This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

जाने भी दो यारों टीमने इफ्फि गोवा २०१७ मध्ये कुंदन शाह यांना श्रद्धांजली वाहिली

 


पणजी, 23-11-2017

हिंदी विनोदी चित्रपटांमधील पाच सार्वकालिक सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक 'जाने भी दो यारों' (1983)- ज्यात दिवंगत अभिनेते ओम पुरी, नसिरुद्दीन शाह, सतीश शाह, सतीश कौशिक, नीना गुप्ता आणि पंकज कपूर यांसारख्या कसलेल्या कलाकारांनी काम केले होते , तो चित्रपट आज दिवंगत दिग्दर्शक कुंदन शाह यांच्या श्रद्धांजली विभागात दाखवण्यात आला. त्यांची नुक्कड मालिकाही खूप गाजली होती.

पत्रकार परिषदेला आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त चित्रपट दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्यासह सतीश कौशिक, नीना गुप्ता आणि लेखक-दिग्दर्शक रंजित कपूर या चित्रपटातील कलाकारही उपस्थित होते. यावेळी त्यांनी या महान विनोदी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळच्या आठवणी सांगून उपस्थित प्रेक्षकांना भारावून टाकले.

सुधीर मिश्रा म्हणाले कि ही विचित्र गोष्ट आहे कि आज आम्ही जाने भी दो यारों बाबत बोलत आहोत, मात्र कुंदन आज आपल्यात नाही. हा चित्रपट त्यांच्या विचित्र कल्पनेचा परिणाम होता. सतीश आणि मी चित्रपटाच्या सदस्यांमध्ये सर्वात तरुण आणि नवखे होतो. रंजित कपूर प्रसिद्ध होते. आम्हाला रंजित कपूर यांचे मित्र म्हणून ओळखले जायचे. जेव्हा आम्ही या माध्यमात पाऊल देखील टाकले नव्हते त्याकाळी ते रंगभूमीवरील प्रसिद्ध दिग्दर्शक बनले होते. कुंदन यांनी आम्हाला ते करायला प्रोत्साहित केले, जे आम्ही जाने भी दो यारोंच्या निर्मितीदरम्यान केले. जाने भी दो यारोंच्या माध्यमातून आम्ही स्वतःला सर्जनशील कलाकार म्हणून पाहायला लागलो.

 

सतीश कौशिक म्हणाले कि आज एक खास दिवस आहे कारण आपण आज इथे एका अतिशय भावुक दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलो आहोत. मी 1979 मध्ये मुंबईत आलो, तेव्हापासून आणि नंतर फिल्म इन्स्टिट्यूटच्या दिवसांपासून मी त्यांना ओळखत आहे. त्यांचे विचार इतरांपासून वेगळे होते. चित्रपटांच्या बाबतीत ते विक्षिप्त, वेडे आणि भावुक होते. त्यांनी दिसण्याकडे, कपड्यांकडे आणि बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नसले तरी त्यांच्यातील सिनेमा अतिशय पॉलिश्ड होता. मी रंजीत कपूर यांच्या घरी गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा कुंदन शाह देखील तेथे होते, आणि तेव्हा त्यांनी मला चित्रपटासाठी सह-लेखकाची ऑफर दिली. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे माझे सौभाग्य आहे.

रंजीत कपूर म्हणाले कि काही दिवसांपूर्वी आम्ही मुंबईत एनएफडीसी मध्ये या चित्रपटाला दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली आणि त्याआधी आम्ही ओम पुरीसाठी देखील श्रद्धांजली वाहिली होती. जोवर जाने भी दो यारों चे कलाकार जिवंत आहेत तोवर श्रद्धांजलीची प्रक्रिया चालू राहील. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांच्यबरोबरचा सहवास अविस्मरणीय होता. त्यांच्यात एक प्रकारचा वेडेपणा होता.

48 व्या भारतीय आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचे आयोजन गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर  2017 दरम्यान केले जात आहे. इफ्फि हा भारताचा सर्वात मोठा आणि आशियातील सर्वात जुना चित्रपट महोत्‍सव आहे आणि म्हणूनच जगातील प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांमध्ये याची गणना केली जाते.  

 
PIB Release//228

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau