This Site Content Administered by
अर्थ

केंद्र सरकारच्या आर्थिक संरचनात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची भक्कम शाश्वत आणि समतोल विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु

नवी दिल्ली, 13-10-2017

केंद्र सरकारने केलेल्या आर्थिक संरचनात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल भक्कम, शाश्वत आणि समतोल विकासाकडे सुरु झाली आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी  केले. भारतीय संधी या विषयावर फिक्कीने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात ते आज बोलत होते.  विमुद्रीकरण, वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर विकास दराची मंदावलेली गती हा तात्पुरता परिणाम होता आणि भारतीय अर्थव्यवस्था आता प्रगतीच्या मार्गावर आहे असे जेटली म्हणाले. सरकारने केलेल्या धाडसी आर्थिक सुधारणांमुळे पायाभूत संपत्तीचे वाद निकाली निघण्यासाठी मदत झाली असून परदेशी गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टीने ही पोषक गोष्ट असल्याचे जेटली म्हणाले.

1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू होणे ही सरकारने टप्प्याटप्प्याने केलेल्या वित्तीय सुधारणांमधली महत्वाची पायरी होती. त्या आधी केलेले विमुद्रीकरण आणि इतर संरचनात्मक सुधारणांशी हा निर्णय सुसंगतच होता असे सांगत या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेचा मार्ग आणि गती दोन्ही सुरळीत झाला असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षात भारतात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला असून भारतीय अर्थव्यवस्थेविषयी जागतिक स्तरावर विश्वास वाढल्याचेच हे निदर्शक आहे असे त्यांनी सांगितले.  

 
PIB Release/DL/1646
बीजी -राधिका -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau