This Site Content Administered by
अर्थ

आयकर विभागाचे ‘ऑपरेशन क्लीन मनी’

नवी दिल्ली, 31-1-2017

आयकर विभागाने आजपासून ‘ऑपरेशन क्लीन मनी’ मोहिमेला सुरुवात केली.  या मोहिमेच्या प्रारंभिक टप्प्यात 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या अवधित बँक खात्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रकमांची ई-पडताळणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कर प्रदात्यांच्या प्रोफाईलशी विसंगत रोख व्यवहार करणारे सुमारे 18 लाख नागरिक आढळून आले आहेत.

या व्यवहारांची ऑनलाईन पडताळणी करण्याची सुविधा आयकर विभागाने उपलब्ध करून दिली आहे. https://incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर कम्प्लायन्स (compliance) या शीर्षकांतर्गत रोख व्यवहार 2016 (cash transactions 2016)  या दुव्यावर क्लिक करून संबंधित पॅनकार्डधारकाचा आपल्या व्यवहारांची पडताळणी करता येईल. तसेच संबंधित अवधीत भरलेल्या रकमेबाबत स्पष्टीकरण देता येईल.

संबंधित करदात्यांना यासदंर्भात ईमेल तसेच एसएमएसच्या माध्यमातून सूचित केले जाणार आहे. पोर्टलच्या वापराची मार्गदर्शक पुस्तिका पोर्टलवर उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन स्पष्टीकरण देण्यात अडचणी येणारे करदाते 180042500025 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधू शकतात.

करदात्यांच्या प्राप्त माहितीनुसार त्यांनी ऑनलाईन नोंदविलेले स्पष्टीकरण पडताळले जाईल. रोख रकमेचा स्रोत समर्थनीय असल्यास ही पडताळणी प्रक्रिया बंद केली जाईल. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत रक्कम गुंतवली असल्यासही पडताळणी प्रक्रिया बंद केली जाईल.

यासंदर्भात आयकर विभागाची कोणत्याही प्रकारची नोटीस टाळण्याच्या दृष्टीने या टप्प्यातील करदात्यांनी संबंधित पोर्टलवर येत्या 10 दिवसात आपले प्रतिसाद नोंदवावेत, असं आयकर विभागानं स्पष्ट केले आहे.

 
PIB Release/DL/160
बीजी -माधुरी -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau