This Site Content Administered by
विज्ञान व तंत्रज्ञान

महिला शास्त्रज्ञ आणि उद्योजिका देशाच्या विकासात अमूल्य योगदान देतील आणि नवभारताचे स्वप्न साकारतील – हर्षवर्धन

नवी दिल्ली, 16-10-2017

महिला शास्त्रज्ञ आणि उद्योजिका देशाच्या विकासात अमूल्य योगदान देतील आणि पंतप्रधानांचे नवभारताचे स्वप्न साकारतील असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. ते आज चेन्नई इथे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान सभा 2017 मध्ये महिला शास्त्रज्ञ आणि उद्योजिका परिषदेला संबोधित करत होते.

महिलांच्या सबलीकरणावर सरकार विशेष भर देत आहे. आपल्याकडे विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात 100 वर्षांहून अधिक काळ महिलांचा वावर आहे. आनंदीबाई जोशी 1885 मध्ये डॉक्टर झाल्या होत्या, तर 1939 मध्ये मूलभूत विज्ञानात डॉक्टरेट मिळवणाऱ्या जानकी अम्मल पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ होत्या याची आठवण हर्षवर्धन यांनी करुन दिली.

या परिषदेला देशातल्या विविध भागातल्या 350 महिला शास्त्रज्ञ, संशोधक, अध्यापक आणि उद्योजिका उपस्थित होत्या. परिषदेत भूविज्ञान, अंतराळ आणि महासागर संशोधन अशा विविध विषयांवर सादरीकरणे झाली. तसेच नवभारतासाठी विज्ञानाला चालना, विज्ञान क्षेत्रात कारकीर्द घडवण्यातली आव्हाने, महिलांसाठी संधी, विज्ञान क्षेत्रातल्या महिलांसाठी भारत सरकारचे उपक्रम अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

 
PIB Release/DL/1659
सप्रे -सो.कु. -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau