This Site Content Administered by
राष्ट्रपती

संसदेच्या संयुक्त बैठकीतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे

नवी दिल्ली, 31-1-2017

काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुध्द भारतीयांनी दिलेल्या लढयात पुर्नसक्षमीकरण आणि मनावरील ताबा ही प्रशंसनीय गोष्ट असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदेच्या दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीत केलेल्या अभिभाषणात ते आज बोलत होते. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत आणि पैशांचा गैरवापर थांबविण्यासाठी निवडणुकांकरता वित्त पुरवठा करणे याबाबत विधायक चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे विकास कार्यक्रम लांबणीवर पडतात, सर्वसामान्यांचे आयुष्य विस्कळीत होते, अत्यावश्यक सेवांवर ताण येतो आणि दीर्घकाळ निवडणुक कर्तव्य बजावत असताना मनुष्यबळावरही ताण पडतो असे ते म्हणाले.

गेल्या वर्षभरात सरकारने काय केले आणि नवीन आर्थिक वर्षात सरकारच्या काय योजना आहेत याबाबत सरकारचा दृष्टिकोन मांडताना राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले की, आर्थिक अंर्तभाव ही गरीबी निर्मूलनाची गुरुकिल्ली आहे. जनधन-आधार-मोबाईल या त्रिसूत्रीद्वारे थेट लाभ हस्तांतरण कार्यक्रमामुळे गळती थांबली असून 36,000 कोटी रुपयांची बचत व्हायला मदत झाली आहे.

इंडियन पोस्टल पेमेंट बँक सुरु झाल्यामुळे गरीब आणि बँकींग क्षेत्राशी जोडल्या न गेलेल्या व्यक्तींच्या दारांशी बँकीग सेवा पोहोचली आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. जनशक्तीमुळे स्वच्छ भारत अभियान ही लोक चळवळ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

गरीब, दलित, शोषित आणि वंचित शेतकरी, कामगार व युवक यांचे कल्याण हा केंद्र सरकारच्या सर्व धोरणांचा गाभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गंत,  मंजूर केलेल्या 5.6 कोटी कर्जाद्वारे दोन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पुरविण्यात आल्याचे ते म्हणाले.  चालू आर्थिक वर्षात दिनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत स्वयं सहाय्यता गटांना 16,000 कोटी रुपये उपलब्ध करुन  देण्यात आले आहेत. दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेंतर्गंत विक्रमी वेळेत 11,000 खेडयांचे विद्युतीकरण करण्यात आल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गंत गरीबांना स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उज्जवला योजनेतील लाभार्थींमध्ये 37 टक्के वाटा हा  अनुसूचित जाती आणि जमातीतील आहे.

गरीबांचे आयुष्य सुधारण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजना हाती  घेतल्या आहेत असे सांगून प्रत्येक बेघर गरीबाला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गंत निवारा देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले. यासाठी 2015-20 या काळात ग्रामपंचायतींकडे दोन लाख कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात येत आहे.

महिलांना समान संधी उपलब्ध व्हाव्यात याचा पुर्नरुच्चार करत राष्ट्रपती म्हणाले की, बेटी बचाव, बेटी पढाओ मोहिमेचे उत्साहवर्धक परिणाम दिसून येत आहेत. त्यांचे सरकार विकासाच्या प्रवासात स्त्रीशक्ती हा अविभाज्य घटक असल्याचे सुनिश्चित करत आहे, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गंत सर्व गर्भवती महिलांची सर्वोत्तपरी काळजी घेतली जात आहे.  मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टमधील सुधारणांमुळे गर्भवती महिलांना कामाच्या ठिकाणी सहाय्य मिळेल, असेही राष्ट्रपतींनी स्पष्ट केले आहे.

युवकांना कौशल्य प्रदान करण्यासाठी त्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. तसेच 10,000 कोटी रुपये खर्चांची तरतूद असणारी राष्ट्रीय उमेदवारी प्रोत्साहन योजना सुरु असल्याचे ते म्हणाले. सात लाख विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकशील शिक्षण आणि प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी  प्रधानमंत्री युवा योजना सुरु करण्यात आली असे ते म्हणाले.

ईशान्येकडील राज्यांमध्ये आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार शेजारील देशांना रस्ते आणि रेल्वे मार्गाच्या माध्यमातून जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. दहशतवादाचा मुकाबला करणे आणि दहशतवादी कृत्यांना बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्याप्रती सरकार वचनबध्द आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

भारताला प्रगती पथावर नेण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पायाभरणीचे मोलाचे काम केले आहे, वाद, चर्चा, समावेशकता आणि समजूतदारपणाचा हा मार्ग आहे. संवाद, समन्वय आणि समवेदनेच्या या समृध्द परंपरेमुळे  राष्ट्र उभारणीच्या कार्याला सतत मार्गदर्शन लाभत राहील अशा शब्दात राष्ट्रपतींनी   आपल्या अभिभाषणाचा समारोप केला.

 
PIB Release/DL/157
बीजी -जयश्री -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau