This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

इफ्फी 2017 मध्ये अकादमी पुरस्कार विजेते क्राग मान यांनी घेतला मास्टर क्लास

 


पणजी, 22-11-2017

अकादमी पुरस्कार आणि बाफ्ता विजेते साऊंड रेकॉर्डरिस्ट आणि मिक्सर, क्राग मान यांनी आज 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष मास्टर क्लास घेतला. चित्रपट निर्मात्यांचा दृष्टिकोन रुपेरी पडद्यावर उतरविण्यात त्यांना मदत व्हावी यासाठी ध्वनीचा त्याच्या पूर्ण क्षमतेसह कशाप्रकारे वापर करता येईल यावर विचार विनिमयाच्या उद्देशाने मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले होते.

ध्वनी उद्योगातील 15 वर्षाच्या कारकीर्दीत मान यांनी अनेक प्रसिध्द चित्रपटांसाठी काम केले आहे.  यात इनसिडीअस (2010),  पॅरा नॉर्मल ॲक्टीव्हीटी 4 (2012) आणि व्हीप्लाश (2014) यांचा समावेश असून या चित्रपटांच्या साऊंड मिक्सिंगसाठी मान यांना ऑस्कर तर ध्वनीकरता बाफ्ता पुरस्कार प्राप्त झाला आहे. मान हे मोशन पिक्चर्स आर्टस्‌ अँड सायन्स अकादमीचे सदस्यदेखील आहेत.  मास्टरक्लास दरम्यान उपस्थितांना मान यांनी सांगितले की त्यांची आवड व्यवसायामध्ये रुपांतरित झाली.  शाळेत शिकत असतानाच त्यांनी साऊंड रेकॉर्डिंगमध्ये विविध प्रयोग करायला सुरुवात केली होती.

     

 

क्रॉग म्हणाले की, चलचित्रांमध्ये ध्वनीला किती महत्व आहे हे साऊंड रेकॉर्डिंग आणि मिक्सिंगच्या क्षेत्रात काम करत असतांना मला हे लक्षात आले. एखाद्यी चांगली कथा ध्वनीमुळे अजून खूलन येते आणि हे खूप महत्वाचे आहे.  अनेकदा ध्वनीच्या माध्यमातून काही भावनादेखील व्यक्त केल्या जाऊ शकतात.

ध्वनी क्षेत्रातील आल्या प्रवासाबद्दल बोलतांना मान म्हणाले की साऊंड इजिनिअरिंग क्षेत्रात चांगले पैसे  मिळू शकत नाही असा विश्वास माझ्या पालकांना असल्यामुळे ते माझ्यावर औपचारिक शिकण्यासाठी दबाब टाकत होते.  परंतु मी जिद्दीने यालाच आपला व्यवयसाय म्हणून निवडले.

 48वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात 28 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

 
PIB Release//221

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau