This Site Content Administered by
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग

वर्ष 2020 पर्यंत 5 कोटी महिलांना सौर चरखा प्रशिक्षणाचे उदिृष्ट तर लिज्जत पापड समुहाच्या 5 कोटी महिलांना स्वयंचलित यंत्र प्रशिक्षणाचे उद्दिष्ट- गिरीराज सिंग

 


मुंबई, 15-9-2017

महात्मा गांधीच्या स्वप्नातील भारतात चरख्याच्या जास्तीत जास्त वापराद्वारे स्वावलंबी व्हावे हे उद्दिष्ट होते. त्यांच्या स्वप्नपुर्ततेसाठी आम्ही वर्ष 2020 पर्यंत 5 कोटी महिलांना सौर चरखा प्रशिक्षण देण्याचे ठरवले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी आज मुंबईत केले.

ते लिज्जत पापड श्री महिला गृह उद्योग समूहाच्या 51 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

सिंग पुढे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत या उद्योगाचा खारीचा वाटा असला तरी या समुहाने महिलांना 1952 पासून स्वकर्तृत्वावर उद्यमशीलता शिकवली. लिज्जत पापड उद्योग समूहाला खादी ग्राम उद्योगाने मान्यता दिली. आज या समूहाचा वटवृक्ष झाला असून वार्षिक उलाढाल सोळाशे कोटी रुपये तर सरासरी वार्षिक दरडोई उत्पन्न 6,000 रुपये आहे.

बदलत्या यांत्रिकीकरणाच्या युगात लघू उद्योगांनी सुद्धा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून या क्षेत्रात संशोधन आणि विकासाची गरज असल्याचे गिरीराज सिंग यांनी सांगितले. त्यांनी लिज्जत पापड विपणन विभागाची विशेष बैठक घेऊन पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी आणि स्वयंचलित यंत्राचा वापर करण्यास अभिप्रेरित करण्यासाठी कर्ज योजना चालू करावी असे सूचवले. यामुळे बेरोजगारी कमी होईल. ते पुढे म्हणाले की, या समुहांतर्गत काम करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या नावाने लिज्जततर्फे एक विक्री केंद्र असायला हवे. यासाठी केंद्र सरकारच्या विशेष अर्थसहाय्य योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

लिज्जत पापड समूहाचा वार्षिक अहवाल सादर केल्यानंतर संस्थेचे ऑडिटर भरत व्यास यांनी संस्थेची आर्थिक स्थिती समाधानकारक असून वर्ष 2017-18 मध्ये 750 कोटी रुपये निव्वळ विक्री झाली असल्याचे तर 65 कोटी पेक्षा जास्त निर्यात झाली असल्याचे सांगितले. महात्मा गांधींच्या 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचे उदिृष्ट ठेवून त्यांनी महिलांना 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवड्यात विशेष स्वच्छता अभियान राबविण्याचा आग्रह केला.

यावेळी धर्मदाय संयुक्त आयुक्त करमरकर, प्रसिद्ध सिने अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, विमल बेन, जसवंती बेन पोपट, प्रतिभा सावंत, स्वाती पराडकर आणि हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

पार्श्वभूमी- श्री.महिला गृह उद्योग लिज्जत पापड ही विविध उत्पादन निर्मिती करणारी (जसे पापड, मसाला, कणीक,ससा डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप इत्यादी) महिला संस्था असून लिज्जत पापड या समूहाचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईत आणि  देशभरात 81 शाखा तसेच  27 विभागीय कार्यालये आहेत. तर 43,000 महिला भारतभर कार्यरत आहेत.

 
PIB Release/MH/173
बीजी -- -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau