This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

सुभाष घई यांनी इफ्फी गोवा 2017 मध्ये मास्टरक्लास घेऊन चित्रपट प्रेमींशी संवाद साधला

 


पणजी, 21-11-2017

इफ्फी गोवा 2017 च्या दुसऱ्या दिवशी एफटीआयआयची शिक्षण पत्रिका लेन्ससाईटच्या आवृत्तीचे प्रकाशन केल्यानंतर सिनेदिग्दर्शक सुभाष घई यांनी मास्टरक्लास दरम्यान चित्रपट प्रेमी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या सर्वांनी आपल्या कलेचा सन्मान करावा, तसेच संबंधित क्षेत्रांमध्ये आपली ओळख  निर्माण करावी असा बहुमूल्य सल्ला घई यांनी उपस्थितांना दिला. 

सुभाष घई यांनी मास्टरक्लास दरम्यान चित्रपट प्रेमींना आपले अनुभव सांगितले. एक चित्रपट निर्माता म्हणून प्रसिध्दीला येताना त्यांनी केलेला संघर्ष, त्यांना आलेली निराशा तसेच इतर अनेक रोमांचक किस्से सांगत उपस्थितांना आनंदित केले. अनेक विविध विषयांवर चित्रपट निर्माण करत असतानाच कालीचरण, विधाता, खलनायक आणि कर्मासारख्या सुपरहिट संगीतप्रधान चित्रपटांची निर्मिती त्यांनी  कशी केली याचादेखील अनुभव त्यांनी सांगितला.

 

आपल्या संवादाची सुरुवात भविष्यात काय अशा प्रकारे करत घई यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा केली. ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींना प्रेरणा मिळाली. एका वर्षात प्रसिध्द चित्रपट निर्मात्यांना सहा कथा विकण्यासोबतच दिलीप कुमार आणि राजकुमार यांच्यात वाद असतांना देखील  अकरा महिन्यांच्या कालावधीत सौदागर कशाप्रकारे पूर्ण केला याचा देखील अनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितला. वर्ष 2017 हे हिंदी चित्रपटांसाठी फार चांगले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सुभाष घई इफ्फीला नियमित येतात आणि महोत्सवाच्या आयोजकांना बहुमूल्य मार्गदर्शन  करतात. 48वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत गोव्यात साजरा होत आहे.

 
PIB Release//215

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau