This Site Content Administered by
अर्थ

खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि बँकिंग व्यवस्थेची क्षमता सुधारणे ही दोन प्रमुख आव्हाने-अरुण जेटली

 


मुंबई, 22-9-2017

विकासाला चालना देण्यासाठी खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि बँकिंग व्यवस्थेची क्षमता सुधारणे ही बँकिंग क्षेत्रातील दोन प्रमुख आवहाने आहेत असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत इंडियन बँक्स असोसिएशनच्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बोलत होते. सरकार बँकिंग व्यवस्थेला मदत करेल आणि तिच्या बळकटीकरणासाठी वेगाने पावले उचलेल असे आश्वासन जेटली यांनी यावेळी दिले. भारताच्या बँकिंग व्यवस्थेला मदत करण्यासाठी सरकार संसाधनांचा शोध घेईल जेणेकरून ती देशाच्या अर्थव्यवस्थेची जीवनरेखा बनू शकेल असे ते म्हणाले.

वित्तीय समावेशन हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रमुख यशापैकी एक आहे. भौगोलिक मर्यादा असूनही बँकिंग सेवा आज घराघरात पोहोचली आहे असे जेटली म्हणाले.

बँकांच्या अनुत्पादित मालमत्तेच्या समस्येबाबत सरकारला चिंता वाटत असल्याचे जेटली म्हणाले. सुधारणा करण्याची क्षमता आणि आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता भारताकडे आहे, असे ते म्हणाले. आयबीएचे अध्यक्ष राजीव ऋषी, उपाध्यक्ष चंदा कोचर आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आयबीएची पार्श्वभूमी:

भारतातील बँकांचे व्यवस्थापन पाहणारी प्रातिनिधीक संस्था म्हणून इंडियन बँक्स असोसिएशनची 26 सप्टेंबर 1946 रोजी मुंबईत स्थापना झाली. 1946 मध्ये भारतातील 22 बँका या संस्थेच्या सदस्य होत्या. सध्या 237 बँका सदस्य आहेत. भारतीय बँकिंग व्यवस्थेच्या विकास, समन्वय आणि मजबुतीकरणासाठी आयबीएची स्थापना करण्यात आली. इंडियन बँक्स असोसिएशनच्या व्यवस्थापनासाठी एक समिती असून त्यामध्ये एक अध्यक्ष, 3 उपाध्यक्ष, 1 मानद सचिव आणि 26 सदस्यांचा समावेश आहे.

 
PIB Release/MH/183
बीजी -काणे -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau