This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

चित्रपट दिग्दर्शक अलि असगरी आणि अभिनेता सायमन आल- बझून यांनी इफ्फि 2017 मध्ये आपल्या चित्रपटांविषयी भाष्य केले

 


पणजी, 23-11-2017

इफ्फि 2017 च्या ४ थ्या दिवशी  'इंडियन पॅनोरमा- मीट द डायरेक्टर्स ' अंतर्गत , चित्रपट दिग्दर्शक अलि असगरी आणि अभिनेता सायमन आल- बझून यांनी इफ्फि  2017 मध्ये आपल्या ' डिसॅपिअरन्स ' आणि ' द अदर साईड ऑफ होप ' या चित्रपटांविषयीचे मनोगत सांगितले. 

डिसॅपिरिअन्स (2017)  हा इराणी चित्रपट असून, ७४ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात याचा वर्ल्ड प्रीमिअर झाला होता आणि नंतर यावर्षी टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डिस्कव्हरी विभागात दाखवण्यात आला होता. एका नाट्यमय रात्री दोन तरुण प्रेमी पहिल्या भेटी नंतर उद्‌भवलेल्या प्रकारासाठी  मदत मागण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धावत असतात.

दिग्दर्शक अलि असगरी म्हणाले कि मानवी संबंध असलेले वास्तववादी चित्रपट बनवायला मला आवडते. हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे आणि या विषयावर आम्ही एक डॉक्युमेंट्री देखील बनवली आहे. पूर्वी चित्रपट मनोरंजनासाठी होते, मात्र आता आपण मोठे झालो आहोत आणि मनोरंजनापलीकडे संवाद साधण्याचा आपला प्रयत्न असतो.

 

बर्लिन चित्रपट महोत्सवातील सिल्व्हर बेअर विजेत्या 'द अदर साईड ऑफ होप' दोन नायकांची कथा आहे, खालेद हा एक तरुण सीरियन शरणार्थी आहे जो हेलसिंकी बंदरात स्टोअवे म्हणून काम करतो. आणि विक्स्ट्रॉम हा प्रवासी सेल्समन हॉटेलमालक बनला आहे आणि त्याला खालेद हॉटेलबाहेर झोपलेला आढळतो. तो त्याला भांडी घासण्यासाठी म्हणून कामावर ठेवतो.

सायमन अल -बझून (अभिनेता) यांनी सांगितले कि या भूमिकेची तयारी करण्यासाठी त्यांनी खूप संशोधन केले. रेफ्युजी वेलकम फेडेरेशनमध्ये ते अनुवादक आणि स्वयंसेवक होते, जिथे ते अनेक गोष्टी शिकले आणि शिबिरातील शरणार्थींशी संवाद साधला.

 
PIB Release//230

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau