This Site Content Administered by
अर्थ

परवडणारी घरं आणि रियल इस्टेट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्रालयाकडून उपाययोजनांची घोषणा

नवी दिल्ली, 1-2-2017

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सर्वसाधारण अर्थसंकल्प 2016-17 लोकसभेत सादर करताना परवडणाऱ्या गृह योजनांच्या प्रवर्तकांसाठी जाहीर लाभ संबंध आयकर सूट योजनेला अधिक आकर्षक करण्यासाठी संबंधित योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदलांचा प्रस्ताव मांडला.

जेटली यांनी सांगितले की, 30 आणि 60 चौरस मीटर निर्मित क्षेत्राऐवजी 30 आणि 60 चौरस मीटर चटई क्षेत्र मोजले जाईल. 30 चौरस मीटरची सीमा देखील केवळ 4 मेट्रो शहरांच्या महानगरपालिका हद्दींना लागू होईल. मेट्रो शहरांच्या बाह्य परिघीय क्षेत्रासह देशाच्या उर्वरित भागासाठी 60 चौरस मीटर सीमा लागू होईल. या योजनेअंतर्गत काम सुरू झाल्यानंतर गृह निर्माण पूर्ण करण्याच्या सध्याची तीन वर्षांची मर्यादा वाढवून 5 वर्ष करण्याचा प्रस्ताव देखील जेटली यांनी मांडला.

सद्यस्थितीमध्ये परिपूर्ती प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही ताबा न घेतलेली घरं प्राप्तीकात्मक कर उत्पन्नाच्या अखत्यारित येतात. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी गृह निर्माणमध्ये निधी गुंतवला आहे त्यांना दिलासा मिळावा यासाठी हा नियम परिपूर्ती प्रमाणपत्र प्राप्त होणाऱ्या वर्ष अखेरीपासूनच लागू करण्याचा प्रस्ताव जेटलींनी मांडला आहे. जेणेकरून त्यांनी केलेली गुंतवणूक परत मिळण्यासाठी त्यांना काही कालावधी मिळेल.

स्थावर मालमत्तेवरील लाभावर विचार करण्यासाठी सध्याच्या तीन वर्षाचा कालावधी कमी करून 2 वर्ष करण्यासह स्थावर मालमत्तेसह सर्व श्रेणींच्या सूचीकरणासाठी 1 मार्च 1981 हे आधार वर्ष बदलून 1 मार्च 2001 करण्याचा प्रस्ताव जेटलींनी मांडला. यामुळे भांडवली लाभावरील देयता कमी होऊन संपत्तीच्या गतिशीलतेला प्रोत्साहन मिळेल. जेटली म्हणाले की, कर न भरता भांडवली लाभांची गुंतवणूक करणे शक्य होईल अशा आर्थिैक दस्तावेजांचा विस्तार करण्याची सरकारी योजना तयार करत आहे.

भूमी अधिग्रहण विधेयकाशिवाय जमीन एकत्रिकरण व्यवस्थेद्वारे आंध्र प्रदेशच्या नवीन राजधानीसाठी विकसित होणाऱ्या जमिनीसाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2 जून 2014 पर्यंत जमीन मालकांसाठी भांडवल लाभ करात सूट देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

 
PIB Release/DL/177
बीजी -म्हात्रे -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau