This Site Content Administered by
युवक कल्‍याण व क्रीडा

आगामी तीन ऑलिम्पिक स्पर्धांसाठी कृती योजना तयार करण्यासाठी कार्यदलाची स्थापना-विजय गोयल

नवी दिल्ली, 30-1-2017

2020, 2024 आणि 2028 मध्ये होणाऱ्या आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कृती योजना तयार करण्यासाठी कार्य दल समितीची स्थापना करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिल्याचे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल यांनी आज सांगितले. या समितीतील सदस्य पुढीलप्रमाणे:-

पुलेसा गोपीचंद-ऑलिम्पिकपटू आणि प्रशिक्षक

अभिनव बिंद्रा- ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता

राजेश कालरा- मुख्य संपादक, टाईम्स समूह ऑनलाईन

ओम पाठक- शालेय क्रीडा प्रसार फाऊंडेशन

विरेन रसक्वीन्हा- मुख्य कार्यकारी अधिकारी-ऑलिम्पिक गोल्ड क्वटेट

एस. बलदेव सिंग (हॉकी)-प्रशिक्षक

प्राध्यापक जी.एल.खन्ना-प्राध्यापक आणि अधिष्ठाता, उपयोजित विज्ञान विभाग, मानव रचना आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, फरीदाबाद

संदीप प्रधान- महासंचालक, गुजरात क्रीडा प्राधिकरण

गरज भासल्यास ही समिती इतर विशिष्ट क्रीडा तज्ञांना निमंत्रित करू शकते, असे विजय गोयल यांनी सांगितले. या समितीचा कार्यकाळ 3 महिने अथवा आपला अहवाल सादर करेपर्यंत यापैकी जो सर्वात लवकर असेल.

या कृती दलाने संदर्भ देण्यासाठी केलेल्या सूचना

·         आगामी 3 ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारतीय क्रीडापटूंच्या परिणामकारक सहभागासाठी लघु, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांसह सर्वंकष कृती योजना सुचवणे

·         2020 च्या ऑलिम्पिकसाठी संभाव्य पदक विजेते त्यांचे प्रशिक्षक निश्चित करण्यासाठी परिणामकारक पध्दती सुचवणे.

·         2024 आणि 2028 ऑलिम्पिकसाठी परिणामकारक प्रणाली सुचवणे

·         केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय ऑलिम्पिक संघटना, राष्ट्रीय क्रीडा महासंघ, स्वयंसेवी संस्था आदींच्या प्रयत्नात एकसूत्रता आणणे.

·         देशातील प्रशिक्षणाचा दर्जा सुधारणे

·         उच्च दर्जाच्या क्रीडपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि त्यांचा दर्जा वाढवणे.

 
PIB Release/DL/149
बीजी -जयश्री -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau