This Site Content Administered by
महिला व बालविकास

मातृत्व लाभ योजना संपूर्ण देशभरामध्ये राबवणार

नवी दिल्ली, 3-1-2017

गर्भवती आणि मुलांना स्तनपान देणाऱ्या मातांसाठी संपूर्ण देशामध्ये मातृत्व लाभ योजना राबवण्यात येणार आहे. गर्भवती आणि स्तनदा मातांना पोषक आहार मिळावा, तसेच नवजात बालकांचे योग्य प्रकारे लसीकरण व्हावे, माता आणि बालकांचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

कुपोषित गर्भवतींच्या बालकांचे वजन कमी असते, त्यामुळे नवजात बालकांचा मृत्यूदरही जास्त आहे. हे चक्र लक्षात घेऊन मातेलाच पोषक, पुरक आहार देण्यात येणार आहे. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यात गर्भवती महिलांची कार्यरत असतात त्यांच्या वेतनाचे होणारे नुकसान लक्षात घेऊन गर्भवतींच्या थेट बँक खात्यामध्ये सहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार आहे.

गर्भवतींनी ही आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे.

रोख हस्तांतर

अट

रक्कम

पहिला हप्ता – गर्भारपणातील पहिल्या 3 महिन्यात

· पहिल्या तीन महिन्यात रुग्णालयात नाव नोंदणी करावी लागणार

· पहिल्यांदा तपासणी झाल्यानंतर

3,000/-

दुसरा हप्ता

· रुग्णालयात बालकाच्या जन्माच्यावेळेस

1500/-

तिसरा हप्ता

· मुलांच्या जन्माची नोंदणी करावी लागणार

· मुलांना बीसीजी लस टोचावी लागणार

· मुलाला ओपीव्ही आणि डीपीटीचे 1 आणि 2 इंजेक्शन द्यावे लागणार

1,500/-

 

या अर्थसहाय्यासाठी गर्भवतींनी बँकेत अथवा टपाल कार्यालयात खाते उघडणे आवश्यक असून ते आधार कार्डाशी जोडलेले असले पाहिजे.

1 जानेवारी 2017 पासून संपूर्ण देशभरात सुरू झालेल्या या योजनेचा लाभ दरवर्षी सुमारे 51.70 लाख महिलांना मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.

 
PIB Release/DL/17
सप्रे -सुवर्णा -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau