This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

पिहू आणि पुष्कर पुराण चित्रपटांची इफ्फीत विशेष पत्रकार परिषद

 


पणजी, 22-11-2017

आशियातल्या सर्वात मोठ्या अशा इफ्फी महोत्सवातल्या पॅनोरमातल्या पुष्कर पुराण आणि पिहू या दोन उद्‌घाटनपर चित्रपटांची आज विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पुष्कार पुराणचे दिग्दर्शक कमल स्वरुप, पिहूचे दिग्दर्शक विनोद काप्री आणि बालकलाकार मायरा विश्वकर्मा या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. या विभागाचे उद्‌घाटन प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते झाले होते.

दोन वर्षाच्या मुलीभोवती गुंफलेले पिहू या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवते.  केवळ दोन वर्षाची चिमुरडी कथानकाच्या केंद्रस्थानी आहे म्हणून हा चित्रपट विशेष आहे, असे नव्हे तर ही मुलगी चित्रपटाशी परिचित व्हावी, यासाठी या मुलीचे कुटुंब आणि चित्रपटाचा इतर ताफा काही काळासाठी त्याच घरात राहत होता, असे दिग्दर्शक विनोद काप्री यांनी सांगितले. इफ्फी गोवा 2017 मध्ये आपला चित्रपट दाखविणे ही मोठी संधी आहे. चित्रपट निर्मात्यासाठी इफ्फी 2017 सारखा मंच आपल्यासारख्या निर्मात्याला मिळणे ही सन्मानाची आणि मनोधैर्य वाढवणारी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

निर्माते कमल स्वरुप जवळजवळ तीन दशकानंतर पुष्कर पुराणद्वारे चित्रपटाकडे वळले आहेत.

राजस्थानमधल्या तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्करविषयी हा चित्रपट आहे. कार्तिक महिन्यात जत्रा, त्यासाठीची गावकऱ्यांची गर्दी, लोककलावंत, गुरे-ढोरे, उंट, घोडे, मेरी गो राऊंड यांनी या शहराचे रुप जत्रेत कसे पालटते त्याचे दर्शन या चित्रपटात घडवण्यात आले आहे.

इफ्फीत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कमल स्वरुप यांनी ज्युरी, इफ्फी आयोजकांसह सर्वांचे आभार मानले. पॅनोरमातला हा आपला दुसरा उद्‌घाटनपर चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. आपण अजमेरचे रहिवासी असल्याने हा चित्रपट निव्वळ कल्पनेवर आधारीत नसून, आपण अनुभवलेल्या गोष्टीही यात असल्याचे ते म्हणाले.

48वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात 28 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

 
PIB Release//218

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau