This Site Content Administered by
रेल्‍वे

रेल्वे सुरक्षेबाबत मुंबईत उच्चस्तरीय बैठक
प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी, रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी घेतले महत्वाचे निर्णय
पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत मुंबईच्या सर्व उपनगरीय रेल्वे गाड्यात सी सी टी व्ही कॅमेरे

नवी दिल्ली, 30-9-2017

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत रेल्वे सुरक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे त्याचबरोबर देशातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याच्या सुरक्षा उपाययोजनांचा सर्वंकष आढावा गोयल यांनी या बैठकीत घेतला. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. प्रवाशांची  सुरक्षितता अधिक वाढावी यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना सक्षम करण्यासह अनेक महत्वाच्या निर्णयांचा यात समावेश आहे.

यामधले ठळक मुद्दे-

रेल्वे पादचारी पूल, फलाट आणि फलाटाच्या टोकाचा पदपथ यांची  गणना सुरक्षाविषयक बाबींमध्ये  करण्यात आली असून  त्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी निधीची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. यापूर्वी,रेल्वे स्थानकातील केवळ पहिला पादचारी पूल आवश्यक तर त्यानंतरचा पादचारी पूल हा प्रवाशांची सुविधा मानण्यात येत असे.

पुढच्या 18 महिन्यांसाठी , रेल्वे विभागांच्या महाव्यवस्थापकांना, सुरक्षितता विषयक बाबीसाठी अमर्याद अधिकार सोपवण्यात आले आहेत. हे महा व्यवस्थापक  आठवड्याभरात,वित्तीय आयुक्तांना तरतुदींच्या मंजुरीसाठी कळवतील आणि वित्तीय आयुक्त 15 दिवसात त्याची पुष्टी करतील. एकमत  न  झाल्यास, अंतिम निर्णयासाठी ही बाब रेल्वे मंडळासमोर ठेवली जाईल.

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या जास्त वर्दळीच्या स्थानकांसाठी,आणखी  सरकते जिने मंजूर करण्यात आले असून येत्या 15  दिवसात याबाबतचा तपशील निश्चित केला जाईल.देशभरातल्या जास्त वर्दळीच्या इतर रेल्वे स्थानकांबाबतही असाच   निर्णय घेण्यात आला. येत्या 15 महिन्यात, मुंबईतल्या सर्व उपनगरीय रेल्वे गाड्यामध्ये, देखरेख करणाऱ्या यंत्रणेसह, सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येतील.याचबरोबर,देशभरातही हे काम सुरु करण्यात येईल.

 प्रकल्प अंमलबजावणीसाठी, मुख्यालयातून 200 अधिकारी स्थानांतरित केले जातील.

कामांना जोम येण्यासाठी देशभरातल्या प्रमुख 75 स्थानकांमध्ये, उत्साही आणि तडफदार स्थानक संचालकांची नियुक्ती केली जाईल.

लाल फितशाही टाळण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी, ऑक्टोबर  2017  पर्यंत फिल्ड युनिट्सना  वित्तीय आणि प्रशासकीय अधिकार हस्तांतरित केले जातील.

 या उपाययोजनांमुळे रेल्वेच्या कार्य आणि कामकाजात आणखी सुधारणा होईल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा दर्जा उंचावेल  असे पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट इथल्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीला, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्वनी  लोहानी, रेल्वे मंडळाचे सर्व सदस्य यांच्यासह  पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए के गुप्ता, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा आणि राज्य सरकारचे सुरक्षा अधिकारी  उपस्थित होते.

 
PIB Release/DL/1576
सप्रे -नि चि -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau