This Site Content Administered by
अवजड उद्योग व सार्वजनिक

इतर देशांवरील अवलंबित्व कमी करायचे असल्यास ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देणे गरजेचे- अनंत गीते

 


मुंबई, 22-9-2017

केंद्रीय जड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेचा दाखला देत सांगितले की, भारतासमोर जागतिक उद्योग स्पर्धेचे आव्हान जरी असले आणि मित्र राष्ट्रांना मदत करण्याची कटीबद्धता जरी असली तरी देशांतर्गत उद्योगांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. आज आपण लहानलहान गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून राहतो. जसे की, मोटारीच्या बॅटरी आपण चीनकडून आयात करतो. परंतु जर विदेशी सहकार्याने तंत्रज्ञान आत्मसात केल्यास याच वस्तू देशांतर्गत निर्मिती करता येऊ शकतात. ज्यामुळे आपले इतर देशांवरील अवलंबित्व कमी होईल.

ते आज भारतीय विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक निर्मिती संस्था अर्थात आयईईएमए यांनी आयोजित केलेल्या वार्षिक परिषद 2017 आणि ‘मेक इन इंडिया-एनहान्सिंग ग्लोबल फूटप्रिंट’ या विषयावरील परिषदेत मुंबई येथे बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की,  सरकार उद्योग, जड उद्योग, लघु उद्योग या सर्वांना सर्वोतोपरी मदत करण्यास बांधिल असून नुकत्याच तयार करण्यात आलेल्या भांडवली मालधोरण अंतर्गत सरकार तंत्रज्ञान, विकास, संशोधन आणि निर्यातीला प्रोत्साहन देणार आहे.  भारताने येत्या 10 वर्षात जागतिक व्यापारात विद्युत अवजारांच्या 5 टक्के वाटा वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवावे जेणेकरून भारताची निर्यात 25 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत वाढेल असे त्यांनी सांगितले. त्यांनी वर्ष 2030 पर्यंत इलेक्ट्रीक मोबिलिटी अर्थात विद्युत वहन 100 टक्के वाढविण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले.

विदेशी व्यापार महासंचालनालयाच्या संयुक्त सचिव सोनिया सेठी म्हणाल्या की, ‘मेक इन इंडिया’ धोरणाला पाठिंबा देण्यासाठी विदेशी व्यापार संचालनालयाने भारतात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजना राबवतांना निर्माण झालेल्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण केंद्राद्वारे त्वरित तक्रार निपटारा करण्यात येईल. सेठी पुढे म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत विदेशी व्यापार 2 ते 2.5 टक्क्यांनी वाढला असला तरी आपण निर्यात संवर्धन आणि नियामक पध्दती यामधले अंतर समजून घ्यायला हवे. त्यांनी डीजीएफटीने विदेशी व्यापार संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला. तसेच उद्योग प्रतिनिधी किंवा उद्योग संस्थांकडून विविध स्तरावर सूचना  मागवल्या आहेत.

या परिषदेला कोरिया, श्रीलंका, इराण, इराक, व्हिएतनाम आणि अमेरिका यांचे उद्योग प्रतिनिधी, आयईईएमएचे विविध राष्ट्रांतील प्रतिनिधी, वाणिज्य मंत्रालयाच्या संयुक्त सचिव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 
PIB Release/MH/180
बीजी -काणे -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau