This Site Content Administered by
पंतप्रधान

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त 21 सप्टेंबर 2017 रोजी आयोजित केलेल्या सहकार संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 21-9-2017

देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सहकारी चळवळीशी संबंध असलेले तुम्ही सर्व मान्यवर,

लक्ष्मणराव इनामदारजींच्या शताब्दी सोहळ्यामुळे या सहकारी चळवळीला आणखी गती मिळावी, नवी ऊर्जा मिळावी आणि समाजाविषयी एका संवेदनेने सामान्य मानवी समस्यांच्या निराकरणाचे मार्ग एकत्र बसून कशा प्रकारे शोधले जावेत, एकमेकांना साथ-सहयोग आणि सहकाराद्वारे समस्यांचे निराकरण कशा प्रकारे करावे, याबाबत आज दिवसभर बसून तुम्ही व्यापक विचारमंथन देखील करणार आहात.

आपला देश बहुरत्न वसुंधरा आहे. प्रत्येक कालखंडात, प्रत्येक भू-भागातील समाजासाठी जगणारे, समाजाला काही ना काही तरी देऊन जाणा-यांची साखळी अगणित आहे.

कोणताही कालखंड असा असू शकत नाही, कोणताही भू-भाग असा नसतो जेथे आजही समाजाला समर्पित व्यक्तींचे लक्ष आपल्याकडे जात नाही. आपण दिसत नसतो. काही लोक असे असतात जे टीव्हीमुळे, वर्तमानपत्रांमुळे, प्रचारांच्या माध्यमांमुळे, आपल्या कार्यकाळातील मान-सन्मानांमुळे लोकांमध्ये चर्चेत राहतात आणि चर्चेत राहत असल्यामुळे कधी-कधी खूप महान देखील वाटू लागतात. पण हा देश असा हे, ज्यामध्ये एक खूप मोठा वर्ग असा आहे जो कधीही वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमध्ये असत नाही, टीव्हीवर कधीही चमकत नाही. त्यांचे फार कौतुक होत नाही, मान-सन्मान, पुरस्कारासारखे त्यांच्या वाट्याला काही येत नाही. पण एका मूक साधकासारखे जीवन जगता जगता एका दिव्यापासून दुसरा दिवा असे करत हजारो दिवे जळतात. अशा प्रकारे तीळ-तीळ जळत राहत, शरीराच्या कणा-कणातील आदर्शांसाठी, मूल्यांसाठी खपत राहत आपले जीवन जगत राहतात. त्यांचे चेहरे अनोळखी असूनही, त्यांच्या द्वारे देशाला जे मिळते, त्याचे मोल अजिबात कमी होत नाही. वकील साहेबांचे जीवन देखील अशाच प्रकारच्या व्यक्तींच्या जीवनासारखे होते.

आज अनेक लोक असा देखील प्रश्न उपस्थित करतील की आम्ही तर कधी यांचे नाव ऐकले नव्हते आणि तुम्ही तर त्यांची शताब्दी साजरी करत आहात. मला असे वाटते की त्यांचे नाव कोणी ऐकले नव्हते हीच तर त्यांची सर्वात मोठी कमाल होती. स्वतःला नेहमीच त्यांनी प्रसिध्दीपासून लांब ठेवले आणि मला असे वाटते की सहकाराच्या यशस्वितेचा पहिला मंत्र हाच असतो की स्वतःला जितके होईल तितके लांब ठेवायचे आणि सर्वांना एकत्र आणून लोकांना पुढे न्यायचे, हाच सहकाराचा सर्वात मोठा मंत्र आहे.

त्यांनी व्यक्तींना घडवण्यासाठी आपले आयुष्य खर्ची  घातले, राष्ट्र निर्मितीचा मार्ग त्यांनी शोधला. माझ्या आयुष्याचा खूप मोठा कालखंड त्यांच्या सोबत घालवण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या तरुणपणी मी अनेक वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहिलो आणि त्यामुळेच माझ्यासाठी वकील साहेबांचे जीवन नेहमीच एक प्रेरणेचा स्रोत राहिले. जेव्हा मी त्यांच्या जीवनावर पुस्तकाचे लिखाण करत होतो; 25-30 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे आणि जेव्हा मी त्यातील तपशील पाहात होतो तेव्हा मी चकित होत होतो. कारण मी देखील त्यांच्याकडे राहात होतो, इतक्या वर्षांपासून राहात होतो. पण अनेक गोष्टी अशा होत्या, ज्यांची माहिती त्यांच्या जाण्यानंतर समजली. म्हणजे त्यांनी आयुष्य कशा प्रकारे व्यतित केले असेल याचे हे उत्तम उदाहरण आहे. अतिशय साधेपणाचे जीवन आणि तरीही स्वतःला नेहमीच प्रकाशात येऊ न देणे. सहकारी पुढे गेले पाहिजेत, सहका-यांचे सामर्थ्य वाढले पाहिजे, विचारांना ताकद मिळाली पाहिजे, आपल्यातीलच या महान परंपरेमधील एक अनमोल रत्नाच्या रूपात त्यांनी काम केले.

शताब्दी वर्षा निमित्त अनेक कार्यक्रम होतील. सहकार चळवळीला एक नवे सामर्थ्य मिळेल. पण आज जेव्हा आपण वकील साहेबांच्या शताब्दी वर्षानिमित्त सहकारी क्षेत्रामध्ये त्यांचे जे योगदान होते, त्याचे स्मरण करत पुढे वाटचाल करत आहोत तेव्हा दिवसभर बसून तुम्ही चर्चा करणार आहात, जगात सहकारिता क्षेत्रात सर्वोत्तम रिवाज काय आहेत, याची चर्चा करणार आहात.

कृषी क्षेत्रात आपण सहकाराच्या माध्यमातून पुढे कसे जायचे, 2022 पर्यंत आपल्या शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल. अशा कोणत्या गोष्टींना आपण समाविष्ट केले पाहिजे, अशा कोणत्या चुकीच्या सवयींचा आपण त्याग केला पाहिजे जेणेकरून आपल्या ग्रामीण जीवनाला आधुनिक भारताच्या संदर्भात सज्ज केले पाहिजे. विकासाच्या त्या दिशेने तयार केले पाहिजे.

आता शहर पुढे जात असताना आपण गावांना मागे ठेवत जाऊ हे तर अजिबात शक्य नाही. एका संतुलित विकासाची गरज असते. समान सधींची गरज असते आणि सम्यक विकास, समान संधींच्या मुळाशी सहकाराचा मंत्र असतो. काळानुरूप व्यवस्थेमध्ये काही दोष येतच असतात. काही व्यवस्था कालबाह्य होत असतात. सहकारी क्षेत्राशी संबंध असलेल्या प्रत्येकाने आत्मचिंतन करत राहिले पाहिजे. असे तर नाही ना की सहकार एक संरचना आहे, एक कायदे व्यवस्था आहे. एका घटनात्मक चौकटीमध्ये, नियमांच्या चौकटीमध्ये काही तरी तयार झालेली एक गोष्ट आहे आणि या चौकटीत आपण स्वतःला बसवले तर आपणही सहकारी बनतो. मला असे वाटते की सर्वात मोठी चूक तर त्याच वेळी होईल.

इतका मोठा देश आहे. त्यासाठी व्यवस्थेची गरज लागते, नियमांची गरज लागते, संरचनेची आवश्यकता असते. ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याची आवश्यकता असते. हे तर गरजेचे आहे. मात्र, सहकारिता अशा प्रकारे चालत नाही. सहकार ही एक भावना आहे. सहकार ही एक व्यवस्था नाही, एक भावना आहे आणि ही भावना संस्कारांसाठी आवश्यक आहे आणि म्हणूनच इनामदारजी वारंवार सांगत होते, बिना संस्कार नाही सहकार.

आज काही-काही वेळा असे दिसते की भावना एखाद्या रचनेच्या पायामध्ये हरवून तर गेली नाही ना. सहकाराच्या भावनेला पुनर्जीवित करण्यासाठी, पुन्हा तिच्यात चेतना आणण्यासाठी आपल्यासाठी वकील साहेबांपेक्षा मोठी प्रेरणा काय असू शकते आणि जितक्या जास्त प्रमाणात आपण सहकाराच्या भावनेला बळ देऊ, त्या प्रकारे व्यवस्थेमध्ये अंतर्गत काही दोष असले तरी देखील कदाचित त्या व्यवस्था ठीकठाक होऊन जातील.

आपल्या देशात सहकाराच्या संपूर्ण चळवळीचा पाया ग्रामीण भाग राहिलेला आहे. पण ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही की हेच कायदे आणि नियमांच्या अंतर्गत जेव्हा शहरी सहकाराचे विश्व निर्माण होऊ लागले, त्यातही जेव्हा बँकिंग क्षेत्रामध्ये, तेही शहरी, त्यानंतर जे रंग-रुप बदलू लागले, त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या, शंका-कुशंकांची व्याप्ती वाढत गेली. आजही ग्रामीण जीवनाशी जोडल्या गेलेल्या सहकाराच्या चळवळीत तिच्या पवित्रतेची जाणीव होते.

शेतक-यांना देखील असे वाटते की हो हा माझ्यासाठी योग्य मार्ग आहे आणि याच कामासाठी असलेल्या सहकारी चळवळीसाठी वेळ देणा-यांनाही हे वाटते की मी या माध्यमातून गाव, गरीब शेतकरी यांच्यासाठी काही तरी करत आहे. आता तुम्ही लोक इतकी चर्चा आज करणार आहात. एक लहानसा विषय आहे माझ्या मनात, जो मी तुमच्यासमोर मांडत आहे. त्यावर तुम्ही नक्कीच चर्चा कराल.

आपल्या देशात शेतक-यांच्या अनेक समस्या आहेत, पण एक गोष्ट जर आपण पाहिली, तर जे शेतकरी खरेदी करतो तो किरकोळ भावाने आणि जेव्हा विक्री करतो ती घाऊक भावाने. हे या उलट होऊ शकते का, तो घाऊक भावाने खरेदी करेल आणि किरकोळ भावाने विकेल? तर कोणीही त्याला लुबाडणार नाही. कोणतेही दलाल त्याची फसवणूक करू शकणार नाहीत. ज्या लोकांनी दुग्धव्यवसायाचा अभ्यास केला आहे, सहकारी दुग्धकेंद्रांचा, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या, त्याचे हे वैशिष्ट्य आहे; शेतकरी घाऊक स्वरुपात खरेदी करतो, घाऊक स्वरुपात विकतो. बघा हे याचे वैशिष्ट्य आहे. दुग्धव्यवसायाच्या यशस्वितेचा गाभा हा आहे की तो खरेदी करतो घाऊक पद्धतीने आणि विकतो घाऊक पद्धतीने. काय? पूर्वी जो दूध उत्पादन करायचा तो दहा घरांमध्ये एक-एक लीटर दूध विकायला जायचा. आज दहा लीटर दूध घेऊन एकाच संकलन केंद्रात जातो, दूध देऊन परत येतो. याचा अर्थ तो घाऊक स्वरुपात विकतो आणि तो खरेदी करतो ती देखील दुग्धकेंद्राद्वारे, त्याचा पशुआहार आहे, औषधे आहेत, त्यांची निगा राखायची आहे पशुंची, ही सर्व व्यवस्था सामूहिक स्वरुपात संपूर्ण गावाला मिळते.

त्याचा एक परिणाम हा दिसून आला की दुग्धकेंद्रामध्ये कोणाला कोणाला बळ मिळत राहिले, ते वाचत राहिले, अतिरिक्त उत्पन्नाचे साधन बनले. बाकी प्रत्येक क्षेत्रात त्याची काही ना काही समस्या आहे. जर आपण हेच असे मानूया की तो खाजगी व्यक्तीला घाऊक पद्धतीने दूध देत राहिला असता तर त्याची इतकी कमाई झाली नसती. तो सहकारी होता आणि म्हणूनच त्याच्या कमाईचा हा आधार बनला. मग आपण एक अशी सहकारी चळवळ उभी करू शकतो का जी एक तर परंपरागत पद्धतीने सुरू राहिली आहे. पहिल्यांदा पाच लोक होते, ते लोक चालवायचे, मी दाखवून देईन मी सहावा बनेन, एक नव्या सहकाराचे रूप बनले आहे. पण तिथे पाच चालतात, चालू द्या आणि असे दहा विषय आहेत की ज्यामध्ये कोणीच पाऊल ठेवलेले नाही, आपण या नव्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करून सहकाराद्वारे तिथल्या समस्यांचे निराकरण करू शकतो का? अशी अगणित क्षेत्रे आहेत जिथे सहकारी चळवळीचे वारे पोहोचलेले नाहीत. जिथे पोहोचले आहेत तिथे खूप जास्त स्पर्धा आहे; साखर क्षेत्र आहे त्यात खूप स्पर्धा आहे, दूध आहे खूप स्पर्धा आहे. जिथे काही ना काही आहे तिथे स्पर्धा असणे नैसर्गिक बाब आहे. पण अशी अनेक क्षेत्रे आहेत, ज्यामध्ये एका पिढीला कष्ट करावे लागतील, तेव्हा कुठे सहकाराचे सामर्थ्य वाढीला लागेल.

आपण एका नव्या पिढीला, नव्या भावनेने आणि विशेष करून ग्रामीण जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी सहकारी चळवळीमध्ये प्रेरित करू शकतो का? आपल्या देशाच्या स्वभावासाठी सहकारी चळवळ अगदी अनुकूल आहे. ही आपण दुस-या कोणाकडून उधारीवर घेतलेली विचार प्रणाली नाही. ही आपल्या मुलभूत चिंतन स्वभाव- संस्कार यांना अनुरूप असलेली व्यवस्था आहे आणि म्हणूनच ती या ठिकाणी रुजणे नैसर्गिक आहे. म्हणूनच ती आपल्याला ओढून ताणून लादावी लागणार नाही. बाकी सर्व व्यवस्था आपण आणतो, जर दुस-याकडून स्वीकारलेली व्यवस्था एक परकीय घटकाच्या रुपात प्रतिरोधकारी होत राहत असेल तर आपली ही बाब साध्यासोप्या नैसर्गिक व्यवस्थेचा भाग आहे, आपण एकत्रितपणे ते करू शकतो. 

आता ज्या प्रकारे नीम कोटिंग युरियाचे काम सुरू आहे. त्याचा शेतक-यांना खूप फायदा झाला आहे. त्यामुळे युरियावरून नेहमी होणारा गोंधळ बंद झाला आहे. हे नीम कोटिंग करण्यासाठी कडुनिंबाच्या पानांना गोळा करायचे, त्यांना एकत्र करून त्याचे तेल काढायचे आणि तेल काढून त्यांना युरिया बनवणा-या कारखान्यांपर्यंत पोहोचवायचे, हे एवढे मोठे नवे काम  आता सुरू झाले आहे. जर आमच्या गावातील महिलांची सहकारी संघटना बनली आणि या नीम कोटिंगसाठी कडुनिंबाची जी गरज आहे, केवळ पाने जमा करायची जंगलातून, जिथे कडुनिंबाची झाडे आहेत तिथून पाने जमा करायची. आता पाहा एक नवे उद्योजकतेचे क्षेत्र खुले होऊ शकते, नवा सहकार सुरू होऊ शकतो.

आमचे जितके दुग्धकेंद्र वाले मित्र आहेत त्यांना मी वारंवार सांगत राहतो की तुम्ही शेतक-यांना पशुपालनासाठी प्रेरित तर करता. आपल्याला आग्रहाने मधमाशी पालनावरही भर दिला पाहिजे. मधाची क्रांती केली पाहिजे. मधुर क्रांती आणली पाहिजे देशात. सहकारी चळवळीद्वारे ही मधुर क्रांती होऊ शकते. मध, ज्या प्रकारे शेतकरी पशुपालन करतो, दूध उत्पादन करतो, तशाच प्रकारे आपल्या 50 मधमाशा निश्चित करायच्या आणि वर्षाला दीड दोन लाख रुपये अगदी सहजपणे कमाईत वाढ होऊ शकते आणि जी दुग्धकेंद्रे आहेत तिथे दूध द्यायला जाताना, सोबत मधही घेऊन जायचा, मध न्यायचा. ज्या प्रकारे या दुग्धकेंद्रात प्रक्रिया केली जाते त्याच प्रकारे याची प्रक्रिया झाली पाहिजे. याची बाजारपेठ आहे. जे रासायनिक मेण असते, जर ते 100 रुपयात विकले जाते तर मधमाशांनी तयार केलेले मेण आहे ते 400-450 रुपयात विकले जाते. याला मोठी मागणी आहे. भारतात याची खूप मोठी बाजारपेठ आहे. पण आजही आमचे शेतकरी या क्षेत्रापासून लांब आहेत. मधमाशांचे शेकडो प्रकार आहेत. मधमाशांमुळे देखील शेतीला फायदा होत असतो आणि आज जे फलोत्पादनात काम करत आहेत, त्यांच्यासाठी तर मधमाशा एखाद्या दुताचे काम करत असतात, एक कॅटल एन्गेजरचे काम करते. सांगायचे तात्पर्य हे आहे की अशी अनेक नवी क्षेत्रे आहेत ज्या क्षेत्रात आपण पुढे कसे जायचे? आता आपले समुद्र किनारे आहेत. समुद्र किना-यावरील आपले जे मच्छीमार बंधुभगिनी आहेत. वर्षातील पाच महिने त्यांचे काम जवळ जवळ बंद होते. हवामानामुळे, पावसाळ्यात समुद्रात जाणे धोकादायक असते, यामुळे बंद होऊन जाते. मात्र, आपल्या कडे सागरी शैवालाची शेती विशेष लोकप्रिय नाही झाली आहे. आपल्या समुद्र किना-यांवर आपल्या मच्छिमार बंधुभगिनींनी जर सहकारी चळवळीच्या माध्यमातून सागरी शैवालाची शेती केली तर आज औषध निर्माण क्षेत्रासाठी ते एक मोठ्या प्रमाणावरील मुलभूत साहित्याच्या रुपात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. प्रयोगशाळेमध्ये सिद्ध झालेली ही वस्तू आहे. औषधनिर्माण क्षेत्रात या सागरी शैवालाची गरज असते. अशी कल्पना करा की सागरी शैवालाला बाजारपेठ मिळाली नाही, केवळ त्याला समुद्रात, त्याचे 45 दिवसांचे जीवनचक्र असते. 45 दिवसांनतर त्याचे पीक तयार होते. दर 45 दिवसांनी त्याचे पीक मिळत राहते. जर अशा शैवालाला तुम्ही 45 दिवसात समुद्रात पसरले तर दररोज तुम्हाला त्याचे पीक घेता येते. काही करायचे नाही. केवळ त्याचा रस काढायचा आणि शेतांमध्ये त्याचा रस शिंपडण्याचे काम करायचे. तरी देखील मोठ्या बाजारपेठेपेक्षा जमिनीचे संरक्षण करण्याचे खूप मोठे काम सागरी शैवालाच्या रसाने होऊ शकते. काहीच करायचे नाही आहे. विना कष्टाचे काम आहे. सहकारी चळवळीच्या माध्यमातून समुद्र किना-यांवर आपले मच्छिमार बांधव ज्यांचे काम जवळ जवळ पाच महिने बंद राहते, ज्यांच्या कुटुंबातील महिला दिवस-रात्र घरात असतात, त्यांच्यासाठी या संधी खुल्या होऊ शकतात.

माझ्या सांगण्याचे तात्पर्य हे आहे की आपल्या येथे ग्रामीण अर्थकारणात बदल घडवून आणण्यासाठी सहकार चळवळ लहान लहान गोष्टींच्या माध्यमातूनही मोठे परिवर्तन आणू शकते.

मी असा आग्रह करेन की वकील साहेबांनी जी भावना आणि तत्वे सहकारी चळवळीशी जोडली, ज्या संस्कार तत्वांना सहकारी चळवळीशी  जोडले, ज्या संवेदनशीलतेला सहकारी आंदोलनाशी जोडण्याचा आग्रह धरला, त्या मुलभूत तत्वांना सोबत घेऊन मुलभूत विचारांना घेऊन, आज सहकारी चळवळीशी संबंध असलेले जे बंधू या ठिकाणी आलेले आहेत ते याचा आणखी प्रचार-प्रसार करतील आणखी लोकांना या चळवळीत सामील करतील आणि पूर्णपणे आमची सहकारी चळवळ ख-या अर्थाने सामान्य माणसाच्या हक्कांचे रक्षण करताना त्याला समान भागीदारीसोबत पुढे जाताना उपयोगी ठरेल.

याच एका अपेक्षेने वकील साहेबांचे पुण्य स्मरण करताना तुम्हा सर्वांना मनापासून खूप-खूप शुभेच्छा देत आहे. धन्यवाद.

 
PIB Release/DL/1522
बीजी -शै.पा. -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau