This Site Content Administered by
संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्करात सेवेच्या दर्जाविषयी असलेल्या गैरसमजूतीविषयी लष्कराकडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली, 12-10-2017

1.लष्कराच्या कंमाडर्सच्या परिषदेत प्रत्यक्ष युद्धावर न गेलेल्या सैनिकांच्या सेवेच्या मुद्यावर चर्चा झाली. काही सैनिक प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढण्यासाठी युद्धप्रवण नसल्यामुळे त्यांची नेमणूक तणावाच्या किंवा युद्धसदृश परिभागात करु नये अशी विनंती लष्करी सेवेतल्या काही कर्मचाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात लष्कराने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पुढील गोष्टी स्पष्ट केल्या आहेत:-

अ)  नियंत्रण रेषा, तणावसदृश परिस्थिती असलेले भाग, घुसखोरी आणि दहशतवादी कारवाई विरोधी अभियान अशा सर्व ठिकाणी लष्कराचे विविध अधिकारी आणि युद्धजन्य परिस्थितीत लागणारे पाठबळ तसेच इतर कामांसाठी विविध श्रेणीच्या जवानांची तुकडीनुसार नेमणूक केली जाते. या नेमणुकीमुळे या अधिकाऱ्यांना तसेच जवानांना प्रत्यक्ष युद्धभूमीवरचा अनुभव मिळतो. अशा प्रसंगी त्यांनी निभावलेली भूमिका अतिशय महत्त्वाची आणि उल्लेखनीय ठरते.

आ)लष्करी सेवेतील कर्तव्य ही युद्ध आणि शांतता अशा दोन्ही काळात ठरतात. ती  कुठल्या एका प्रसंगानुसार निश्चित केली जात नाही. प्रत्येक लष्करी सेवेला विशिष्ट कार्य आणि भूमिका दिलेली असते.

इ) प्रत्यक्ष युद्धभूमीवर असलेले सैनिक/ त्यांना मदत करणारे सैनिक आणि इतर सेवा या सर्वांसाठी भूमिका नियमानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. युद्धभूमीवर केली जाणारी कर्तव्ये आणि त्यांना मागच्या चमूकडून मिळणारी इतर मदत या दोन्ही कर्तव्यांना समान समजण्याची भूमिका लष्कराने सातत्याने घेतली आहे. लष्कराच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या जवानांना प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या सैनिकांच्या संपर्कात राहण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे या इतर सेवांमध्ये कार्यरत कमांडिंग अधिकाऱ्यांचे वय हे प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या जवानांपेक्षा अधिकही असू शकते. प्रत्यक्ष युद्धभूमीवर कर्तव्य बजावण्यासाठी शारिरिक क्षमता महत्वाची ठरते. लष्करी सेवेत भरती झालेले सर्व जवान आणि सर्व सेवा या युद्धप्रवण समजल्या जात असून हा मुद्दा वादातीत आहे. त्यामुळे कुठल्याही लष्करी सेवा किंवा तुकडीला युद्धप्रवण विभाग नसल्याचे लष्कराने कधीही म्हटलेले नाही.

2.त्याशिवाय या नियुक्तीविषयी लष्करप्रमुखांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार  लष्करातल्या सर्व सेवा समान समजल्या जातील आणि त्यांना त्यांच्या श्रेणीनुसार त्यांचे वेतन दिले जाईल.  जर कुठल्या सेवेविषयी काही वाद असल्यास तो या परिषदेत सोडवला जाईल. दर्जामध्ये होणाऱ्या कथित भेदभावाविषयी काही तक्रारी कर्मचाऱ्यांना असल्यास त्यात आवश्यक ती सुधारणा केली जाईल असे लष्कराने स्पष्ट केले आहे.

 

 
PIB Release/DL/1640
बीजी -राधिका -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau