This Site Content Administered by
आरोग्‍य व कुटुंब

पंतप्रधानांनी सबळ मिशन इंद्रधनुष चे उद्‌घाटन केले
 लसीकरणामुळे उपचार शक्य असताना कोणतेही बालक लसीपासून वंचित राहू नये : पंतप्रधान
देशातील बालकांच्या आरोग्यात सुधारणा करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य: जे.पी.नड्डा

नवी दिल्ली, 8-10-2017

जर लसीकरणामुळे कोणत्याही आजारावर उपचार शक्य असतील तर कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, असे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सांगितले आहे. पंतप्रधानांनी आज गुजरातमध्ये वडनगर येथे सबळ मिशन इंद्रधनुषचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारने ज्यांना लसीकरण मोहिमेंतर्गत ही सुविधा उपलब्ध झालेली नाही अशा दोन वर्षे वयाच्या प्रत्येक बालकापर्यंत आणि त्या गर्भवती मातांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. विशेष अभियानाच्या अंतर्गत, लसीकरणाच्या विस्तारात सुधारणेसाठी निवडलेले जिल्हे आणि राज्यांमध्ये डिसेंबर 2018 पर्यंत संपूर्ण लसीकरणाद्वारे 90 टक्क्यांहून अधिक लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. यापूर्वी मिशन इंद्रधनुष अंतर्गत 2020 पर्यंत किमान 90 टक्के संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. मात्र, हे लक्ष्य आता युद्धपातळीवर राबविणे आणि साध्य करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रुपानी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, गुजरातचे आरोग्य आणि कुटुंबकल्याण आणि निदान शिक्षण, पर्यावरण आणि शहरी विकासमंत्री शंकरभाई चौधरी यांच्यासह इतर विशेष मान्यवर व्यक्ती देखील यावेळी उपस्थित होत्या. खच्चून भरलेल्या या परिसरात जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सरकारने लसीकरणाची मोहीम ही जन आणि सामाजिक चळवळ बनवली आहे. माता आणि बालमृत्यू दराला आळा घालण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या कार्यक्रमांन स्वीकारण्याचे आणि या दिशेने सरकारला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन पंतप्रधानांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

सरकारने केलेल्या इतर क्षेत्रातील कामगिरीची देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. आपल्या सरकारने 15 वर्षांनी नवे राष्ट्रीय आरोग्य धोरण, 2017 आणले आहे जे लोकाभिमुख आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारने स्टेंटच्या किमतींवर नियंत्रण आणले, ज्यामुळे देशातील नागरिकांच्या खूप मोठ्या वर्गाच्या हिताचे रक्षण झाले, यामुळे मध्यम उत्पन्न गटातील आणि गरीब कुटुंबांच्या आरोग्य विषयक खर्चात बचत झाली आहे. पंतप्रधान मातृत्व सुरक्षा मोहिमेच्या यशस्वितेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. खाजगी डॉक्टरांनी सरकारी डॉक्टरांसोबत दर महिन्याच्या 9 तारखेला गर्भवती महिलांची मोफत तपासणी करण्याची तयारी दर्शवली आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की पंतप्रधानांनी दिलेले अमाप पाठबळ त्यांच्यासाठी प्रेरणास्रोत बनले. देशातील बालकांच्या आरोग्यात सुधारणा करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे देखील त्यांनी सांगितले. इंद्रधनुषच्या चार टप्प्या अंतर्गत 2.53 कोटी बालके आणि 68 लाख गर्भवती महिलांना जीवनरक्षक लसी उपलब्ध करून देण्यात आल्या अशी माहिती जे. पी. नड्डा यांनी दिली. यापैकी 5.21 लाख बालके आणि 1.27 लाख गर्भवती महिला गुजरातमधील आहेत. मिशन इंद्रधनुषच्या माध्यमातून आपण 90 टक्के संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी संपूर्ण लसीकरणाच्या व्याप्तीमधील वाढीचे लक्ष्य दरवर्षी एक टक्का होते. मिशन इंद्रधनुषमध्ये पहिल्या दोन टप्प्यात लसीकरणामध्ये वार्षिक 6.7 टक्क्यांच्या वाढीची नोंद करण्यात आली आहे.

ऑक्टोबर 2017 आणि जानेवारी 2018 या दरम्यानच्या काळात प्रत्येक महिन्यात सबळ मिशन इंद्रधनुष कार्यक्रमांतर्गत, सर्वोच्च प्राधान्याचे जिल्हे आणि शहरी भागातील 173 जिल्हे, 16 राज्यांमधील 121 जिल्हे आणि 17 शहरे व ईशान्येकडील 8 राज्यांमधील 52 जिल्ह्यात लसीकरणाचे काम सातत्याने सुरू राहील. सबळ मिशन इंद्रधनुष कार्यक्रम अशा निवडक जिल्ह्यांमध्ये आणि शहरी भाग असलेल्या ठिकाणी राबवण्यात येईल ज्या भागांमध्ये लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे. राष्ट्रीय सर्वेक्षण, आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीची आकडेवारी आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे हे भाग निश्चित करण्यात येतील. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणारे, शहरात झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आणि उपकेंद्रातील अशा भागांवर लक्ष केंद्रित केले जाईल ज्या ठिकाणी एकतर लसीकरण झालेले नाही किंवा त्याची टक्केवारी खूपच कमी आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य मोहिमे अंतर्गत शहरी वस्त्या आणि शहरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

सबळ मिशन इंद्रधनुष लसीकरणाच्या व्याप्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी आंतरमंत्रालय आणि आंतरविभागीय समन्वय कार्यवाहीवर आधारित आढावा व्यवस्थापन आणि सघन देखरेख व उत्तरदायित्व प्रणाली स्वीकारली जाईल. जेणेकरून लक्ष्य निर्धारित क्षेत्रांमध्ये प्रभावी लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करता येईल. या कार्यक्रमात इतर 11 मंत्रालये आणि विभाग देखील आपले पाठबळ देत आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रालय, पंचायती राज, शहरी विकास, युवक व्यवहार आणि इतर मंत्रालयांनी सबळ मिशन इंद्रधनुष कार्यक्रमात आपले सहकार्य दिले आहे. तळाकडच्या पातळीवर काम करणाऱ्या विविध लोकांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला प्रभावी पद्धतीने कार्यान्वित करण्यात येईल. आशा, अंगणवाडी सेविका, राष्ट्रीय शहरी जीविका मिशन अंतर्गत जिल्हा प्रेरक आणि स्वयंसेवी संघटनांच्या अधिक चांगल्या समन्वयाच्या आणि कार्यान्वयनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवण्यात येईल.

जिल्हा, राज्य आणि केंद्रीय स्तरावर नियमित कालावधीनंतर सबळ मिशन इंद्रधनुषवर अतिशय कडक देखरेख ठेवण्यात येईल. नंतर राष्ट्रीय स्तरावर मंत्रिमंडळ सचिव याचा आढावा घेतील. प्रगती कार्यक्रमाअंतर्गत सर्वोच्च पातळीवर यावर लक्ष ठेवण्यात येईल.

सबळ मिशन इंद्रधनुष कार्यक्रम सरकार द्वारे निरीक्षण, सहायकांवर लक्ष ठेवून आणि सर्वेक्षणाद्वारे चालवण्यात येईल. या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने विशेष धोरण तयार केले आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावर आत्मपरीक्षणाच्या अवकाशावर आधारित सुधारणा योजना तयार करण्यात आल्या आहेत. या योजना राज्यांपासून केंद्रीय स्तरापर्यंत चालवल्या जातील जेणेकरून डिसेंबर 2018 पर्यंत 90 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकेल.

90 टक्क्यांहून जास्त उद्दिष्ट साध्य करणाऱ्या जिल्ह्यांसाठी मूल्यमापन व पुरस्कार पद्धतीचा वापर केला जाईल. निर्धारित लक्ष्याच्या मार्गात अडथळे आल्यास त्यावर मात करण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर करण्यात येईल आणि प्रसारमाध्यम व्यवस्थापनाद्वारे जागरुकता अभियान चालवले जातील. भागीदार/ नागरिक सोसायट्या संघटना आणि इतरांच्या सहकार्याने प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात येतील.

या समारंभात पंतप्रधानांनी वडनगरच्या जीएमईआरएस चिकित्सा महाविद्यालयाचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी सामुदायिक आरोग्य अभियानासाठी नाविन्यपूर्ण मोबाईल फोन तंत्रज्ञानाचा प्रारंभ केला. यामुळे समुदाय आधारित माता आणि बालक आरोग्य सेवांचा विस्तार शक्य होईल आणि गुजरातमध्ये माता आणि बालकांचा मृत्यूदर कमी करायला मदत मिळेल.

जीएमईआरएस वैद्यकीय महाविद्यालयात दररोज 400 ते 500 बाहेरचे रुग्ण आणि 80 ते 100 स्थानिक रुग्णांवर उपचार केले जातात. उन्नतिशील मोबाइल फोन एप्लीकेशन द्वारे आरोग्य सेवा सदृढ करण्यास मदत मिळेल.

 

 
PIB Release/DL/1621
बीजी -शै.पा. -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau