This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

इफ्फीत ‘भारताचे युवा चित्रपट निर्माते : उदयोन्मुख आवाज आणि कथा’ या विषयावर चर्चासत्र

 


पणजी, 23-11-2017

इफ्फी 2017 मधे आज युवा भारतीय चित्रपट निर्माते : उदयोन्मुख आवाज आणि कथा या संकल्पनेवरच्या चर्चासत्रामधे कार्तिक सुब्बराज, आर एस प्रसन्ना, भास्कर हजारिका आणि राजाकृष्णा मेनन सहभागी झाले. चित्रपट निर्माते – लेखक अश्विनी अय्यर तिवारी यांनी या चर्चेची सूत्रे सांभाळली. गेल्या काही वर्षात बॉलीवूडला वैशिष्ट्यपूर्ण शैलीने कथा सादर करणारे प्रतिभावान लाभले आहेत. सरधोपट मार्ग सोडून वेगळ्या वाटेने यशस्वी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या काही मान्यवरांचा या चर्चासत्रात समावेश होता.

‘नील बटे सन्नाटा’ या समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात आणि लेखनात पदार्पण करणाऱ्या अश्विनी यांनी ‘बरेली की बर्फी’ हा चित्रपटही केला आहे. हिंदी चित्रपटात गेल्या काही वर्षात केवळ कथेच्या जोरावर चित्रपट घेऊन आलेले विविध चित्रपट निर्माते आले आणि आता या चित्रपटात कोणते अभिनेते आहेत, याकडे लक्ष न देता प्रेक्षकांनीही या चित्रपटाचा स्वीकार केल्याचे त्या म्हणाल्या.

चित्रपटातली सबटायटल्स मोठे काम करतात, भारतीय लोक जर कोरियन चित्रपट पाहू शकतात, तर सबटायटल्स असणारा मणीपुरी चित्रपटही पाहू शकतात, मात्र त्यासाठी चित्रपटात मोठ-मोठे संवाद नसावेत असे भास्कर हजारिका यांनी सांगितले. म्हणूनच आपल्या चित्रपटात संवाद कमी आणि दृष्य बोलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपण जेव्हा ‘बारा आना’ हा चित्रपट केला तेव्हा आपल्याला एक कथा सांगायची आहे, हा विचार होता आणि आपण ती जास्तीत जास्त चांगल्या रीतीने सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या चित्रपटाचा महोत्सव आणि कलात्मक चित्रपट म्हणून गणना केली गेली. तेव्हा आपल्याला धक्का बसला असे मत राजाकृष्णा मेनन यांनी व्यक्त केले. जेव्हा तुम्ही वास्तव सांगता तेव्हा जनता तुम्हाला स्वीकारते अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

इफ्फी हा भारतातला सर्वात मोठा आणि आशियातला सर्वात जुना महोत्सव असून, 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव गोव्यात सुरु राहणार आहे.

 
PIB Release//226

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau