This Site Content Administered by
अर्थ

पेट्रोलियम आणि तेल क्षेत्रासाठी वस्तू आणि सेवा कर संरचना

नवी दिल्ली, 11-10-2017

पेट्रोल, डिझेल, हवाई इंधन, नैसर्गिक गॅस आणि कच्चे तेल अशा सर्व पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश वस्तू आणि सेवा कर क्षेत्रात न केल्यामुळे या सर्व उत्पादनांवर विविध स्तरात कर आकारणी सुरु आहे. ही कर आकारणी कमी करण्यासाठी आणि पेट्रोलियम क्षेत्रात उत्खनन आणि उत्पादनात गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने वस्तू आणि सेवा कर परिषदेने 6 ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या 22 व्या बैठकीत या वस्तूंना जीएसटी अंतर्गत आणण्यासाठी कर संरचनेची शिफारस केली आहे. यानुसार, -

·         तेल आणि नैसर्गिक वायू उत्खनन आणि निर्मितीशी संबंधित परदेशी क्षेत्रातल्या सेवांवर 12 टक्के जीएसटी लागू करावा मात्र समुद्र किनाऱ्यापासून 12 नॉटिकल मैल अंतरापलीकडच्या कामांवरच हा दर लागू करावा.

·         नैसर्गिक वायूचे वाहिनीमार्फत दळणवळण करताना आयटीसी वगळून 5 टक्के किंवा आयटीसीसह 12 टक्के जीएसटी लागू करावा.

·         दोरखंड आणि इतर दुय्यम वस्तूंची भाडेपट्टीवर आयात केल्यास अशा आयातीवर आयजीएसटी लागणार नाही. मात्र त्यासाठी आधी पुरवठ्यावर योग्य आयजीएसटी भरला असणे आवश्यक आहे.

बंकर साठी लागणाऱ्या इंधनावरचा जीएसटी 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यात परदेशी जाणारी आणि किनारपट्टीवरची अशा दोन्ही जहाजांचा समावेश आहे. या प्रस्तावासंदर्भातली अधिसूचना लवकरच जारी केली जाईल.

 
PIB Release/DL/1629
बीजी -राधिका -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau