This Site Content Administered by
उपराष्ट्रपती

मजबूत आणि वैभवशाली भारताच्या निर्मितीत उद्योगांची भूमिका महत्वपूर्ण- उपराष्ट्रपती

 


मुंबई, 28-10-2017

आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्राने भागीदार म्हणून काम करायला हवे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत इकॉनॉमिक टाईम्स पुरस्कारात बोलताना सांगितले. व्यवसाय क्षेत्राची भरभराट व्हावी यासाठी सरकारने देशासाठी योग्य आणि गुंतवणूक स्नेही उपाययोजना हाती घ्यायला हव्यात यावर नायडू यांनी भर दिला. व्यापार क्षेत्राने नैतिक सुशासनाचा प्रसार करावा असेही ते म्हणाले. प्रत्येक साधन-संपत्ती ही परिपूर्ती होणारी असावी याकडे सरकार आणि व्यवसायांनी लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुधारणा ही काळाची गरज असली, तरी सर्वंकष विकास आणि तफावत यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे असे नायडू म्हणाले.

कृषी क्षेत्राला जखडून ठेवणाऱ्या बंधनांपासून मुक्त करण्याची गरज आहे. आर्थिक विकासासाठी कृषी क्षेत्राला चालना मिळणे गरजेचे आहे. कृषी आणि उद्योग हे आपल्या अर्थव्यवस्थेचे दोन डोळे आहेत असे नायडू म्हणाले.

वित्तमंत्री अरुण जेटली यांचा उद्योग क्षेत्रातील सुधारक आणि यंदाचे धोरण बदलाचे महत्त्वपूर्ण साधन म्हणून नायडू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गेल्या साडेतीन वर्षात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे घोषणापत्र अंमलात येण्याच्या प्रक्रियेशी अरुण जेटली जोडले गेले आहेत असेही नायडू यांनी सांगितले. या थोड्या कालावधीत दूरगामी परिणाम होणाऱ्या अनेक सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत. वस्तू सेवा कर परिषदेचे कामकाज सुरळीत झाले ते केवळ जेटलींमुळेच असे मी सांगू शकतो असेही नायडू म्हणाले.

उद्योग क्षेत्रातील दिग्गजांना संबोधित करताना केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली म्हणाले की, भारतातील संरचनात्मक बदलांच्या प्रक्रियेला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पंतप्रधानांच्या विमुद्रीकरण आणि वस्तू सेवा कराबाबतच्या ऐतिहासिक निर्णयांचा दिर्घकालीन फायदेशीर परिणाम होईल असेही जेटली यांनी सांगितले. अर्थव्यवस्था स्वच्छ व्हावी ही मुख्य संकल्पना असल्याचे ते म्हणाले. कर रचनेचा पाया आणि डिजिटल व्यवहारांचा विस्तार होत असून करांचा भरणा हे देशभक्तीचे मूलभूत कर्तव्य आहे असे जेटली म्हणाले.

 
PIB Release/MH/201
दे -जयश्री -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau