डिजिटल पेमेंट सुविधा निर्माण करण्यात आली असून भारतीय विशेषतः गरीब ही डिजिटल व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील.

विमुद्रिकरणाचे अल्पावधीचे चांगले परिणाम दिसून आले असून दीर्घ मुदतीचे सकारात्मक परिणामही भारतीय अर्थव्यवस्था आणि जनतेच्या कल्याणा प्रति आपले योगदान अद्यापही देतच आहेत.

 
PIB Release/DL/1390
बीजी -नि चि -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau