This Site Content Administered by
संरक्षण मंत्रालय

फिलीपाईन्स येथे आयोजित चौथ्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य

नवी दिल्ली, 24-10-2017

फिलीपाईन्स येथे आयोजित चौथ्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आसियान राष्ट्र समुहातील देशांशी भारताचे उत्तम संबंध असून, सुरक्षाविषयक यंत्रणांच्या सक्षमीकरणासंदर्भात सर्व देशांच्या परस्पर संवादाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या संवादात पारदर्शकता आणि परस्परांबद्दल आदरभाव राखत, परस्परांच्या प्राधान्य क्रमांना आणि संवेदनशील मुद्यांना योग्य प्रकारे हाताळण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी भारत म्यानमारसोबत EWG-MM च्या तिसऱ्या सत्राचे सहअध्यक्षत्व करत आहेत. सिंगापूर, जापान, रशिया आणि थायलंडबरोबर वैद्यकीय सहाय्यासंदर्भात सुरु असलेले काम यापुढेही कायम राहिल, अशी ग्वाही संरक्षण मंत्र्यांनी दिली.

जागतिक स्तरावर धोरणात्मक आणि सुरक्षाविषयक परिस्थिती सातत्याने बदलत असून, नव्या आणि गंभीर आव्हानांचा मुकाबला करावा लागत आहे. सर्वच समुह देशांतील समाजासाठी दहशतवाद हा कळीचा मुद्दा बनला आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. या मंचाने निर्धारित केलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी भारताची वचनबद्धता आणि योगदान कायम राहिल, असे सांगत संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 
PIB Release/DL/1688
बीजी -माधुरी -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau