This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

राष्‍ट्रीय चित्रपट वारसा प्रकल्पाचा एन एफ ए आय मध्ये शुभारंभ देशाचा चित्रपट वारसा जतन करण्यासाठी सरकार कटीबध्द-माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यांची ग्वाही  

 


नवी दिल्ली, 28-1-2017

भारताचा चित्रपट वारसा जपण्यासाठीच्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यांनी पुण्यात एन एफ ए आय मध्ये चित्रपट स्थिती मूल्यमापन प्रकल्पचा शुभारंभ केला. सरकारनं हाती घेतलेल्या 600 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेचा चित्रपट स्थिती मूल्यमापन प्रकल्प हा एक भाग आहे. या प्रकल्पाअंतर्गत एन एफ ए आय इथं चित्रपटांच्या सुमारे 1 लाख 32 हजार रिळांच्या स्थितीचं मूल्यमापन केलं जाईल आणि या रिळांचं आयुष्य वाढावं यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात येतील. आर एफ आय डी च्या द्वारे प्रत्येक रिळावर लक्ष ठेवलं जाईल.

देशाचा चित्रपट आणि चित्रपट बाह्य वारसा जतन करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय कटीबध्द आहे आणि जागतिक दर्जा प्रमाणेच हा वारसा भावी पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी सर्व पावलं उचलत आहे, असं अजय मित्तल यांनी सांगितलं. याबाबत अधिक माहिती देताना मित्तल म्हणाले कि हा जगातील अनोखा प्रकल्प आहे ज्यात भावी पिढ्यांसाठी चित्रपटांचा वारसा जतन करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे.

चित्रपटाशी संबंधित अन्य सामुग्रीचे डिजिटायजेंशन करणारा एनएफएआय चा उपक्रम देखील मित्तल यांनी सुरु केला. सरकारच्या डिजिटल भारत उपक्रमांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले असून देशाच्या बिगर फिल्मी वारशाचे डिजिटायजेंशन केले जाईल असे ते म्हणाले. एनएफएआयकडे पोस्टर्स, छायाचित्रे, गाणी, प्रेस क्लिपिंग आदी सामुग्रीचा मोठा साठा आहे.

एन एफ एच एम हा देशाच्या वैभवशाली वारश्याला पूर्व स्थितीत आणणं, या वारश्याचं डिजिटायझेशन करणे, जतन करणे यासाठी देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नॅशनल फिल्म अर्काव्हीज ऑफ इंडिया अर्थात एन एफ ए आय ही या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठीची मुख्य संस्था आहे. पूर्वस्थितीत आणण्यासाठी देशभरातील चित्रपटांची नावं सुचवण्यासाठी एन एफ ए आय देशाच्या विविध भागातल्या चित्रपट आणि इतिहासकारांची मदत घेत आहे.

भारतीय भाषांमधील 1 हजार 600 लघुपट आणि 1 हजार 100 हून अधिक चित्रपटांचे येत्या 5 वर्षात डिजिटायझेशन करणे आणि त्यांना पूर्वस्थितीत आणणे हे सोपं काम नसल्याचे एन एफ ए आय चे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. मुंबईत असणाऱ्या मुख्य प्रवाहाच्या हिंदी चित्रपट उद्योगासह देशभरातल्या चित्रपट निर्मात्यांचा एन एफ ए आय च्या या प्रकल्पाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल मगदूम यांनी आनंद व्यक्त केला. सोशल मिडीयाचा वापर केल्यामुळे आम्ही अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो असं त्यांनी सांगितलं.

ईशान्य चित्रपट महोत्सव

चित्रपट स्थिती मूल्यांकन प्रकल्पाच्या शुभारंभासोबतच एन एफ ए आय नं चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या सहकार्याने तीन दिवसांच्या ईशान्य चित्रपट महोत्सवाचं एन एफ ए आय सभागृहात आयोजन केले आहे. भास्कर हजारीकांच्या कोठानोडी या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ झाला. यावेळी ईशान्येकडील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.

या महोत्सवात 14 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये लोकटाक लैरंबी हा मणिपुरी चित्रपट, ओनाथ हा खासी चित्रपट तसंच सबीन अलुन या करबी भाषेतल्या गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचा समावेश आहे. ऊत्पल बोरपुजारी यांच्या मेमरीज ऑफ अ फरगॉटन वॉट आणि चित्रपट प्रभागाच्या 1962-तेजपूर हे चित्रपट दाखवण्यात येतील.

 
PIB Release/DL/16
दे -जयश्री -वैभवी

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau