This Site Content Administered by
राष्ट्रपती

स्वच्छतेसाठी काम करणे ही मानवतेची सेवा आहे तर अस्वच्छता हा समाजासाठी अभिशाप आहे- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
स्मार्ट स्वच्छता आणि स्मार्ट कचरा व्यवस्थापनामुळे स्वच्छता अभियानाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होईल

 


मुंबई, 1-10-2017

2014 पासून सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची उद्दिष्ट पूर्ण करणे ही महात्मा गांधींच्या जयंतीदिनी त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत शहरी महाराष्ट्राला हागणदारीमुक्त घोषित करण्यासाठी आयोजित समारंभात बोलत होते.

हागणदारीमुक्त अभियानात पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले. त्यांनी प्रत्येकाला सार्वजनिक शौचालये, स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्याचे आवाहन केले.

स्वच्छतेसाठी काम करणे ही मानवतेची सेवा आणि तर अस्वच्छता हा समाजासाठी अभिशाप आहे आणि त्यामुळे आर्थिक विकासाला खीळ बसते असे राष्ट्रपती म्हणाले. शौचालयं बांधल्यामुळे दूषित पाण्यामुळे होणारे आजार कमी व्हायला मदत होईल, असंही त्यांनी सांगितले. स्मार्ट स्वच्छता आणि स्मार्ट कचरा व्यवस्थापन यामुळे स्वच्छता अभियान यशस्वी व्हायला मदत होईल. या क्षेत्रात महाराष्ट्रात झालेले काम अन्य राज्यांसाठी प्रोत्साहन देणारे ठरेल, असे ते म्हणाले. स्वच्छ भारतामुळे निरोगी आणि समृद्ध भारताकडे वाटचाल करता येईल यावर त्यांनी भर दिला.

शहरी महाराष्ट्र हागणदारी मुक्त घोषित करण्यासाठी आयोजित समारंभात राष्ट्रपतींनी काही स्थानिक संस्था आणि स्वच्छता कार्यकर्त्यांना सन्मानित केले.

यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शहरी महाराष्ट्र हागणदारी मुक्त घोषित होणे हा महाराष्ट्रासाठी एतिहासिक क्षण आहे. जनतेला शिक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागरुकता कार्यक्रम हाती घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील एखादे शहर अथवा गाव हागणदारी मुक्त घोषित करण्यासाठी त्रिस्तरीय वैधता प्रक्रिया राबवली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.

 
PIB Release/MH/184
सप्रे -काणे -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau