This Site Content Administered by
पंतप्रधान

आनंदी रहा आणि अधिक गुण मिळवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना गुरुमंत्र

 


मुंबई, 29-1-2017

विद्यार्थी आणि पालकांनी परिक्षांकडे एक ताण म्हणून नाही तर उत्सव म्हणून पहावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी आज हा गुरुमंत्र दिला. ताणरहित दृष्टीकोनामुळे विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास त्यांना परीक्षा केंद्रात सहाय्यभूत ठरेल, असे ते म्हणाले. परीक्षा हा जीवन मरणाचा प्रश्नही नाही तसेच यशाचे मूल्यमापन करण्याचा निकषही नाही असे ते म्हणाले. परीक्षांच्या काळात  संपूर्ण कुटुंबात तणावाचे वातावरण असते असे पंतप्रधान म्हणाले.

हवाई दलाची भरती परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या दिवंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचे उदाहरण देऊन पंतप्रधान म्हणाले की, जर कलाम यांनी त्यावेळी आशा सोडून दिली असती तर देशाला एवढा विख्यात शास्त्रज्ञ आणि प्रेरणादायी राष्ट्रपती मिळाला नसता. ध्येय पूर्तीची संकल्पना आणि महत्वाकांक्षा यांच्यातील सुयोग्य ताळमेळ म्हणजेच आयुष्य असल्याचे ते म्हणाले. गुणांमागे धावण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्य मिळवावे आणि आत्मविश्वास आणि निर्धार विकसित करवा असेही त्यांनी सांगितले. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपण स्वतःशीच स्पर्धा केली पाहिजे, असे सांगून त्यांनी विख्यात विक्रमवीर सचिन तेंडुलकर याचे उदाहरण दिले.

मुलांच्या आयुष्यात पालकांची भूमिकाही महत्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले. पालकांनी स्वीकार, शिकवणे आणि वेळ देणे या तीन गोष्टींवर भर देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. पालकांनी आपल्या मुलांना जसे आहे तसे स्वीकारावे कारण अपेक्षा हे अनेक प्रश्नाचे मूळ असते असे त्यांनी सांगितले. पालकांच्या अपेक्षांचे ओझे हे अनेक वेळा शाळेच्या दप्तराच्या ओझ्यापेक्षाही अधिक असते असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी योग्य आराम , झोप आणि शारीरिक हालचाली हे महत्वाचे घटक आहेत. पुस्तक आणि परीक्षांचे निकाल याव्यतिरिक्तही जग असल्याचे त्यांनी सांगितले.

हक्क आणि कर्तव्य हि लोकशाहीची दोन चाके असून नागरिकांनी त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांकडे अधिक लक्ष पुरवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. नागरिकांची हक्क आणि कर्तव्य याबाबत सखोल चर्चा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

शौर्य पुरस्काराने सन्मानित वीर जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या युवकांनी शौर्य पुरस्कार विजेत्यांची गाथा जाणून घेऊन त्यांच्या या शौर्याचा प्रसार करावा असे आवाहन पंतप्रधानीं केले. जम्मू आणि काश्मीर मधील हिमस्खलनात मृत्यू पावलेल्या जवानांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

1 फेब्रुवारी रोजी 40 वर्षे पूर्ण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाने देशाप्रती केलेल्या सेवेबद्दल त्यांनी आभार मानले आणि तटरक्षक दल हे जगातील सर्वोत्तम 4 दलांपैकी असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.

उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असून उद्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी 2 मिनिटांचे मौन बाळगले जाते. या मौनातून  हुतात्म्यांबद्दलची आपली कृतज्ञता प्रतिबिंबित होते असे ते म्हणाले. 1 फेब्रुवारीला येणाऱ्या वसंत पंचमीबद्दल त्यांनी देशाला शुभेच्छा दिल्या.

मन की बात या कार्यक्रमाचे हिंदी प्रसारण झाल्यानंतर लगेच हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमधून प्रसारित करण्याच्या आकाशवाणीच्या पुढाकाराबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केले.

 
PIB Release/MH/18
दे -सो.तु. -वैभवी

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau