This Site Content Administered by
सांस्‍कृतिक व पर्यटन

मुंबईत ‘पर्यटन पर्व’ला प्रारंभ

 


मुंबई, 5-10-2017

पर्यटन मंत्रालयाच्यावतीने 5 ते 25 ऑक्टोबर 2017 या कालावधीत देशभरात ‘पर्यटन पर्व’ साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त इतर विविध मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटनाचे महत्त्व, फायदे यांच्यावर प्रकाश टाकण्यासाठी विशेष कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. ‘सर्वांसाठी पर्यटन’ यावर विशेष भर देऊन देशातील सांस्कृतिक विविधतेची माहिती देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने ‘पर्यटन पर्व 2017’ हा विशिेष उपक्रमाला आज प्रारंभ झाला. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच आदरातिथ्य आणि पर्यटन व्यवसाय तसेच या उद्योगाशी संबंधित व्यवसायांविषयी ध्वनिचित्रफित मुंबईत प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधींना दाखवण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले. यावेळी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पर्यटन पर्वामध्ये महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पर्यटनस्थळांची ध्वनिचित्रफितीद्वारे माहिती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘माझ्या सर्वोत्कृष्ट, संस्मरणीय प्रवासाची कथा’ (माय बेस्ट ट्रॅव्हल स्टोरी) या विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच ‘गाईड ट्रेनिंग कोर्स’ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

ग्रामीण पर्यटन, पर्यावरण पर्यटन अशा विविध विषयांवर कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत.

याआधी हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने मुंबईत पर्यटन पर्वानिमित्त ‘टुरिझम वॉक’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संस्थेच्या विद्यार्थ्यांबरोबर स्थानिक पर्यटनप्रेमीही या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते.

 
PIB Release/MH/187
बीजी -सुवर्णा -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau