This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

इफ्फी 2017 मध्ये खुल्या मंचाला प्रारंभ

 


पणजी, 22-11-2017

इफ्फी 2017 मध्ये आज फिल्म सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने खुल्या मंचाचे उदघाटन करण्यात आले. 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील हा 29 वा खुला मंच असून आज चित्रपट महोत्सवाच्या आयोजनातील नवीन आव्हाने या विषयावरील चर्चेने या मंचाचे उदघाटन झाले. 1988 मध्ये तिरुवंतपुरम इथे पहिल्यांदा जेव्हा या मंचाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हापासून चर्चासत्रांचे आयोजन तसेच महत्वपुर्ण चित्रपट विषयांवर विचारविनिमय केला जात आहे.

उद्‌घाटनप्रसंगी इफ्फी महोत्सवाचे संचालक सुनीत टंडन यांनी 1988 मधील खुल्या मंचातील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रसिद्ध कलाकार जी. रवींद्रन यांनी तयार केलेल्या पोस्टरची आठवण काढत त्यांनी फेडरेशनच्या इतिहासाला देखील अधोरेखित केले. यावेळी टंडन यांनी फेडरेशनच्या यशाची मनोकामना व्यक्त केली.

चित्रपट निर्माते आणि फेडरेशनचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी सांगितले की, खुल्या मंचाचे आयोजन हे "काय पाहावे आणि कसे पाहावे" यासाठी केले जाते. चर्चेच्या विषया संदर्भात बोलताना ते म्हणाले की, एखाद्या महोत्सवाचे आयोजन करणे हे खूपच कठीण काम आहे. चित्रपट महोत्सवाच्या आयोजनातील सर्वात मोठे अडथळे म्हणजे पायाभूत सुविधांचा अभाव आणि निधीची कमतरता. सरकारच्या सक्रिय सहभागाशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांचे आयोजन अशक्य आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

    

कर्नाटक चलनचित्र अकादमी, बंगलरूचे अध्यक्ष राजेंद्र सिंग बाबू यांनी राज्यांसोबत अकादमीने सुरू केलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली. त्यांनी यावेळी अकादमीच्या आगामी महोत्सवाच्या तारखांची घोषणा केली.22 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव केवळ बंगळुरू पर्यंत मर्यादित न राहता मैसूरचा देखील यात समावेश करण्यात येणार आहे.महोत्सवाचा सांगता समारंभाचे आयोजन मैसूर राजमहालात करण्यात येणार आहे.

या न्यूयॉर्क स्थित पत्रकार सामंता सरटोरी यांनी त्यांच्या चित्रपटविषयक वार्तांकनाचा अनुभव मांडला.  त्यांना चित्रपट महोत्सवाच्या वार्तांकनाचा दांडगा अनुभव आहे.या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याने त्या आनंदित होत्या. ग्लोबल फिल्म फेस्टिवल, नोएडचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय समन्वयक, अमित अग्रवाल म्हणाले की, डिजिटल युगात कोणत्याही महोत्सवाचे आयोजन करणे ही अत्यंत सोपी गोष्ट आहे परंतु त्यासाठी पायाभूत सुविधा आणि ठोस योजनेची देखील तितकीच आवश्यकता आहे. उदाहरण म्हणून त्यांनी कान महोत्सवाचे  उदाहरण दिले तेथे कोणत्याही महोत्सवाच्या सांगता सोहळ्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासूनआगामी महोत्सवाच्या तयारीची सुरवात केली जाते, असे ते म्हणाले.

विविध आव्हानांसंदर्भात तज्ञानी महत्वपूर्ण सूचना केल्यानंतर श्रोत्यांसोबत संवाद साधण्यासाठी मंच खुला करण्यात आला. पुढील खुल्या मंचाचे आयोजन तंत्रज्ञान, श्रोते, वितरण, अर्थशास्त्र, स्क्रिनींग सुविधा आदी विषयांवर लक्ष केंद्रित करत बदलत्या काळानुसार चित्रपट निर्मिती या विषयावर केले जाईल.

 
PIB Release//222

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau