This Site Content Administered by
अल्पसंख्याक

मुंबईत जागतिक चित्रपट पर्यटन परिषद
भारत चित्रपट पर्यटनाचे केंद्र ठरावा- मुख्तार अब्बास नक्वी

 


मुंबई, 7-10-2017

दहशतवाद आणि कट्टरतावाद उघड करून त्याचा नायनाट करण्यासाठी चित्रपट महत्वाची भूमिका बजावू शकतात असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे . ते आज मुंबईत जागतिक चित्रपट पर्यटन परिषदेत  बोलत होते. विविध सामाजिक अनिष्ट रिती नष्ट करण्यासाठी, सामाजिक  प्रश्नाबाबत आवाज उठवण्यासाठी आणि सामाजिक सुधारणा आणण्यासाठी, भारतीय चित्रपट जगत महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले.

सामाजिक, सांस्कृतिक आणि सुधारणापर मुद्यांवर प्रभावी आणि परिणामकारक संदेश देण्यात भारतीय चित्रपट यशस्वी ठरल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.

भारत हा भौगोलिकदृष्ट्या, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न देश आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते ईशान्येकडच्या राज्यातल्या नितांतसुंदर निसर्ग स्थळांनी केवळ देशातल्याच नव्हे तर परदेशी चित्रपट निर्मात्यांनाही, आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मोहवले आहे असे नक्वी म्हणाले. केंद्र सरकार आणि विविध राज्यांची  सरकारे, आपापल्या भागात  चित्रिकरण करण्यासाठी देशातल्या आणि परदेशी चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देत आहेत. या संदर्भात आपण संपूर्ण जगाला माहिती द्यायला हवी असे ते म्हणाले.

चित्रपट पर्यटन केंद्र बनण्यासाठी भारतात सर्व संधी, सुविधा आणि साधनसंपत्ती आहे यावर  नक्वी यांनी भर दिला. पी एच डी चेंबर ऑफ कॉमर्स  ऍड इंडस्ट्रीसारख्या संस्था या संधींना प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असे त्यांनी सांगितले.

स्लोवाकचे राजदूत झिगमुंड बेर्टोक, रोमानियाचे राजदूत राडू  डोबरे, महाराष्ट्राचे   पर्यटन मंत्री जयकुमार रावल, मुकेश भट, एन चंद्रा यांच्यासह, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, वितरक, यांच्यासह  भारतातल्या आणि परदेशातल्या मान्यवरांनीही या परिषदेला उपस्थिती लावली.

 

S.Tupe/N.Chitale/P.Kor

 
PIB Release/MH/191
ST -नि चि -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau