This Site Content Administered by
अल्पसंख्याक

गरीब आणि वंचित घटकांच्या सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध- मुख्तार अब्बास नक्वी

 


मुंबई, 5-11-2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारसाठी देशाचा सर्वसमावेशक विकास हा ‘राष्ट्रधर्म’ आहे तर गरीब आणि वंचित घटकांचा सन्मानासह विकास ही ‘राष्ट्रनीती’ आहे असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.

मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात अल्पसंख्याकांच्या कौशल्य विकासावर आयोजित चर्चासत्रात ते आज बोलत होते. मोदी सरकार धर्म, जात, प्रदेश या पलिकडे जाऊन गरीब आणि वंचितांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या कल्याणासाठी काम करत आहे असे नक्वी म्हणाले.

मोदी सरकार अल्पसंख्याकांसह सर्व गरीब आणि दुर्बल घटकांच्या सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक सक्षमीकरण आणि रोजगाराभिमुख कौशल्य विकासासाठी झटत आहे असे नक्वी म्हणाले. ‘सीखो और कमाओ’, ‘नई मंझिल’, ‘गरीब नवाज कौशल्य विकास योजना’, ‘नई रोशनी’ यांसारख्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या योजना अल्पसंख्याकाच्या कौशल्य विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल सिद्ध झाल्याचे नक्वी म्हणाले. गेल्या तीन वर्षात या योजनेच्या माध्यमातून 50 लाखांहून अधिक लोकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी पुरवण्यात आल्या आहेत.

देशभरात 100 ‘गरीब नवाज कौशल्य विकास केंद्रे’ स्थापन करण्यात येत असून अल्पसंख्याक समुदायाच्या तरुणांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे नक्वी म्हणाले. याशिवाय देशभरात आयोजित केल्या जात असलेल्या ‘हुनर हाट’च्या माध्यमातून अल्पसंख्याक समुदायाच्या लाखो गरीब आणि गरजू कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नक्वी म्हणाले की, अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमाअंतर्गत मागास अल्पसंख्याक बहुल परिसरांमध्ये 809 शाळांच्या इमारती, 10 पदवी महाविद्यालये, 371 वसतीगृहे, 1392 शौचालये आणि पेयजल सुविधा, 53 आयटीआय, 269 बहुउद्देशीय समाज केंद्रे ‘सद्‌भाव मंडप’, 39 गुरुकुल प्रकारातील निवासी शाळा बांधण्यात आल्या आहेत.

‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’अंतर्गत 9 कोटी 13 लाख लोकांना रोजगाराच्या संधी प्रदान करण्यात आल्याचे नक्वी यांनी सांगितले. सरकारने त्यांना सुमारे 4 लाख कोटी रुपये कर्ज वितरित केले आहे. या लाभार्थ्यांमध्ये अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून वीजेशिवाय राहत असलेल्या सुमारे 15 हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्यात आली असून याचा लाभ अल्पसंख्याक समुदायातील गरीब लोकांनाही झाल्याचे नक्वी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या अनेक आर्थिक सुधारणांना आज संपूर्ण जगभरात ओळख मिळाल्याचे नक्वी म्हणाले. आर्थिक आघाडीवर भारताला मोठे यश मिळाले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालात व्यवसाय सुलभतेतील मानांकनात भारताने 130व्या स्थानावरुन 100 व्या स्थानावर झेप घेतल्याचे नक्वी म्हणाले.

 

(स्रोत- मंत्र्यांचे कार्यालय)

 
PIB Release/MH/204
सप्रे -काणे -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau